Uddhav Thackeray News: 'येत्या 5 तारखेला एकजूटीचं दर्शन दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच. ज्या प्रमाणे आंदोलनात सगळे एकजूट होऊन उतरले होते. तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवात दाखवण्याची आवश्यकता आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.' आज विधानपरिषदेचा कामकाजाचा पहिला दिवस होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. हिंदी भाषेसंदर्भातील जीआर रद्द करण्यात आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेकडून जल्लोष यात्रा काढण्यात येणार आहे, याबाबत उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे.
'शिवसेनेसोबत ज्या ज्या पक्षाने मतभेद विसरून सोबत आले त्याचं खूप अभिनंदन. जर त्यांनी जीआर रद्द केला नसता तर 5 जुलैच्या मोर्चात भाजप, अजित पवार गटाचे मराठी प्रेमी सहभागी होणार होते. सरकारने केविलवाणा प्रयत्न केला आहे तरी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. अशी थट्टा सरकारने करू नये, हा शिक्षणाचा विषय आहे. सक्ती विषय हा आता संपला आहे, त्यांना आता काहीही करू दे,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'परत संकट येण्याची वाट पाहण्यापेक्षा ही एकजूट कायम ठेवली पाहिजे. येत्या 5 तारखेला एकजूटीचं दर्शन दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच. ज्या प्रमाणे आंदोलनात सगळे एकजूट होऊन उतरले होते, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच, पत्रकारांनी राज ठाकरे 5 तारखेला सोबत असणार का? असा प्रश्न विचारला असता, माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळलं असेल, आम्ही सगळ्यांशी बोलणार आहोत आंदोलनात आम्ही मतभेद विसरून एकत्र येणार होतो आता विजय उत्सवात आमची एकजूट दिसेल. आम्ही सगळ्यांशी बोलणार आहोत,' असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
'सरकारचा एक कुटील डाव होता, हे दाखवून देता येईल. पहिलं मराठी-अमराठी करायचं. मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही. मराठी-अमराठी वाद होत नाही. मराठी माणूस एक येऊ नये म्हणून जीआर त्यांना रद्द करावा लागला आहे. गिरणी कामगारांची समितीदेखील आम्हाला येऊन भेटून गेली होती. गिरणी कामगारांच्यासोबत आम्ही आहोतच,' असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
कमळी नेमकी कोणत्या भाषेत शिकली. कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकले. कारण मार्क्स मिळाले 100 पैकी 100 कमळी आमची एक नंबर. आता ही कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती का? तिने 100 मार्क्स कसे मिळवले. त्यातसुद्धा तिने ईव्हीएम वापरलं होतं का. ती मला उत्सुकता आहे. कमळी आमची एक नंबर असं म्हणणारे कोण आहे याची मला उत्सुकता आहे, असा टोलादेखील त्यांनी भाजपला लगावला आहे.