Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Pune Porsche Crash: पुण्यातील अल्पवयीन आरोपीबाबात कोर्टाचा मोठा निर्णय! पोलिसांची 'ती' मागणी फेटाळली

Pune Porsche Crash: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीविरुद्ध प्रौढ म्हणून खटला चालवण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता संबंधित अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल करता येणार नाही.  

Pune Porsche Crash: पुण्यातील अल्पवयीन आरोपीबाबात कोर्टाचा मोठा निर्णय! पोलिसांची 'ती' मागणी फेटाळली

Pune Porsche Crash: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीविरुद्ध प्रौढ म्हणून खटला चालवण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध प्रौढ म्हणून खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आता संबंधित अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल करता येणार नाही.  या निर्णयामुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
 
पुण्यातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध प्रौढ म्हणून खटला चालवण्याची परवानगी मागणारा अर्ज बाल न्यायालयात सादर केला होता.  मात्र, या अर्जाला आज बाल न्यायालयाने नकार दिला आणि अर्ज फेटाळून लावला. 

गतवर्षी वर्षी मे महिन्यात अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवत दोघांना ठार केलं होतं. पीटीआयच्या वृत्तानुसार, बाल न्याय मंडळाने (जेजेबी) मंगळवारी असा निर्णय दिला की पोर्शे अपघात प्रकरणात सहभागी असलेल्या तरुणला अल्पवयीन मानलं जाईल. गतवर्षी 19 मे रोजी पहाटे पुण्यातील कल्याणी नगरमध्ये १७ वर्षीय मुलाने दारूच्या नशेत चालवलेल्या पोर्श कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांना धडक देत ठार केलं होतं. हे दोघे दुचाकीवरून जात होते.

मुलाला अटक केल्यानंतर लगेचच त्याला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना त्याला रस्ते सुरक्षा विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगण्यात आलं. यामुळे समाजातील सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर मुलाला पुन्हा ताब्यात घेत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. मुंबई हायकोर्टाने त्याची नंतर सुटका केली. 

अपघाताच्या वेळी मद्यपान केलं आहे हे लपवण्यासाठी मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून आपल्या रक्ताचा नमुना देणाऱ्या आणि त्यासाठी 3 लाखांची लाच देणाऱ्या मुलाच्या आईला गतवर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये तिला अंतरिम जामीन मंजूर केला.

Read More