Kalyan Crime: सुंभ जळाला तरी पीळ जात नाही असं म्हणतात. कल्याणमधील आरोपी गोकुळ झा याला ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. कारण पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याची मुजोरी कशी कायम आहे. मुजोर गोकुळच्या हातात बेड्या असूनही त्याचा माज कायम आहे. गोकुळने कल्याणच्या हॉस्पिटलमधे मराठी मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर गोकुळला अटक करुन न्यायालयात हजर केलं होतं तेव्हाही त्यानं कोर्टात धिंगाणा घातला होता.दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात नेण्यात आलं तेव्हा त्यानं पोलिसांनाही अरेरावी केली.गुन्हेगारांचा काळा बुरखा घालण्यासही त्यानं विरोध केला.इतकच नाही तर पोलिसांच्या समोर पत्रकारांना धमक्याही दिल्या.
मराठी तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारणारा परप्रांतीय गोकुळ झा सराईत आरोपी आहे. कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगर परिसरात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.दरोड्यासह मारहाणीचाही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.नांदिवली परिसरात तो फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करतो असा आरोप आहे. हत्यार बाळगणे, मारहाणा करणे अशा गंभीर गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. मात्र तो जामीनावर सुटला होता. पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याला ना कायद्याचं भय आहे ना पोलिसांचं. गोकुळ सुटला तर पीडित तरुणीच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा गुन्हेगाराला खुलेआम सोडणं समाजासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
पीडित तरुणी ही खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम पाहते. 21 जुलै रोजी रुग्णालयात गोपाल झा नावाचा परप्रांतीय तरुण आला. तेव्हा त्यांने डॉक्टरांची भेट घ्यायची असल्याचे सांगितले. तेव्हा पीडित तरुणीने डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा, असं सांगितले. या क्षुल्लक गोष्टीवरुन परप्रांतीय तरुणाने तिला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जुले रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुण रुग्णालयात आला. पण डॉक्टरांच्या आदेशानुसार आतमध्ये म्हणजेच डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये MR बसले असताना कोणालाही आतमध्ये पाठवू नये, असा नियम आहे. याच नियमाते पालन करत असताना नशेखोर तरुण कोणालाही न जुमानता सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसला. तेव्हा त्याला थांबा जाऊ नका, असं म्हटलं.पीडित तरुणीने नशेखोर तरुणाला अडवल्यानंतर त्याने सरळ धावत येऊन तरुणीच्या तोंडावर लाथ मारुन खाली पडलं. व तिचे कपडे फाडून लाखा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंदवली असून नशेखोर तरुण पीडित तरुणीच्या अवतीभवती फिरत असल्याचे तिने म्हटलं आहे.