Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी....

 कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी....पत्रीपुलाचं काम येत्या मार्च अखेरीस पूर्ण होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी....

कल्याण : कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी....पत्रीपुलाचं काम येत्या मार्च अखेरीस पूर्ण होणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांनी पत्रीपुलाच्या कामाचा पाहणीदौरा केला. नवीन पत्रीपुल उभारण्यात येणाऱ्या दोन्ही दिशेला पायलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर यावर उभारला जाणारा गर्डर हैद्राबादमध्ये बनवण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात रेल्वेचे अधिकारी हैद्राबादला जाऊन या गर्डरची पाहणी करणार आहेत. 

पत्रीपुलाचं काम काही वर्षापासून रखडल्यामुळे वाहतुकीचे फार मोठी कोंडी होत आहे. या वाहतुकीच्या कोंडीला कल्याणपासून डोंबिवलीपर्यंतचे नागरीक कंटाळले आहेत. अनेकांचे काही तास या कोंडीतच जात असल्याने, नागरिकांमध्ये याविषयी संताप आहे.

Read More