Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कल्याणमध्ये मद्यधुंद पोलिसाची तरुणांना जबर मारहाण

कल्याणच्या गौरीपाडा परिसरात एका मद्यधुंद पोलिसाने दोन तरूणांना जबर मारहाण केली.

कल्याणमध्ये मद्यधुंद पोलिसाची तरुणांना जबर मारहाण

कल्याण : कल्याणच्या गौरीपाडा परिसरात एका मद्यधुंद पोलिसाने दोन तरूणांना जबर मारहाण केली. बापू तायडे असं या पोलिसाचं नाव आहे. खडकपाडा पोलीस स्थानकात या मद्यधुंद पोलिसाविरोधात तक्रार करण्यात आलीय. गौरीपाडा परिसरात दोन तरूण इमारतीखाली गप्पा मारत उभे होते. त्यावेळी सोसायटीत राहणारा आणि मद्यधुंद असलेला बापू तायडे हा पोलीस कर्मचारी ड्युटीवर नसताना तरूणांना हटकून चौकशी करू लागला. त्यानंतर त्याने या तरूणांना मारहाण करायला सुरूवात केली. ही मारहाण करताना एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केलं आहे. 

 

Read More