Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणानं गमावला जीव

खड्यांमुळे बाईकवरून तोल जाऊन कल्पेश रस्त्यावर पडला... 

खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणानं गमावला जीव

कल्याण : कल्याणमध्ये खड्ड्यांनी पाचवा बळी घेतलाय. कल्याणच्या गांधारी पूल या भागात खड्ड्यामुळं एका बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झालाय. कल्पेश जाधव या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. कल्पेश जाधव हा कल्याण जवळील नांदकर गाव येथील रहिवासी होता. 

एके ठिकाणी जात असताना रस्त्यांवरच्या खड्यांमुळे बाईकवरून तोल जाऊन कल्पेश रस्त्यावर पडला... आणि नेमकं त्याच वेळी पाठीमागून आलेल्या ट्रक खाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Read More