Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

टँकरमधून केमिकल अंगावर सांडल्यानं बाईकस्वाराचा डोळा निकामी

अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय

टँकरमधून केमिकल अंगावर सांडल्यानं बाईकस्वाराचा डोळा निकामी

कल्याण : वालधुनीमधल्या आंबेडकर चौकात केमिकल टँकरचं झाकण अचानक उघडल्यानं केमिकल पडून बाजूनं दुचाकीवरून जाणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालंय. रविवारी रात्री कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारं साळसकर दाम्पत्य खरेदी करुन घरी जात असताना हा प्रकार घडला.

गौरी साळसकर यांच्या चेहऱ्यावर, हातावर, पायावर केमिकल पडलं असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती गौरेश साळसकर यांच्या डोळ्यात केमिकल गेल्यानं त्यांना एका डोळ्यानं दिसत नाहीय. पुढील उपचारासाठी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांचा दीड वर्षांचा मुलगा तनिष किरकोळ जखमी झालाय.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येतोय. टँकर चालकाचा शोध न लागल्यानं नाराजी व्यक्त होतेय. 

Read More