Karuna Munde Accusations: सत्र न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवत धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी केलेली याचिका फेटाळली आहे. मात्र कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत लावत सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. दरम्यान करुणा मुंडे यांनी सुनावणीदरम्यान काही धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार धनंजय मुंडे माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला 20 कोटी देणार होते असा दावा त्यांनी केला आहे.
सुनावणीच्या सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी सांगितलं की, "लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं, मात्र मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र सोडून बाकी सगळी कागदपत्रं त्यांनी आणली आहेत. त्यांना काही अर्थ नाही. त्यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आम्ही आधीच कागदपत्रं दिली आहेत ज्यामध्ये करूणा मुंडे माझ्या पत्नी नाही हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत असं सांगितलं.
मृत्यूपत्रात जे काही खों नमूद करण्यात आलं आहे त्यासंदर्भात करुणा मुंडे यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे. त्यांनी खोटी कागदपत्रं बनवली असून त्यातल्या गोष्टी आम्ही नाकारत आहोत असं सायली सावंत यांनी सांगितलं. हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न झाल्याचा कोणता पुरावा; नवरा-बायकोप्रमाणे नातेसंबंध; जबाबदा-या या केसमध्ये दिसत नाहीत असाही युक्तिवाद त्यांनी केला.
करुणा मुंडेंनी यावेली कोर्टासमोर स्वत:साठी बाजू मांडण्याची विनंती केली. मला पण बोलायचं आहे. 27 वर्षं आम्ही सोबत राहिलोय. मीही बोलते माझ्या पतीला बोलवा. माझे वकील ते चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाहीत ते मी मांडू शकते असं त्यांनी म्हटलं. यावर कोर्टाने तुमचे वकील आहेत तर त्यांना बोलू द्या. मी म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय देईन असं आश्वस्त केलं.
करुणा मुंडेंवर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी युक्तीवादादरम्यान मोठा आरोप केला. करुणा मुंडे यांनी पुराव्यादाखल सादर केलेल्या कागदपत्रांवर धनंजय मुंडेंच्या खोट्या सह्या घेतल्याचा आरोप करण्यात आला. करुणा मुंडेंनी सरकारी कागदपत्रंही, जसं पासपोर्ट आणि इतर कागदपत्रेही खोट्या पुराव्यांच्या आधारे मिळवल्याचा आरोप करण्यात आला. करुणा मुंडेंनी सादर केलेले रेशन कार्डही इंदौर महापालिकेचं असून ते बनावट आहे असा आरोप धनंजय मुंडेंच्या वकीलांनी केला.
दरम्यान करुणा मुंडेंकडून मृत्यूपत्र, स्वीकृती यावर ज्या सह्या आहेत, अंगठ्याचा ठसा आहे ते धनजय मुंडे यांचीच आहे असा दावा केला. तसंच राज घनवट यांची देखील सही आहे असं सांगण्यात आलं. होम लोनमध्ये धनजय मुंडे गॅरेंटर आहेत अशी माहिती दिली. पुरावे नसते तर मी समोर आली नसती असंही त्या म्हणाल्या.
मी पहिली बायको आहे. जे मिळेल ते मिळेल त्याच्याशी काहीही सबंध नाही. पण मी पहिली बायको आहे हे मला सिद्ध करायचं आहे असं त्यांनी सांगितलं.
मला रस्त्यावर आणि मीडियावर आणणारा धनजय मुंडे आहे. हिरोईनची ऑफर होती पण मी पती सोबत राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या सोबत लग्न करणाऱ्याला धंनजय मुंडे 20 करोड रुपये देणार होते असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.