Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कडोंमपाचे वादग्रस्त आयुक्तांची अखेर बदली

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त पी. वेलरासु यांचीही बदली झालीय.

कडोंमपाचे वादग्रस्त आयुक्तांची अखेर बदली

कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त पी. वेलरासु यांचीही बदली झालीय. वेलरासु यांनी कल्याण-डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न हाताळताना अत्यंत हलगर्जीपणा दाखवल्याचा त्यांच्यावर आऱोप आहे. 

हलगर्जीपणा दाखवल्याचा त्यांच्यावर आऱोप

लोकांनी डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीप्रकरणी तक्रार केल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल, तर घरे सोडून दुसरीकडे रहायला जा, असा अजब सल्ला आयुक्तांनी लोकांना दिला होता. 

शिवसेना नगरसेवकांबरोबरही वेलरासु यांचा वाद 

संतप्त झालेल्या कल्याणकरांनी येत्या १९ मार्च रोजी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी शिवसेना नगरसेवकांबरोबरही वेलरासु यांचा वाद झाला होता. शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं.

Read More