Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'कडोंमपा' कचऱ्याच्या ढीगात, कर्मचारी संपावर

...तर कल्याण डोंबिवलीतला कचरा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता

'कडोंमपा' कचऱ्याच्या ढीगात, कर्मचारी संपावर

कल्याण : तीन महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळं कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेत. यात सफाई कामगार आणि घंटागाडी चालकांचा समावेश आहे. 

डोंबिवलीच्या खंबालपाडा डेपोत उभ्या असणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांची हवा कर्मचाऱ्यांनी सोडून दिलीय. त्यामुळं एकही कचरागाडी आज बाहेर पडलेली नाही. 

या आंदोलनावर तोडगा निघाला नाही, तर कल्याण डोंबिवलीतला कचरा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. 

Read More