Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

खैरे- दानवेंचा वाद पेटला! खैरेंच्या आरोपावर अंबादास दानवेंचा पलटवार

चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंना टोला लगावत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.  दरम्यान त्यांनी केलेल्या आरोपांनंतर अंबादास दानवेंनी देखील पलटवार केला आहे. 

खैरे- दानवेंचा वाद पेटला! खैरेंच्या आरोपावर अंबादास दानवेंचा पलटवार

विशाल करोळे (प्रतिनिधी)  संभाजीनगर : ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंना टोला लगावत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.  दरम्यान त्यांनी केलेल्या आरोपांनंतर अंबादास दानवेंनी देखील पलटवार केला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन शिलेदारांमध्ये चांगलीच जुंपलीय. चंद्रकांत खैरे आणिअंबादास दानवेंमधला संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंना टोला लगावला. तसंच दानवे कोणत्याही कार्यक्रमात बोलवतनसल्याचा आरोप देखील खैरेंनी केला. 

हेही वाचा : 10वीच्या विद्यार्थ्याने AIच्या मदतीने 2 महिन्यात कमावले दीड लाख; व्हायरल पोस्टमध्ये दावा!

 

चंद्रकांत खैरेंनी केलेली टीका आणि आरोपांनंतर अंबादास दानवेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.  दरम्यान मी कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही. तसंच पक्षाच्या कार्यक्रमात मानपान करायचा नसतो असा पलटवार अंबादास दानवेंनी केला. संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजू शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. दरम्यान यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरेंवर आरोप केलेत. चंद्रकांत खैरेंनी निवडणुकीत माझं काम केलं नसल्याचा आरोप राजू शिंदेंनी केला आहे. दरम्यान शिंदेंच्या आरोपांनंतर चंद्रकांत खैरेंनी थेट कानाखाली मारण्याचा इशारा दिला होता.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मागील काही दिवसांपासून मोठे धक्के बसतायत. दरम्यान त्यातच आता राजू शिंदेंनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय. तर दुसरीकडे संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेमधील दोन शिलेदारही आपआपसात भिडले आहेत. 

Read More