Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पिंपरी-चिंचवड येथे व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर त्याची हत्या

एका छोट्या व्यवसायिकाच्या १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या..

पिंपरी-चिंचवड येथे व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर त्याची हत्या

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील भोसरीतील एका छोट्या व्यवसायिकाच्या १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. मृतदेह पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सापडला. हा खून केल्यानंतर आरोपीने मृत मुलाच्या पालकांकडे ४० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अब्दुलअहत तयर सिद्दिकी असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. 

आरोपी उमर शेख आणि मृत अब्दुल सिद्दीकी हे दोघे मित्र होते. आरोपीने हा खून पैशासाठी केल्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी उमर शेख याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Read More