Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी

भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे. 

किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी

Kirit Somaiya: भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे. 

मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. असे या पत्रात लिहिले आहे.

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही असे किरीट सोमय्या यांनी पत्रात लिहिले आहे. अशा सर्व आरोपांची व्हिडिओ क्लिप/क्लिप्स सत्यता तपासावी, चौकशीही करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

मुद्दा अधिवेशनात उचलणार 

किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी झी 24 तासला सांगितले. किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे.

किरीट सोमय्या यांनी अनेकांचे घोटाळे बाहेर काढले

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीत अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. किरीट सोमय्या यांच्या खळबळजनक आरोपांमुळे अनेक नेते ED, CBI च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

Read More