Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तरूणाकडून ठाण्यात तरूणीवर भरदिवसा चाकूचे ८ वार

ठाणे शहरानजीकच्या मुंब्रातील सम्राटनगर भागात एका तरुणीवर चाकूहल्ला केला गेला.

तरूणाकडून ठाण्यात तरूणीवर भरदिवसा चाकूचे ८ वार

ठाणे : ठाणे शहरानजीकच्या मुंब्रातील सम्राटनगर भागात एका तरुणीवर चाकूहल्ला केला गेला. लग्नाला नकार दिला म्हणून ३२ वर्षीय करण होले यानं, तरुणीवर चाकूने आठ वार केले. तिच्यावर कळवा इथल्या शिवाजी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

फरार हल्लेखोर करण होले जखमी तरुणीचा नातेवाईक आहे, मुंब्रा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. 

हे प्रकरण नेमकं काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत, हे प्रेमप्रकरण आहे किंवा एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला आहे, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read More