Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोल्हापुरमध्ये एसटी चालकांना जबरदस्ती केलं होमक्वारंटाईन

दोन एसटी चालकांना जबरदस्ती क्वारंटाईन 

कोल्हापुरमध्ये एसटी चालकांना जबरदस्ती केलं होमक्वारंटाईन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गवशीपैकी पाटीलवडीमध्ये अत्यावश्यक सेवा बाजावून घरी परतलेल्या दोन एसटी चालकांना गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकांने कुटूंबासह जबरदस्तीने होमक्वांरंटाईन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

fallbacks

चालक सखाराम पवार आणि दीपक केरकर असे होम क्वांरटाइन केलेल्यांची नावे आहेत. या चालकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना मध्यप्रदेश बॉर्डरवर सोडलं होतं. प्रशासनाने लेखी पत्र देवून देखील चालकांना कालपासून घरात केलं होम क्वांरनटाईन करण्यात आलं आहे.

गृहमंत्र्यांची माहिती 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५,६५,७२६ व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. 

राज्यात लॉकडाऊनच्या काळात कलम १८८ नुसार १,१५,२६३ गुन्ह्यांची नोंद झाली असून २३,२०४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ४८ लाख ६२ हजार ९४७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४८ घटना घडल्या असून यामध्ये ८३० व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

लाँकडाऊनच्या काळात १०० या क्रमांकावर ९५,९११ फोन आले. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,६५,७२६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७२,६८७ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

Read More