Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पश्चिम महाराष्ट्रातील धक्कादायक घटना! अपहृत झालेला 7 वर्षांच्या चिमुकला सापडला मृत अवस्थेत

नरबळी की सूड? मित्रच बनला वैरी! मित्राच्या मुलाचं आधी अपहरण केलं नंतर संपवलं

पश्चिम महाराष्ट्रातील धक्कादायक घटना! अपहृत झालेला 7 वर्षांच्या चिमुकला सापडला मृत अवस्थेत

प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर: अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील सोनाळी मध्ये सात वर्षाच्या मुलाचं अपहरण आणि हत्या करण्यात आली.कागल तालुक्यातल्या सवार्डे गावातली ही घटना आहे. 

सोनाळीमध्ये मित्राच्या मुलाच अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेनं पश्चिम महाराष्ट्र हादरला आहे. 7 वर्षांच्या चिमुकल्याचं कागल तालुक्यातील सवार्डे बुद्रूक इथून 2 दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं. या अपहरणाची माहिती वडिलांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या चिमुकल्याचं अपहरण नेमकं कुणी आणि कशासाठी केलं याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही. 

स्वतःला मूल होत नाही म्हणून या पाटील कुटुंबीयांच्या ओळखीच्या किंवा नात्यातील कोणीतरी हा धक्कादायक प्रकार केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे हा नरबळीचा प्रकार असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीच माहिती दिली नाही. 

या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून त्याची माहिती पोलीस देणार आहेत. चिमुकल्याचा खून का झाला ? कोणी आणि का केला याची माहिती पोलिसांच्या तपासातून लवकरच समोर येईल. दरम्यान ग्रामस्थांनी मात्र संशयित व्यक्तीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ त्याला अटक करावी अशी मागणी करत आहेत. त्यामुळे गावामध्ये मोठं तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे.

Read More