Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

विशाळगडावर कुर्बानीला परवानगी मिळणार? उच्च न्यायालयाची परवानगी, पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयानं विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिली आहे. या परवानगीविरोधात जिल्हा प्रशासनानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.  

विशाळगडावर कुर्बानीला परवानगी मिळणार? उच्च न्यायालयाची परवानगी, पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. अनेक ठिकाणी कुर्बानीची तयारी सुरू झाली आहे. आता मुद्दा आहे कोल्हापुरातल्या विशाळगडावरचा आहे. उच्च न्यायालयानं विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिली आहे. या परवानगीविरोधात जिल्हा प्रशासनानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र कोल्हापुराचे नवे जिल्हा पोलीस प्रमुखांनी काढलेल्या आदेशामुळे सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. 

विशाळगडावर कुर्बानीला उच्च न्यायालयाची परवानगी

पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात धाव

विशाळगडावर कुर्बानीला परवानगी मिळणार?


महाराष्ट्रात सर्वत्र बकरी ईदनिमित्त कुर्बानीची तयारी सुरू आहे.. मात्र कोल्हापुरात पोलीस प्रशासनाचा आदेश संभ्रम वाढवणारा ठरला आहे. विशाळगडवर कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही, असा आदेश कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्तांनी काढला आहे. नुकतीच उच्च न्यायालयानं विशाळगडावर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती. त्याला प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो.

गेल्या वर्षी 14 जुलैला विशाळगडवरच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन दंगल झाली होती. त्यानंतर काही काळ पर्यटकांनाही गडावर बंदी घातली होती. नंतरच्या काळात या ठिकाणी कुर्बानी देण्यावरही नियंत्रण आलं. गेल्या वर्षी विशाळगडावर जो उरुस झाला त्यावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी होती. आता उच्च न्यायालयानं या ठिकाणी कुर्बानीला परवानगी दिली असली तरी कोल्हापूर पोलिसांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. 

दरम्यान, गेल्यावर्षी बंद आवारात कुर्बानी द्यायला परवानगी दिली होती. यावर्षी संरक्षित स्मारकात उरुस 12 तारखेपर्यंत सुरू राहील. या संदर्भातील प्रकरण दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यानं केला. कोणताही धर्म किंवा श्रद्धा असो, संरक्षित स्मारकात काहीतरी गतिविधी सुरू असतात आणि त्या ठीक आहेत, असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी तातडीनं सुनावणीला नकार दिला. त्यामुळे आता विशाळगडावर कुर्बानीवरून मोठा पेच निर्माण झालाय आणि हा पेच सोडवण्यात पोलिसांचा कस लागणार हे मात्र खरं.. 

Read More