Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गणेश विसर्जनातील बंदोबस्तातील पोलीस अधिकारी चर्चेत, Video सोशल मीडियावर व्हायरल

यंदाचं गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) सोहळा जल्लोषात आणि शांतेत पार पडलं. यांचं सर्व श्रेय हे पोलिसांना द्यायला हवं. अशातच कोल्हापूरमधील पोलीस (Kolhapur Police ) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

गणेश विसर्जनातील बंदोबस्तातील पोलीस अधिकारी चर्चेत, Video सोशल मीडियावर व्हायरल

Kolhapur Police Dance Video: कोरोनाच्या (corona) महासंकटानंतर 2 वर्षांनी राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. यंदाचं गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) सोहळा जल्लोषात आणि शांतेत पार पडलं. यांचं सर्व श्रेय हे पोलिसांना द्यायला हवं. अशातच कोल्हापूरमधील पोलीस (Kolhapur Police ) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

गणेशांची सुंदर मूर्ती, गणेश भक्तांचा जोश आणि डीजेच्या (DJ) तालावर थरकरणारे गणेशभक्त...सर्वत्र वातावरण अजून काही गणेशमय झालं होतं. गणेशभक्तांच्या भावनांचा सुंदर मेळावा आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओमधून पाहिला मिळतं आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात कोणी लहान नाही मोठं नाही, कुठल्या जातीधर्माचा नाही, सर्व कसे एका रंगात न्हाऊन निघाले होते. (treading video 2022 maharashtra policemen dance ganesh immersion in kolhapur video viral  on social media)

कोल्हापुरात सर्वत्र डीजेचा जल्लोष सुरु असताना बंदोबस्ताला (arrangement) असणाऱ्या पोलिसांनाही आपला डान्स करण्याचा मोह आवरला नाही.अखेरच्या मूर्तीचं विसर्जन पार पडल्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीमध्ये ठेका धरला. पोलिसांचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता महिला पोलीसही (Women Police) मोठ्या उत्साहात डान्स करताना दिसतं आहे. दोन दिवसांच्या बंदोबस्ताच्या तणावानंतर थोड्या फार विरगुंळाचा हा क्षण पोलिसांनीही अनुभवला. मात्र सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर टीका केली आहे तर काही लोकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. यापूर्वी 2018 मध्येही कोल्हापुरातील पोलिसांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यंदा पुन्हा पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत जबरदस्त डान्स केला.

पाहा व्हिडीओ 

Read More