Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ना खड्ड्यांचा त्रास, ना ट्रॅफिकचे टेन्शन, आता थेट ट्रेनमधून कार कोकणात न्या, कसं कराल बुकिंग? सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचा

Kokan Railway: मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ता आणि वाहतुक कोंडी यामुळं पोहोचायलाच खूप वेळ लागतो. पण लवकरच प्रवाशांचा प्रवास सुकर आणि आरामदायी होणार आहे.. कोकण रेल्वेने एक खास योजना आणली आहे.

ना खड्ड्यांचा त्रास, ना ट्रॅफिकचे टेन्शन, आता थेट ट्रेनमधून कार कोकणात न्या, कसं कराल बुकिंग? सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचा

गणेशोत्सवासाठी आता चाकरमान्यांची लगबग कोकणात जाण्यासाठी सुरू आहे. अनेक चाकरमानी रेल्वे मार्गाने गाव गाठतात तर काही जण रेल्वेमार्गाने जाणे पसंत करतात. मात्र अनेकदा गावी गेल्यानंतर तिथे काही कामानिमित्त बाहेर जायचं म्हटलं की, कार कुठून आणायची असा प्रश्न पडतो मात्र आता हे टेन्शन लवकरच संपणार आहे. तुम्ही आता ट्रेनने तुमची कारदेखील नेऊ शकता. कोकण रेल्वेने रो-रो सेवा सुरू केली आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ आणि खर्चदेखील वाचणार आहे.

रो-रो सेवा ही कोलाड ते गोव्याच्या वेर्णेपर्यंत असणार आहे. तुम्ही ट्रेनमधूनच तुमच्या कार आता नेऊ शकणार आहे. सध्या ही सेवा कोकण रेल्वे मार्गावरील निवडक स्थानकांवर उपलब्ध आहेत. यात गोव्याच्या मुख्य स्थानकांचाही समावेश आहे. 
तिकीट कसे बुक करता येणार?

प्रवाशांना कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा रेल्वे स्थानकावरील तिकीड खिडकीवर बुकिंग करता येणार आहे. बुकिंग करताना कार कोणती आहे, तिचा आकार आणि तुम्हाला कुठे जायचंय? याची माहिती द्यावी लागेल. 

वेळापत्रक कसे असेल?

कोलाड - वेर्णा- कोलाड अशा स्थानकांवरुन ही सेवा सुरू होणार आहे. 
प्रस्थान वेळ- संध्याकाळी 5 वाजता
पोहोचण्याची वेळ- दुसऱ्या दिवशी सकाळी 5
रिपोर्टिंग वेळ- प्रस्थानाच्या दिवशी दुपारी 2 पर्यंत

हे ही वाचाः आता रेल्वेतून कार घेऊन कोकणात जा! 23 ऑगस्टपासून सुरू होतेय मुंबई-गोवा कार फेरी सेवा, तिकिट फक्त...

कोणत्या दिवशी सेवा असणार?

कोलाड ते वेर्णाः 23,25,27,29,31 ऑगस्ट आणि 2,4,6,8,10 सप्टेंबर 
वेर्णा ते कोलाडः 24,26,28,30 ऑगस्ट आणि 1,3,5,7,9,11 सप्टेंबर 

किती असेल शुल्क?

प्रति कार 7,875 (5 टक्के जीएसटी सह)
बुकिंग करताना- 4 हजार
उर्वरित रक्कम- 3,875 प्रस्थानाच्या दिवशी स्टेशनवर भरावी लागणार
प्रति ट्रिप क्षमताः 40 कार (20 वॅगन* प्रत्येकी 2 कार)
टीपः 16 कार बुक झाल्यानंतरच ट्रिप सुरू होईल अन्यथा शुल्क परत दिले जाईल. 

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड (झेरॉक्स कॉपी)
पॅन कार्ड
कार नोंदणी प्रमाणपत्र

Read More