Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'...तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?'; कुणाल कामराची पाठराखण करत जया बच्चन यांचा सवाल

Jaya Bachchan Supports Kunal Kamra's Song : एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या व्यंगात्मक गाण्याच्या प्रकरणात जया बच्चन यांच्याकडून कुणाल कामराची पाठराखण

'...तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?'; कुणाल कामराची पाठराखण करत जया बच्चन यांचा सवाल

Jaya Bachchan Supports Kunal Kamra's Song : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात वादग्रस्त गाणं तयार केल्याने कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या व्हिडीओत कुणाल कामरा हा एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कुणालचा हा व्हिडीओ शूट झाला त्या स्टुडियोची तोडफोड केली आहे. तर अनेक लोक हे कुणाल कामराला देशातून बाहेर काढून टाका अशी मागणी करत आहेत.  या सगळ्या प्रकरणारवर आणि लोकांच्या मागणीवर बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन संतापल्या आहेत. त्यांनी या सगळ्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

कुणाल कामरा संबंधीत विषयावर जया बच्चन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं आहे. जया बच्चन यांना कुणाल कामरानं जिथे कॉमेडी शूट केली तिथे जाऊन तोडफोड करण्यात आली याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तर जया बच्चन म्हणाला, 'तुम्ही मीडियातून आहात, तुम्ही यावर लक्ष घालायला हवं. कारण जर बोलण्यावर निर्बंध आणला तर तुमचं काय होणार? आधीच तुमची परिस्थिती खराब आहे. तुमच्यावर सगळे निर्बंध आहेत. आता तुम्हालाही सांगतील की हीच बातमी घ्या आणि कोणती घ्यायची नाही. जया बच्चनची मुलाखत घेऊ नका. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? इथे फक्त कोणतीही अ‍ॅक्शन घेण्याचं स्वातंत्र्य आहे, ते पण तेव्हा जेव्हा कुठे हाणामारी झाली तर विरोधकांना मारा, महिलांवर अत्याचार करा, त्यांना चुकीची वागणूक द्या, त्यांची हत्या करा आणखी काय?'

पुढे जया बच्चन यांना विचारण्यात आलं की 'शिवसेनेच्या लोकांचं म्हणणं आहे की कुणाल कामरानं त्यांच्या नेत्याचा अपमान केला आहे. एकनाथ शिंदे यांचा अपमान केला आहे.' त्यावर उत्तर देत जया बच्चन म्हणाल्या, 'तुमचा जो खरा पक्ष होता त्या पक्षाला सोडून तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षासोबत आलात. तो अपमान नाहीये. तो बाळासाहेब ठाकरेंचा अपमान नाही?'

हेही वाचा : तोडफोड, राडा, फडणवीसांची प्रतिक्रिया, गोंधळ अन्... कुणाल कामरा शिंदेंबद्दल नेमकं काय म्हणाला?

नेमकं काय आहे प्रकरण? 

कुणाल कामरानं त्याच्या युट्यूब अकाऊंटवरुन स्टॅण्डअप कॉमेडीच्या त्याच्या शोमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा शो मुंबईतील खार येथील युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमधील 'द हॅबिटॅट क्लब'मध्ये पार पडला होता. या शोमधील महाराष्ट्रातील राजकारणावर कुणाल कामराने एक व्यंगात्मक गाणं सादर केलं होतं. त्याची 2 मिनिटांची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून हा वाद निर्णाण झाला. यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या घडामोडींचा संदर्भ कुणाल कामराने दिला आहे. 

Read More