Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना शासनाचा दणका? हफ्ता मिळणार नाहीच, याउलट सरकार...

Laadki Bahin Yojna: एकाच कुटुंबातील तिसऱ्या आणि चौथ्या महिलेनेही युक्त्या करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकार अशा महिलांचा पत्ता कट करणार आहे.  

रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना शासनाचा दणका? हफ्ता मिळणार नाहीच, याउलट सरकार...

Laadki Bahin Yojna: जालना जिल्ह्यात 70 हजार लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका करणार घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करून ही पडताळणी केली जाईल. एकाच कुटुंबातील तिसऱ्या आणि चौथ्या महिलेनेही युक्त्या करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकार अशा महिलांचा पत्ता कट करणार आहे.

लाडक्या बहिणींना शासनाचा दणका?

आता घरोघरी जावून होणार पडताळणी

अनेक महिलांचा पत्ता कट होणार ?

वर्षभरापूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच गाजावाजा झाला. सरकारलाही त्याचा मोठा फायदा झाला. मात्र आता याच लाडकी बहीण योजनेत अनेक घोटाळे आणि गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. काही ठिकाणी पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय. तर काही ठिकाणी शासकीय कर्मचारी महिलांनी पैशांवर डल्ला मारल्याचं समोर आलंय. आता या योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारकडे पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय. जालना जिल्ह्यातील 70 हजार लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे.


'लाडकी' सरकारच्या रडारवर

- जालन्यात एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी शक्कल लढवून लाभ घेतला
- अंगणवाडी सेविकांकडून अशा महिलांचा शोध घेतला जाणार
- अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जावून पडताळणी करणार
- जिल्ह्यातील 70 हजार लाभार्थी महिलांची यादी प्रशासनाला प्राप्त
- पडताळणीत दोषी आढळल्यास योजनेतून पत्ता कट होणार


दरम्यान लाडक्या बहिणींची पडताळणी केली जात असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केलीये. आता महिलांना अपात्र करतील  आणि पुन्हा निवडणुकीवेळी पात्र करतील असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय. तर मंत्री उदय सामंतांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय


लाडकी बहीण योजनेमध्ये सुरु असलेले गैरप्रकार थांबवण्यासाठी आधी सरकारने अनेकदा कारवाईचा इशारा दिला. मात्र त्यानंतरही योजनेतील गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यामुळे आता घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर तरी गैरप्रकार थांबणार का पाहावं लागणार आहे,

Read More