Aditi Tatkare On Ladki Bahin: जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर महिलांची नाराजी समोर आली होती. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हफ्ते एकत्र मिळणार होते. पण त्याऐवजी एकच हफ्ता मिळाल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली. दरम्यान महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. 7 मार्च रोजी बॅंकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले पण हा आनंद काही वेळच टिकला. महिलांना बॅंक खात्यात 3 हजार येतील अशी अपेक्षा होती. पण राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपयेच जमा झाले आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दोन महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचे जमा झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात फक्त 1500 जमा झाले. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केलीय. लाडकी बहीण योजनेचे खात्यात 3 हजार रुपये येतील अशी अपेक्षा होती. पण 1500 रुपयेच आले, अशी प्रतिक्रिया महिलांनी 'झी 24 तास'शी बोलताना दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 8, 2025
योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.
ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात…
लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 3 हजार ऐवजी फक्त 1500 रुपये आल्यानंतर मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्यात देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिले.
योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3 हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या.सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे असे त्यांनी सांगितले.