Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पैशांची तरतूद...'

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणी या योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'नियमाप्रमाणे पैशांची तरतूद तिथेच दाखवावी लागते.'

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पैशांची तरतूद...'

Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फटका इतर आयोजनेला बसत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. कारण लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यावरून लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला असा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात येतोय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. 

नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे परभणी येथील कृषी विद्यापीठात तीन दिवशीय जॉईंट ऍग्रोस्को कार्यक्रमाला उपस्थितीत होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपावर उत्तर दिले. म्हणाले की, जो काही आरोप आहे, तो खोटा आहे. अतिशय चुकीचा आहे. अर्थसंकल्प ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करु शकतात. नियम असा आहे की, आपल्या अर्थसंकल्पनेत आदिवासी लोकसंख्या आणि अनुसुचित जमातीच्या लोकसंख्येप्रमाणे निधी राखीव ठेवावा लागतो. हा निधी राखून ठेवताना त्यातील जास्त जास्त निधी हा व्यक्तिक लाभाच्या योजनेसाठी राखीव ठेवला पाहिजे. आणि काही निधी खास विकासकामांसाठी ठेवला पाहिजे. आता लाडकी बहीण ही योजना व्यक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना निधी दिला जो व्यक्तिक निधातून दिल्यामुळे तो आदिवासी विभागात दाखवावा लागेल.'

'कुठलीही बनवाबनवी...'

'हा निधी अनुसुचित जाती विभाग किंवा सामाजिक विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे तो दाखवला. या संदर्भात अजित पवार यांनी सभागृहाच खुलासा केला की इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही. जवळजवळ पावणेदोन पटीने या विभागाचे बजेट वाढवलं आणि त्या ठिकाणी तो दाखवला आहे. ही अकाऊंटींची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही. कुठलाही पैसा वळवलेला नाही. ज्यांना हे समज नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. मी अर्थसंकल्प कसा वाचायचा हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात अकाऊंटींची पद्धत काय आहे, हे मी समजून सांगेल. नियमाप्रमाणे अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते.ती योग्य प्रकारे दाखवण्यात आली आहे. यात कुठली बनवाबनवी नाही, फसवाफसवी नाही. हे मी स्पष्टपणे सांगू शकतो. अजित पवार यांनी योग्य प्रकारे काम केलं आहे.'

'ज्यांना इंग्लिश समजत नाही !'

पत्रकराने मुख्यमंत्र्यांना विचारलं की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, असं तुम्ही इग्रंजी माध्यमावर म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, 'ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांना असं वाटतं.'

Read More