Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

परप्रांतीय मजुरांची पुण्यात मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

पुणे येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

परप्रांतीय मजुरांची  पुण्यात मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

पुणे : येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तसेच डिस्टंसिंगला हरताळ फासला गेला होता. परप्रांतीय मजुरांनी नावे नोंदवण्यासाठी एकच गर्दी केली. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

 परप्रांतीय कामगारांना आपल्या गावी परत जायचे आहे. हे लोक पुलाखाली मजूर अड्ड्यावर एकत्र आले. या कामगारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत होती. त्यातून गोंधळ सुरु झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. उपद्रवी कामगारांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

केंद्र सरकारने परराज्यातील नागरिकांना प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवड मध्ये पास मिळवण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासला जात आहे. मेडिकल सर्टिफिकेट असून ही पोलीस परवानगी देत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. 

दरम्यान, अकोला रेल्वे स्थानकावरुन सोमवारी संध्याकाळी विशेष श्रमिक रेल्वे गाडी लखनौसाठी रवाना झाली. अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिममधले एकूण बाराशे तीस परप्रांतीय मजूर या गाडीतून रवाना झाले. या गाडीतल्या सर्व प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

Read More