Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

100 रुपयांचा स्टॅम्प, 50 हजार रुपयांच्या बदल्यात 18 महिन्याचा बाळदत्तक, आईवडिलांकडूनच लेकराचं बालपण धोक्यात!

Child Adoption:  18 महिन्यांच्या बाळाला अवैधपणे दत्तकपत्र करुन चक्क 50 हजार रुपयांत त्याची विक्री करण्यात आलीये. 

100 रुपयांचा स्टॅम्प, 50 हजार रुपयांच्या बदल्यात 18 महिन्याचा बाळदत्तक, आईवडिलांकडूनच लेकराचं बालपण धोक्यात!

Child Adoption: लातूरच्या उदगीर शहरातून एक हादरवणारा प्रकार समोर आलाय. अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एका बाळाला विकल्याची घटना उजेडात आलीय. 18 महिन्यांच्या बाळाला अवैधपणे दत्तकपत्र करुन चक्क 50 हजार रुपयांत त्याची विक्री करण्यात आलीये. काय घडलाय प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

दाम्पत्याने बाळाला दिलं दत्तक 

100 रुपयांचा स्टॅम्प...50 हजार रुपये आणि बाळाचा व्यवहार...ऐकून जरा विचित्र वाटलं ना?...पण हे असं घडलंय...दोन वर्षांपूर्वी लातूरच्या उदगीरमधील इंदिरा नगरमध्ये राहणा-या एका दाम्पत्याने आपल्या पोटच्या गोळ्याला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तक दिलं.अवघ्या 18 महिन्यांच्या बाळाला 50 हजार रुपयांमध्ये दत्तक देण्यात आलं. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता थेट या दाम्पत्याने आपल्या बाळाला दत्तक दिलं.

चिमुकल्याला शोधून उदगीरमधील बाल शिशुगृहात ठेवलं

हा व्यवहार करताना 5 जणांनी साक्षीदार म्हणून सह्या देखील केल्या. बालकल्याण विभागाने हा सर्व प्रकार  समोर आणलाय.याप्रकरणी आई-वडिलांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता पोलिसांनी त्या चिमुकल्याला शोधून उदगीरमधील बाल शिशुगृहात ठेवलंय.भारतात 'CARA' या केंद्र शासनाच्या यंत्रणेमार्फतच दत्तक प्रक्रिया राबवली जाते.

भारतातील दत्तक प्रक्रिया 

'CARA' द्वारे भारतात दत्तक प्रक्रिया होते. 'CARA'म्हणजे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण असून दत्तक घेण्याची इच्छा असल्यास, CARAवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्जदारांची कागदपत्र आणि पात्रता तपासली जाते. अर्जदाराची आर्थिक, सामाजिक स्थिती पाहिली जाते. अर्जदाराची मानसिक आणि शारीरिक क्षमता योग्य असावी. बाळ दत्तक घेण्यासाठी सर्व अटी पूर्ण करणं गरजेचं असतं.

दोषींवर कठोर कारवाईची गरज

लातूरमध्ये या बाळाला दत्तक घेताना आणि देताना कोणतीच कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली नाही. बेकायदेशीरपणे या बाळाला दत्तक देण्यात आलं. अनाथ, किंवा सोडून दिलेल्या मुलं दत्तक दिली जातात. मात्र ती दत्तक देताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते.इकडे लातूरमध्ये केवळ 50 हजारांसाठी आई-वडिलांनी आपल्या मुलाचं बालपण पणाला लावलं. असे प्रकार भविष्यात घडू नये म्हणून आताच या दोषींवर कठोर कारवाईची गरज आहे.

Read More