Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

झोपलेल्या लेकीवर बापाची वाईट नजर, आईला जाग आली तेव्हा...' संतापजनक प्रकार समोर!

Latur Crime:  लातूर जिल्ह्यात रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

झोपलेल्या लेकीवर बापाची वाईट नजर, आईला जाग आली तेव्हा...' संतापजनक प्रकार समोर!

Latur Crime: बाप-लेकीचं नातं हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. लेक आयुष्यात सर्वात जास्त वडिलांच्या खूप जवळची असते. तिला वडिलांच्या मनातील आनंद, दु:ख सारं कळतं. पण याच नात्याला कोण्या नराधम बापाने काळीमा फासला तर? लातूर जिल्ह्यात रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

देवणी तालुक्यातील एका गावात 45 वर्षीय बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी झोपलेली असताना आरोपी बापामधील राक्षस जागा झाला आणि त्याने यावेळी जबरदस्तीने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवरच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेनं आरडाओरड केली. यानंतर नराधम बापाचं काळं कृत्य समोर आलं आहे. पीडितेचा आवाज ऐकून तिची आई जागी झाली. 

मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाणं गाठलं. आपल्याच पती विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिंबधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

काकूशी अनैतिक संबंध, बिबट्याच्या हल्ल्याचा रचला कट

दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीमध्ये 7 डिसेंबर 2024 ला शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता. त्या महिलेला उसाच्या शेतात बिबट्याने फरफटत नेल्याचा प्रथमदर्शनी पोलिसांना वाटलं. या हल्ल्यात लता धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा त्यावेळी तक्रारदार पुतण्या अनिल पोपट धावडेने केला होता. पोलीस आणि वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह घटनास्थळावरुन हलवला गेला होता.तर वन विभागाने हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका व्यक्त पूर्वीच केली होती. मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन वन विभागाच्या नागपूरमधील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली. मृत महिलेच्या शरीरावरती कोणत्याही वन्य प्राण्यानं हल्ला करून मृत्यू झाला नसल्याबाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा अहवाल पोलिसांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केला असता धक्कादायक खुलासा झाला. आरोपींनी अनैतिक संबंधाच्या संशयातून लता धावडे यांना मारण्याचा कट रचला होता. पुतण्याने काकूचा दगडाने मारून खून केल्याचा पोलीस तपासात समोर आलं. 

ST बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी

लातूर-चाकूर मार्गावरील नांदगावपाटीजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस अहमदपूरवरून लातूरकडे येत होती. नांदगावपाटीजवळ अचानक बाईक बससमोर आली. बाईक चालकाला  वाचवण्याच्या नादात एसटी बस उलटली. टर्न घेत असताना हा अपघात झाला. बाईक स्वाराला वाचवताना एसटी बसच्या चालकाने भारधाव बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसचे नियंत्रण सुटले आणि टर्निंगवर बस उलटी झाली. बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

About the Author

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची स... Read more

Read More