Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मराठा आरक्षणासाठी आंदोलक चढले पाण्याच्या टाकीवर

आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा आंदोलक चक्क चढला पाण्याच्या  टाकीवर चढला.

मराठा आरक्षणासाठी आंदोलक चढले पाण्याच्या टाकीवर

लातूर : लातूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा आंदोलक चक्क चढला पाण्याच्या  टाकीवर चढला. माजी गृहमंत्री तथा काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरासमोरच ही टाकी आहे. यावेळी हातात झेंडा घेत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

लेखी आश्वासनाची मागणी 

परळी इथे गेल्या सोळा दिवसापासून सुरू असलेल्या ठिय्या  आंदोलनाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली,या बैठकीला 24 जिल्ह्यातून समन्वयक आले होते,आरक्षण जाहीर करा,मेगा भरती स्थगित करा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्या या प्रमुख मागण्या जोपर्यंत लेखी स्वरूपात सरकारच्या वतीने दिल्या जात नाहीत या ठिकाणी प्रत्येकाने आपली भूमिका जाहीर केली,यावेळी ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका मांडली.

मोजकेच मान्यवर सह्याद्रीवर

मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकार अनुकुल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं...मराठा आरक्षणासंदभातल्या चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती ती नुकतीच  संपली...बैठकीसाठी बोलावलेल्या ४८ मान्यवरांपैकी मोजकेच मान्यवर सह्याद्रीवर पोहचले.  मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन करण्याची विनंती यावेळी सरकारनं उपस्थित मान्यवरांना केली.

Read More