Viral Video: सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये वाघाची दहशत असेल किंवा बिबट्याची दहशत. असे व्हिडीओ पाहून अनेकांना रात्री घराबाहेर पडण्याची भीती वाटते. पण जर रात्री अचानक तुमच्या समोर बिबट्या आला तर काय होईल हे देखील सांगणं कठीण आहे. बिबट्याला पाहिलं तरी अनेकांना घाम फुटतो. मग तो जवळ आल्यावर काय होईल याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही.
दरम्यान, असाच काही प्रकार रस्त्यावर झोपणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्या व्यक्तीचे पुढे काय झाले असा विचार प्रत्येकजण करत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका दुकानाच्या समोर झोपलेला आहे. तेवढ्यात तिथे अचानक बिबट्या येतो. बिबट्या हळूहळू त्या झोपलेल्या व्यक्तीच्या समोर जातो. त्या व्यक्तीला पुढे बिबट्या पाहून काय करावे काहीच कळत नाही. मात्र, असं म्हणतात ना संकटच्या काळात शांत राहिलेलं कधीही चांगल असतं. तसाच तो बिबट्या समोर आला तरी जागचा हलला देखील नाही. त्याला पाहून बिबट्याने देखील माघार घेतली.
बिबट्या त्या व्यक्तीला काही न करता माघारी फिरला. सध्या याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आल्या असून हा व्हिडीओ 36 हजार लोकांनी पाहिला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, अचानक बिबट्या समोर आल्यामुळे या माणसाने काय केले पाहिजे होते. शेवट कर्म आहेत भावा. देव तारी त्याला कोण मारी. संकटाच्या काळात शांत राहिलेलं कधीही चांगलच असते. तर एका नेटकऱ्याने त्याने जे केलं त्याला संयम आणि शांतता म्हणतात. म्हणून आयुष्यात हे दोन्ही असणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यासोबतच त्याच्या धाडसाचे देखील अनेकांनी कौतुक केलं आहे.