Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ऑक्सिजन प्लांटसाठी या आमदाराची 1 कोटींचा आमदार निधी देण्याची घोषणा

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी 1 कोटींचा निधी वापरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ऑक्सिजन प्लांटसाठी या आमदाराची 1 कोटींचा आमदार निधी देण्याची घोषणा

कल्याण : वाढत्या कोरोनाचा धोका आणि ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी 1 कोटींचा निधी वापरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत तातडीने हा निधी मंजूर करून वर्ग करण्याची विनंती केली आहे.

कोरोनाच्या लढाईत ऑक्सिजन सर्वात महत्वाची गरज असून  ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोवीड रुग्णांचा वेग पाहता येत्या काही दिवसांत ऑक्सिजनची कमतरता आणखी मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. 

कल्याण पूर्वेतील महानगरपालकेची 2 कोवीड रुग्णालये ऑक्सिजन पुरवठयाअभावी अद्याप सुरू होवू शकली नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत महापालिकेला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भविष्यातील गरज लक्षात घेऊन कल्याण पूर्व भागात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. आणि याचसाठी आमदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने वर्ग करण्याची मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

Read More