Marathi Vs Hindi : राज्य सरकारने 1 ते 4 थी पर्यंत अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला राज्यभरातून मोठा विरोध होता. हिंदी सक्तीला मोठ्या प्रमाणात होत असलेला विरोध पाहून राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. राज्यभरात हिंदी सक्तीचा विषय प्रचंड चर्चेत असतानाच सोशल मीडियावर एका मुलीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या आईसोबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुलीची आई ही इंग्रजीमध्ये बोलत असून मुलीने आईला मराठीमध्ये दिलेलं उत्तर हे सर्वांना थक्क करणारे आहे. नेमकं मुलगी आईला मराठीमध्ये काय म्हणाली? पाहूयात सविस्तर
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
राज्यभरात हिंदी सक्तीचा मुद्दा प्रचंड गाजला. प्रचंड विरोधानंतर हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला. अशातच सोशल मीडियावर एका लहान मुलीच्या व्हिडीओची देखील तुफान चर्चा सुरु आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी जेवण करत असल्याच दिसत आहे. तिचे नाव ओवी असून ती नालासोपारा येथील रहिवाशी आहे. मराठी भाषेबद्दल असणारी तिची ओढ पाहून सर्वांनाच तिने थक्क केलं आहे.
व्हिडीओमध्ये ओवी ही तिच्या आईला मराठी भाषेचं महत्तव समजावून सांगताना दिसत आहे. तर तिची आई ही इंग्रजी शब्दाचा वापर करताना दिसत आहे. पंरतु, ओवी तिला इंग्रजी शब्द न वापरता मराठी शब्द वापरण्यास सांगताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आई ओवीला विचारते की, जेवण टेस्टी आहे का? त्यावर ओवी म्हणते की, टेस्टी बोलायचं नाही. मराठीत टेस्टी हा शब्द येत नाही. छान बोलायचं. जेवण छान आहे असं म्हणायचं असं ती तिच्या आईला सांगताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणार्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ vinu_tambitkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओपाहून नेटकरी कमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये काही नेटकरी इतक्या लहान वयात मुलीला येवढी समज आणि मराठी भाषेबद्दल आदर पाहून थक्क झाले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी आपल्या मुलांना देखील असेच संस्कार द्यावे असं म्हटलं आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारकडून रद्द
महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई भरवत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मराठीच्या मुद्द्यावर व हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी मुंबई उबाठा सेना आणि मनसे असा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आधीच जीआर रद्द करून ही मागणी पूर्ण केली. हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची भावना मनसे नेत्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.