Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Uddhav Thackeray LIVE Updates : उद्धव ठकारेंची तोफ थोड्याचवेळात महाडमध्ये धडाडणार

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे.

Uddhav Thackeray LIVE Updates : उद्धव ठकारेंची तोफ थोड्याचवेळात महाडमध्ये धडाडणार
LIVE Blog

Barsu Refinery Project Updates : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या दौ-यासाठी जोरदार तयारी केलीय.  तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणेही महामोर्चा काढणार आहेत. यात राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राणेंचे दोन्ही पुत्र सहभागी होतील.तेव्हा बारसूत ठाकरे आणि राणे आमनेसामने उभे ठाकलेले पाहायला मिळतील.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

06 May 2023
06 May 2023 14:49 PM

 सरकार मस्तीत, लाढ्या काठ्यांचा हिशोब करुच - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Barsu Refinery Project : प्रकल्प राबवला जावा यासाठी तुम्ही राज्यभरातील पोलीस इथे आणले आहेत. मस्ती चढलेल्या सरकारला वाटत असेल पोलिस आम्ही इथे आणले. आता या पोलिसांसमोर मी सगळ्या लोकांना घेऊन बारसूला  येईन. सुपारी बहाद्दरांना माझा आव्हान आहे, तुम्ही या ग्रामस्थांशी चर्चा का करत नाही ? इथे राज्यभरातील पोलीस तैनात करण्यात आलेत, इथे पोलीस झिम्मा फुगडी खेळत आहेत. राज्यातल्या पोलिसांनी हे विसरु नये की तुमची घर महाराष्ट्रात आहेत. जे पोलीस दंडूके मारतात त्या पोलिसांचे नेमकं काय करायचं ते बघू, या लाठ्या काठ्यांचा हिशोब सुद्धा आम्ही घेऊ. सरकारच्या खुर्ची आता हालायला लागले आहेत त्या खुर्च्या घट्ट पकडून ठेवा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मी ग्रामस्थांसोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात सहभागी राहील. रत्नागिरीमध्ये उदय सामंत हे पडणारच आहे.सरकार चर्चा करणार म्हणजे कशी करणार लाठा काठ्यांनी चर्चा होणार का ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

06 May 2023 12:31 PM

नारायण राणे यांनी दादागिरी शिकवू नये - अंबादास दानवे

Ambadas Danve on Narayan Rane : नारायण राणे यांनी दादागिरी शिकवू नये, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. आज ते बारसू येथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावर होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बारसू दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. बारसू रिफायनरी समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चात नारायण राणे सहभागी होणार होते. दरम्यान, बारसूमधल्या भाजपच्या दोन्ही मोर्चांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जवाहर चौक ते बारसू असा मोर्चा काढण्यासाठी भाजपने परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने ती नाकारली आहे. 

06 May 2023 12:23 PM

उध्दव ठाकरे कोकणाला लागलेला शाप - राणे

Nitesh Rane on Uddhav Thackeray : राज्यातला सर्वात मोठा दलाल बारसूत आला या शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. एवढंच नाही तर उध्दव ठाकरे यांनी रिफायनरीसाठी पत्र लिहिलं त्याची किंमत 100 कोटी होती, असा गंभीर आरोपही नितेश राणेंनी केला. कोकणाला लागलेला शाप म्हणजे उध्दव ठाकरे आणि विनायक राऊत असल्याची टीकाही राणेंनी केली. दरम्यान, बारसूमध्ये जिलेटीन आणि स्फोटकं आणणं सुरू आहे, असा खळबळजनक आरोप भाजप नेते नीलेश राणे यांनी केला होता. काही बाहेरचे लोक, ज्यांचा बारसू आणि कोकणाशी काहीही संबंध नाही, असे लोक घुसून ही कामं करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांना आता सचिन आहिरांनी प्रत्युत्तर दिले आहे. काड्या घालणा-यांनी कांड्याची चर्चा करणं दुर्दैवी असून, माहिती असल्यास एनआयएकडे तक्रार करावी, असे आव्हान दिले.

06 May 2023 11:49 AM

 हुकूमशाही लादू नका, नाहीतर महाराष्ट्र पेटवून टाकू - ठाकरे

Uddhav Thackeray  Solgaon Visit  :   हुकूमशाही लादू नका, नाहीतर महाराष्ट्र पेटवून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. आज राजापूरच्या सोलगाव येथे उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

06 May 2023 11:18 AM

सोलगाव येथे उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांशी साधला संवाद 

Uddhav Thackeray in Solgaon : रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सोलगाव येथे ठाकरे संवाद साधत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत.

fallbacks

06 May 2023 10:27 AM

भाजप कार्यकर्ते आक्रमक, प्रकल्प समर्थ मोर्चावर ठाम

BJP Morchya  :  भाजपच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आम्ही मोर्चा काढणारच असा निर्धार केला आहे. आम्ही मोर्चा काढणारच, अशी माहिती भाजप राजापूर तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, रिफारणारी समर्थक अनिफ काजी आणि  हर्षद घोसाळकर यांनी दिली आहे.

06 May 2023 10:14 AM

भाजपच्या दुसऱ्या मोर्चालाही परवानगी नाकारली

BJP Morchya  :  भाजपच्या जवाहर चौक ते बारसू मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरली असताना आता जवाहर चौक ते राजापूर तहसीलदार कार्यालय याही मोर्चाला परवानगी नाकरली आहे. त्यामुळे भाजपकडून मोर्चा रद्द करण्यात येणार का की परवानगी शिवाय मोर्चा काढणार का, याची उत्सुकता आहे.

06 May 2023 10:06 AM

उद्धव ठाकरे बारसू आंदोलन ठिकाणी पोहोचलेत

Uddhav Thackeray in Barsu : राजापूर तालुक्यातील बारसू प्रकल्प ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॅाप्टर लॅन्ड झाले. उद्धव ठाकरे आंदोलक लोकांची भेट घेणार

06 May 2023 10:03 AM

बारसू रिफायनरी ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त

Barsu Refinery Project :  अनुचित प्रकार घडू नये यासाठी 150 अधिकारी तर  1900 कर्मचारी,  एसआरपीएफ तसेच शीघ्र कृती दलाच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. राजापूर शहरासह बारसू रिफायनरी ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे,  तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा इथला बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

06 May 2023 09:36 AM

भाजपच्या जवाहर चौक ते बारसू  मोर्चाला परवानगी नाही

BJP Morchya in Barsu  :  भाजपने सुरुवातीला जवाहर चौक ते बारसू अशा मोर्चाला परवानगी मागितली होती, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर आत्ता जवाहर चौक ते राजापूर तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली आहे. ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

fallbacks

06 May 2023 08:59 AM

नारायण राणे, उदय सामंत मोर्चाला येण्याची शक्यता कमी

Barsu Refinery Project Updates : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन ठिकाणी बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांना भेटणार देणार आहेत. त्याचेवळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे मोर्चाला येण्याची शक्यता कमी आहे. राजापूर येथील समर्थनार्थ मोर्च्याला येण्याची शक्यता कमी आहे. कारण उदय सामंत सध्या कर्नाटक प्रचार दौऱ्यावर बंगळुरुमध्ये आहेत.

06 May 2023 08:54 AM

बारसू येथे कडक पोलीस बंदोबस्त

Tight Police security in Barsu : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे महामोर्चा काढणार असल्याचे बारसू प्रकल्प ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

06 May 2023 08:52 AM

उद्धव ठाकरे दोन ठिकाणी बारसूत विरोधकांना भेटणार 

Uddhav Thackeray Barsu Visit  : उद्धव ठाकरे  दोन ठिकाणी बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांना भेट देणार आहेत. राजापूर तालुक्यातील सोलगाव फाट्यावर आणि गिरमादेवी परिसरात उद्धव ठाकरे विरोधकांना भेटणार आहेत. सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ या ठिकाणच्या विरोधकांशी संवाद साधतील. तर गिरमादेवी कोंड या ठिकाणी बारसू आणि परिसरतातील विरोधकांची भेट घेतील.

कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान

06 May 2023 08:50 AM

उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना 

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईहून कोकणातील बारसूकडे रवाना झाले आहेत.

06 May 2023 08:39 AM

'लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, ठाकरे हे लोकांना समजून घेणार'

Sachin Ahir on Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी आपली बाजू मांडली आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे.  रोजगार जारी असला तरी ती जागा कोणाची आहे, याला विश्वासात घेतलं पाहिजे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बारसूला जात आहेत, आणि लोकांना समजून घेणार आहेत. नारायण राणे.  शासनात जे प्रतिनिधी आहेत ते ऐकण्याच्या भूमिकेत नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था टीकावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे.  हे मित्र पक्षातील लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. राज्य सरकारची जबाबदारी आहे.  आम्ही ती जबाबदारी प्रयत्न करत आहोत. आम्ही सभा करणार होतो पण पारवानगी नाकारली. 

06 May 2023 08:37 AM

वैभव नाईक यांचे राणे यांना थेट आव्हान

Vaibhav Naik on Narayan Rane : नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांना अडवून दाखवावं असं आव्हान वैभव नाईक यांनी राणेंना दिले आहे. उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये येतायत म्हणून राणे आज मोर्चा काढणार आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी प्रकल्पग्रस्तांशी भेटून चर्चा करावी. मात्र, ते तसं करत नाहीत, कारण ते त्यांना हाकलून देतील, अशी टीका नाईकांनी राणे यांच्यावर केली आहे.

06 May 2023 08:35 AM

राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा

Raj Thackeray's Sabha in Ratnagiri : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होते आहे. या सभेत ते कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. बारसू प्रकल्पाविरोधात मनसेही आपली भूमिका मांडली आहे. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नको, असे मनसेकडून सांगण्यात आले होते. आजच उद्धव ठाकरेही कोकणात आहेत. त्यांचा बारसूत दौरा असून, राज ठाकरे रिफायनरीबद्दल काय बोलणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

06 May 2023 08:32 AM

उद्धव ठाकरे, नारायण राणे आज बारसूत

fallbacks

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. तर बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, त्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.

कोकणात बारसू प्रकल्प नको, अशी येथील जनतेची मागणी आहे. राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला होता. यावेळी त्यांनी तीन दिवस आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. तर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. पोलिसांनी धरपकड करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ताब्यात घेतले होते. तर काही आंदोलक नेत्यांना अटक केली होती. त्यामुळे या आंदोलनात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. लोकांशी चर्चा करा. त्यांना समजून सांगा. केवळ लाठ्याकाट्याच्या जोरावर आणि पोलिसी बळावर हा प्रकल्प लादू नये, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे.

Read More