Maharashtra Breaking News Today LIVE Updates 07 August 2025: महाराष्ट्रात कोल्हापुरातील नंदिणी मठावरील हत्तीण महादेवी उर्फ माधुरीचा विषय तापला आहे. तर दिल्लीत उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. अमेरिकेकडून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा केलीय. भारतीय मालावर अमेरिकेत आता 50 टक्के कर असणार असून त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. तर मुंबई पोलीस गुन्हे शाखेची मोठी कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने 5 शूटर्सना अटक केली आहे. या सर्व घडामोडींसह दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत.
'राहुल गांधींची चिप चोरीला, हार्डडिस्क करप्ट,' CM देवेंद्र फडणवीसांनी सगळंच काढलंhttps://t.co/zMcsoWkBD0#RahulGandhi #DevendraFadnavis #MaharashtraPolitics
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
भारतासाठी महासत्ता भिडणार? ट्रम्प यांच्या 50 टक्के Tariff नंतर मोदी सरकारचं धाडसी पाऊल; डोवाल यांनी केली घोषणाhttps://t.co/6lx214fazt#DonaldTrumpTariffs #Putin #ustarrifs #NarendraModi
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींना पत्र पाठवून फटकारले आहेत. या पत्रात त्यांनी राहुल गांधींना इशारा देत म्हटलं आहे की, नागरिकांना चुकीची आणि निराधार माहिती देऊ नये. खोटे आरोप थांबवा किंवा दस्तऐवज सादर करा, अशी स्पष्ट सूचना आयोगाने केल्या आहेत. महादेवपूरा मतदारसंघात 1,00,250 बनावट मतदार असल्याचा राहुल गांधींचा आरोप केला होता. या मतदारसंघातून भाजप उमेदवाराने 32,707 मतांनी विजय मिळवला आहे. तर कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडूनही राहुल गांधींना पत्र पाठवले आहे. राहुल गांधींच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 1779 अश्लील फोटो अन् 252 व्हिडिओ; मोलकरणीसोबत आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकरांची खळबळजनक माहिती#maharashtrahttps://t.co/By39hdaMom
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
11 ऑगस्ट रोजी ठाकरेंच्या शिवसेनेच राज्यात आंदोलन करणार आहे. महायुतीतील सरकारच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन करणार आहेत. महायुतीतील अनेक मंत्र्यावर आरोप आहेत यार मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जनआक्रोश आंदोलन आहे. मुंबईत शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन होणार आहे. कंलकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन आहे.
'राहुल गांधींची चिप चोरीला, हार्डडिस्क करप्ट,' CM देवेंद्र फडणवीसांनी सगळंच काढलंhttps://t.co/zMcsoWkBD0#RahulGandhi #DevendraFadnavis #MaharashtraPolitics
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
High Court on Kabutar Khana: कबुतरांना अन्न, पाणी द्यायचं नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, बंदी कायमhttps://t.co/pG3dKQx8l8#Dadar #kabutarkhana #HighCourt #Piegon
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
'अरे इथला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे?', अजित पवारांनी सर्वांसमोर दिली तंबी, 'तू माझ्या हाताखाली...'https://t.co/wz8bcpz8hZ#AjitPawar #NCP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या आंब्याच्या बागेत देवगड हापूस कलमांना मोहर आला आहे. चक्क जुलै महिन्यातच हा मोहर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थंडीच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर जुलै महिन्यात आल्यामुळे कुतूहलाचा विषय बनला आहे. हा मोहर फोंडेकर यांनी औषध फवारण्या करून भर पावसाच्या हंगामातही टीकवून ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार होणार असून आंबा पेटीला दहा हजारापर्यंत भाव मिळणार आहे. फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी असून या अगोदर सुद्धा त्यांनी गेल्या वर्षी मालवण तालुक्यातून पहीलीच पाच डझनाची हापूस आंब्याची पेटी गोव्याला पाठवली होती.
खालिद का शिवाजी चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाने ही नोटीस पाठवली आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथानकासाठी कोणते इतिहासकालीन पुरावे, तज्ज्ञांचे संदर्भ घेतले ते सादर करा, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. आजच व्हीसीद्वारे भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या चित्रपट प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह कायम हे.
'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान मोठा घोटाळा'; राहुल गांधींनी थेट पुरावे देत मांडले 5 महत्त्वाचे मुद्देhttps://t.co/Ej6cgskDq9
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
EPFO कडून एकाएकी महत्त्वाच्या नियमात मोठा बदल; आता UAN क्रमांकासाठी आधार कार्ड...https://t.co/OKnDUfAX7v
EPFO नुसार काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया. तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? नोकरदार वर्गानं चुकूनही दुर्लक्ष करू नका अशी माहिती. शेवटी प्रश्न तुमच्याच पगारातून कापल्या गेलेल्या…
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
सौरव गांगुली पुन्हा होणार क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष? 3 वर्षांनी पुन्हा करू शकतात नेतृत्वhttps://t.co/2bW65w5bG7
ZEE २४ तास (zee24taasnews) August 7, 2025
राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला आणि ते एकमेकांवर भिडल्याचा प्रकार गडचिरोलीच्या सर्किट हाऊस मध्ये बघायला मिळाला. शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सर्किट हाऊस मध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यामुळे जिल्हाभरातील बहुसंख्या शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. मात्र मंत्री भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरीतुमरी झाली आणि एकमेकांवर भिडले. त्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत झालेल्या कथित हेराफेरीबाबत विधान केलंय. राहुल गांधी म्हणालेत की, महाराष्ट्र निवडणुकीच्या गेल्या 5 महिन्यांत बरेच मतदार जोडले गेले आहेत. राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्र निवडणुकीत मतदानात फसवणूक झाली आहे. या काळात 40 लाख बनावट मते टाकण्यात आली. राहुल गांधी यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ते पुढे म्हणालेत की, संध्याकाळी 5 वाजेनंतर अचानक मतदान वाढले.
LIVE: Special press briefing by LoP Shri @RahulGandhi | #VoteChori | AICC HQ, New Delhi. https://t.co/3WzBejfgrw
— Congress (@INCIndia) August 7, 2025
Maharashtra Breaking News Live Update: महाराष्ट्रातील निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर शंका घेतली असून मतदार याद्या, मतदान प्रक्रिया आणि ईव्हीएम संदर्भात अनेक आरोप केले आहेत. राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रात पाच महिन्यांत एवढे मतदार वाढले की गेल्या पाच वर्षांत झाले नाहीत.
Maharashtra Breaking News Live Update: मतदार यादी घोळाचा अभ्यास करण्यासाठी टीम केली. तेव्हा अभ्यासात बोगस मतदानाचे पुरावे सापडले, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला का अशी चर्चा आता सुरु झालीय. कारण दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली. या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली.. शिंदे आणि अमित शाह यांच्या बैठकीतही पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली होती.. त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याच्या अमित शाह यांनी सूचना केल्या होत्या.. त्यानंतर शिंदे आणि तटकरे यांची चर्चा झाली. 15 ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदा बाबतचा निर्णय घेतल जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.. त्यामुळे 15 ऑगस्टला नव्या पालकमंत्र्यांकडून ध्वजारोहण होणार का हे पाहावं लागेल.
श्रावणात नारळाच्या दरात उसळी; तीन दिवसांत 1600 टन विक्री, एका नारळाचा दर किती?#CoconutPriceHike #Coconut #Trending https://t.co/4MwOzXc3G1
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करत आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवलेले काही महत्वाचे चेहरे यामध्ये सामील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग होत असताना आता काँग्रेस मध्ये देखील पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळत आहे.
उधमपूरमध्ये CRPFच्या जवानांच्या गाडीला भीषण अपघात झालाय... बसंतगडमध्ये CRPFच्या जवानांची गाडी खड्ड्यात पडलीये.. या दुर्घटनेमध्ये दोन जवानांचा मृत्यू झालाय तर 16 जवान जखमी झालेत.. जखमी जवानांना उपचारासाठी उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
शाळेतील मित्रमैत्रिणी बऱ्याच वर्षांनी भेटले, उत्तराखंडला गेले आणि... पुण्यातील पर्यटकांशी संपर्क होईनाhttps://t.co/EYYvGUSg22
उत्तराखंडमध्ये झालेल्या पुरामध्ये गाव, बाजार सारंकाही ढिगाऱ्याखाली गेलं आणि काहींनी जीव मुठीत घेऊन पळ काढला. संपर्क होत नाही त्यांचं काय?#news…— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
मुंबई-अहमदाबाद फक्त 3 तासांत, मुंबईच्या समुद्राखाली ट्रेनचा बोगदा, 350 किमी वेगाने धावणार ट्रेनhttps://t.co/uQgIwnPdCT
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
‘शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीये’; भाजपा- शिंदेंची सेना आमने-सामने, महायुतीचं वाढणार टेन्शनhttps://t.co/sygOfMYbhx
महायुतीचं टेन्शन वाढणारी बातमी... नक्की घडलंय काय जाणून घ्या...#maharashtra #MaharashtraNews #MaharashtraPolitics #EknathShinde #nandurbar #BJP— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
'त्या' शेतकऱ्यांना मोदी सरकार देणार 36 हजार रुपये! एक पैसाही खर्च न करता कसा घेता येईल लाभ?https://t.co/3qRzvOLx6v < येथे वाचा सविस्तर वृत्त...#pradhanmantri #kisan #kisanmaandhanyojana #yojana #pmkmy #farmers #farmersscheme #scheme
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
बीडमध्ये फसवणुकीचा नवीन फंडा, लग्न जुळवून देतो म्हणत चार महिलांची 1.5 लाखांची फसवणूक#beedcrime #CrimeNews #Trending https://t.co/9jvf27cu9i
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
महाराष्ट्रात जमीन मोजणी हायटेक होणार! अनेक प्रश्न सहज सुटणार; असा आहे सरकारचा मास्टर प्लॅनhttps://t.co/HlFDa84MqP
मोजणीची पद्धत बदलणार; राज्य शासनाच्या दिमतीला अत्याधुनिक तंत्रज्ञान, सामान्यांना कसा होणार फायदा?#Maharashtra #news #landsurey— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
युतीबाबत निर्णय घेण्यास मी आणि राज समर्थ. आमच्या युतीच्या निर्णयात तिसऱ्याची गरज नाही. काय करायचं हे आम्ही दोघं भाऊ ठरवू, असं प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध नको, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौ-याचा आज दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दिल्लीत आहेत... काल दिल्लीत त्यांचं स्वागत करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब शरद पवारांची काल भेट घेतली,. आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसंच 11 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे. रात्री राहुल गांधींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
Maharashtra Breaking News Today: 'कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा', अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांना दिल्यात. तसंच विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही. मनपा, झेडपी निवडणुकांच्या कामाला लागा, अशा सूचनाही शिंदेंनी केल्यात.
Maharashtra Breaking News Today: सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. यंदाच्या हंगामातील 106.9 मिमी उच्चांकी पावसाची नोंद झालीये. पावसामुळे बाळे परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. 9 ऑगस्टपर्यंत सोलापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
Maharashtra Breaking News Today: जालन्यातील परतूरमध्ये माजी नगरसेवक आणि अधिका-यांमध्ये गोंधळ उडालाय. नगर परिषद कार्यालयाच्या स्थलांतरावरुन हा गोंधळ उडालाय..यानंतर माजी नगरसेवक जिल्हाधिका-यांकडे अधिका-यांची तक्रार करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलीये. सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा असून त्यांना जनहिताशी काहीही देणंघेणं नाहीये.. तुम्ही संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या. आणि सरकारला सळो की पळो करून सोडा.. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना स्पष्ट आदेश दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांसोबत झालेल्या वादानंतर पालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार सुरक्षेचा स्तर वाढवण्यात आला आहे.
मुंबईतील सततच्या पावसामुळे लोकल सेवा प्रभावित झाली आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या सध्या 10 ते 15 मिनिटांच्या उशिराने धावत आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पहिल्यांदाच मोठा निर्णय. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकण शॉप ,मटन शॉप आणि मोठे जनावराचे कत्तलखाने बंद राहणार.
पुणे विमानतळावर पुणे भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला उड्डाण रद्द करण्यात आले आहे. विमानतळांवर वारंवार कुत्रे बिबट्या,पक्षी, येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासाच्या सुरक्षेतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे विमानतळवरून भुवनेश्वरला उडदाण्याच्या तयारीत असलेलं 1098 हे विमान रद्द करावा लागला आहे. पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेडने कमी झाल्या पायलटला वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे काल विमान उड्डाण रद्द करण्यात आले.
पुणे मनपात मनसेच्या आंदोलनानंतर अधिकारी कर्मचारी आक्रमक झालेत. अधिकारी कर्मचारी आज कामबंद आंदोलन करणार आहेत. यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत प्रशिक्षकाकडून 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत#MumbaiCrime #CrimeNews #Trending https://t.co/iGiIXAEF0m
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले. वणी तालुक्यातील अडेगाव, पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर व कृष्णापूर, मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा पिसगाव आणि यवतमाळ तालुक्यातील रोहटेक शेतशिवारात या घटना घडल्या. येळाबारा येथील एका व्यक्तीच्या 12 शेळ्याही अंगावर वीज पडल्याने मृत्युमुखी पडल्या
दहशतवादी कारवाया किंवा समाजकंटकांकडून काही घातपाती कारवाया होण्याची शक्यता असल्याचा अहवाल देत देशातील विमान सेवेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या संस्थेने देशातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट जारी केला आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रामुख्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट रोजी हा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये अधिक वाढ करत सतर्कता वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. विमानतळ, धावपट्टया, हॅलीपॅड्स, विमान प्रशिक्षण संस्था अशा सर्वच ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानतळ आणि परिसरातील सीसीटीव्हीवरदेखील लक्ष ठेवण्यात यावे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या परिसरातील पोलिसांशी नियमित संपर्क ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानातील प्रवाशांचे सामान तसेच मालवाहतूक करणाऱ्या विमानांतील सामानांची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. कर्मचारी, कंत्राटदारांची नियमित व काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश आहेत.
यवतमध्ये जमावबंदीचे निर्बंध सकाळी 6 ते 11 पर्यंत शिथिल करण्यात आले आहेत. दौंड तालुक्यातील यवतमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या जमावबंदी आदेशात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अंशत: शिथिलता दिली आहे. 1 ऑगस्टपासून लागू असलेला जमावबंदी आदेश आता पुढील आदेश होईपर्यंत दररोज सकाळी 6 ते 11 या वेळेत शिथिल करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा जमावबंदी लागू राहील. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम 163 अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला होता. याच्या उल्लंघनास भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 नुसार शिक्षेस सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्याबाहेरुन 25000 EVM आणून निवडणुका घेण्यास UBT चा विरोध; म्हणाले, 'फडणवीसांचे...'https://t.co/jfXGqlya1H < येते वाचा सविस्तर वृत्त...#maharashtra #uddhavthackeray #shivsena #ElectionCommissionOfIndia #ElectionCommission
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 7, 2025
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने 5 शूटर्सना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपी कडून 4 पिस्तूल आणि 51 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी हरियाणाचे असल्याचे सांगितले जात आहे
पोलिसांनी आरोपींना कॉटन ग्रीन स्टेशनजवळ मंगळवारी अटक केल्याची माहिती
याबाबत अधिक चौकशी गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक मार्फत शुरु आहे
अमेरिकेकडून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा केलीय. भारतीय मालावर अमेरिकेत आता 50 टक्के कर असणारय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ कर लादल्यानंतर आता भारतानं त्यांची बाजू मांडलीय. अमेरिकेचा टॅरिफ कर चुकीचा असल्याचं सांगण्यात आलंय.. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेणे अत्यंत दुर्दैवी असल्याचं भारतानं म्हटलंय. तर ट्रम्प सरकारने जाहीर केलेले वाढीव टॅरीफ आजपासून लागू होणार आहे.
आज उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता असणार आहे. त्यापूर्वी ते सकाळी 11 संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयाला भेट घेणार आहेत त्यानंतर रात्री उद्धव ठाकरे INDIA आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.