Maharashtra Breaking News Today LIVE Updates1 August 2025: महाराष्ट्रात सध्या राजकीय अनेक वेगवगेळ्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले आहे तर दुसरीकडे एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट जाणून घेऊयात एका क्लिकवर
RBI कडून 2 प्रसिद्ध बँकांच्या विलीनीकरणाला मान्यता, ग्राहकांवर काय होणार परिणाम? तुम्हाला माहिती असायला हवं!#RBI #BankMerger https://t.co/KbwrQXnreV
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 2, 2025
भारतातील बड्या बॅंकेत ₹50000000000 चा पेपर लोन घोटाळा, मोडस ऑपरेंडी ऐकून डोकं चक्रावेल!#BankScame #RBI https://t.co/kfeLGtwsU8
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 2, 2025
- मालेगावात भर रस्त्यावर खून झाला आहे. - वाढत्या गुन्हेगारीने मालेगाव झाले बीड अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शहरातील नानावटी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. तीन लोकांनी दुचाकीवर येऊन उभ्या असलेल्या युवकाचा खून केला आहे. धारधार शस्त्र, लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर दगड घालून खून केल्याच उघडकीस आले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या समीर कुलकर्णी यांनी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सहभाग असल्याची कबुली देण्यासाठी प्रचंड दबाव पोलिसांनी टाकल्याचा आरोप केला आहे. येत्या काळात काँग्रेसचा समूळ नायनाट यासाठीच आपण काम करू अशी भूमिका कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन महादेवी..' वनताराचे सीईओ-नांदणी मठ स्वामींमध्ये दीड तास चर्चेत काय निर्णय झाला?#Mahadevihttps://t.co/bX5RXz5G8l
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 1, 2025
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आता कोल्हापूरात सुरु होणार आहे. 18 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच म्हणजे खंडपीठ सुरू होणार आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी सर्किट बेंचचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे.
काही दिवसापूर्वी इथे जी घटना घडली. त्यानंतर काही स्थानिक प्रतिनिधींना भाषणं केली. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये एक घटना घडली त्यामध्ये मोबाईलला एक पोस्ट केली. त्यानंतर इथे गडबड झाली. पण मी यवतकरांना, दौंडकरांना आणि पुणेकरांना सांगू इच्छितो, की परिस्थिती आटोक्यात आणण्यात आलेली आहे. कोल्हापूर रेंजचे प्रमुख, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख इथे आहेत. सगळा बंदोबस्त येथे आहे. सगळं आता आटोक्यात आहे. काही सहकाऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की, आम्ही सलोख्याने यवतमध्ये राहतो. यवतमध्ये असा प्रकार कधीच घडलेला नाही. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका.
पोस्ट टाकणारी व्यक्ती मुळची यवतची नाही. ती व्यक्ती नांदेडहून आलेली आहे. सगळीकडे उत्सवाच वाचावरण आहे त्याला गालबोट लागता कामा नये. काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
यवतमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी अजित पवार घटनास्थळी रवाना झाले आहेत. पुण्यातील नियोजीत कार्यक्रम सोडून अजित पवार निघाले असल्याची माहिती मिळत आहे.
दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव पहायला मिळाला. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणाव. संतप्त जमावानं रस्त्यावरील दुचाक्या पेटवल्या. आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला.
नांदणी मठाचे मठाधिपती तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीतून बाहेर पडले आहेत. या दम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यमांशी बोलायला स्वामीजींनी नकार दिला आहे. बैठकीतून का बाहेर पडले यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अद्यापही वनताराचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नांदणीकरांची जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत मधील एका समाजातील व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर दुपारी बारानंतर यवतमधील आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे यवत मध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या आहेत. आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या सय्यद नावाच्या व्यक्तीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.
या प्रकारामुळे यवत गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तनावाच्या पार्श्वभूमीवर येवत पोलिसांनी यवत भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. शनिवारी 26 जुलै रोजी यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच आज झालेल्या या प्रकारामुळे यवत परिसरात तणावाचे वातावरण आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकार नगर भागात राहत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्याच्या घराची तोडफोड देखील केली आहे.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी यवत भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीवर वनतारा आणि नांदणी मठामध्ये चर्चा होणार आहे. यासाठी गुजरात वनताराची टीम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. नांदणी मठाधीपती आणि वनतारा टीममध्ये बैठक होणार आहे. वनतारा टीमचे CEO आणि मठाचे प्रमुख याच्यामध्येच ही बैठक होणार आहे. या बैठकीत कोणतेही खासदार नसणार अअशी माहिती मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सट्टेबाजी अॅप्सवर नियंत्रणासाठी सर्व राज्य सरकारांना नोटीस जारी केली आहे.
ऑनलाईन आणि ऑफलाइन सट्टेबाजी रोखण्यासाठी दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने केंद्र आणि राज्यांकडून उत्तर मागवले आहे.
Dream11, MPL, A23, Google India, Apple India, TRAI, RBI आणि ED यांना सुप्रीम कोर्टाने उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सट्टेबाजी अॅप्सवरील नियंत्रणाबाबत देशव्यापी धोरण तयार करण्याची गरज याचिकेत मांडण्यात आली आहे.
सरकारवर मुंबई प्रसन्न! महिन्याभरात राज्याच्या तिजोरीत टाकले तिजोरीत ₹ 1,100,00,00,000 कोटी; इतका पैसा आला कुठून?https://t.co/bEPtvhp6fg
मुंबईची श्रीमंतीच आणखी काय? राज्याच्या तिजोरीत या मायानगरीनं इतका पैसा कुठून दिला... पाहून तुम्हीही व्हाल हैराण! #news #mumbainews #money— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 1, 2025
अजित पवारांकडून कृषी खात्याची ऑफर होती, मंत्री छगन भुजबळ यांचा मोठा दावा....खातेवाटपादरम्यान अजित पवारांनी कृषी खातं घेण्याचा आग्रह केल्याचा भुजबळांचा दावा
यंदा राज्यातील सुमारे 1.50 लाख गोविंदांना "गोविंदा समन्वय समिती (महा.)" या नियोजन समितीच्या माध्यमातून "ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी" चे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 1.25 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून 1.50 लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवले जाणार आहे. यावर्षी राज्यभरातील अंदाजे 150000 गोविंदांना विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत "दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई" या कंपनीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे
उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी एनडीए बैठक घेणार आहे. उमेदवार एनडीएचा असेल. निवडणुकीची तारीख ९ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. त्यापूर्वी एनडीएचे सर्व मोठे नेते बैठक घेणार आहेत. त्यानंतरच उमेदवाराचे नाव अंतिम केले जाईल
Monsoon Update : पाऊस गणपती गाजवणार; मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याबाबत IMD नं स्पष्टच सांगितलं... https://t.co/1t8T3cgvVU
मान्सूनचा दुसरा टप्पा सुरू; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस... IMD च्या इशाऱ्यानं वाढवली अनेकांची चिंता. #Weather #IMD #Rainalert— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 1, 2025
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले आहेत. धरण 92 टक्के भरलं असल्यानं 27 पैकी 18 दरवाजे उघडण्यात आलेत. दरम्यान अजूनही 18 हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक जायकवाडी धरणात सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आलेत. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
पनवेलमध्ये शेकापच्या वर्धापनदिनी राज ठाकरे मार्गदर्शन करणार असून उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र येणार आहेत.
सुप्रिया सुळेंनीही माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केलीये. कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केलीये..
Manikrao Kokate : 'रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून कोकाटेंना क्रीडामंत्रीपद', म्हणत सत्ताधाऱ्यांना कोणी झापलं? https://t.co/ZcRm0TbwrV
'कोकाटेंना इतकं महत्त्वाचं खातं दिलं जातं यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही'; असं कोण म्हणतंय? #news #ManikraoKokate #Maharashtra— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 1, 2025
बारामती इंदापूर एसटी मध्ये एकावर कोयत्याने वार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. चालू एसटीत एकानं कोयत्याने वार करत त्याला गंभीरित्या जखमी केलेला आहे. आणि स्वतःवरती देखील वार करून घेतले असल्याची माहिती प्रवाशांनी दिलेली आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी आली असता हा सगळा प्रकार घडलेला आहे
राज ठाकरे मनसेच्या शिबिरासाठी रवाना झालेत. बोरिवलीमध्ये मनसेचं आज एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. यावेळी राज ठाकरे पदाधिका-यांना मार्गदर्शन करतील. मराठीचा मुद्दा, मुंबई मनपा निवडणुका आणि पश्चिम उपनगरातील इतर भाषिक मतदार यावर या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे. मातोश्रीवारीनंतर होणा-या पहिल्याच कार्यक्रमात राज ठाकरे कार्यक्रमांना कोणता मंत्र देणार याकडं लक्ष लागलंय..
नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे. दुसऱ्या रुग्णच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. या रुग्णालयात एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. ग्रामीण रुग्णलयातील महिला वार्डात उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आरोग्य यंत्रनाच सलाइनवर असल्याचे दिसून येत आहे. आता आरोग्यमंत्री या प्रकारावर काय उत्तर देतील हे पाहावे लागणार आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काहीच फरक पडणार नाही असा दावा मंत्री संजय राठोड यांनी केलाय.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील गळती सुरुच राहील असा दावा त्यांनी केलाय. यवतमाळमध्ये 10 हजारांहून अधिक कार्यकर्ते शिवसेनेच येण्यास इच्छुक असल्याचं ते म्हणालेत. एकनाथ शिंदेंनी वेळ द्यावा आणि या कर्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करुन घ्यावा अशी मागणी त्यांनी केलीये.
पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव घेतला आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरुन गाडी चालवत असताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्या मध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून गाडी घसरली. यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा तोल गेला. मात्र तेवढ्यात ज्येष्ठ नागरिक मागून आलेल्या कारच्या खाली चिरडले गेले. जगन्नाथ काशिनाथ काळे असं ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे.
'तू चांगली सापडली आहेस', 56 वर्षीय शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थिनीला धमकावून विनयभंग, गुन्हा दाखल#solapur #CrimeNews #solapurcrimenewshttps://t.co/rpUaJDs9tn
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 1, 2025
एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा...व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आलीये...ओएमसींनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे...गेल्या महिन्यातही किमती 58.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या...हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत...मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलं नाहीये...
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीये.. त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिलेत.. पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आलीये.. यामध्ये संतोष साबळे आणि एपीआय सपकाळ या अधिका-यांचा समावेश करण्यात आलाय...
पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरसह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशेष न्यायालयात अपील केलं. पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे खेवलकर आणि इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी केली. त्यानंतर आरोपींना पुन्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र विशेष न्यायालयाने देखील पुणे पोलीसांची मागणी फेटाळली आणि सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला. पुणे ड्रग्जप्रकरणी दोन्ही न्यायालयांनी पुणे पोलिसांची मागणी फेटाळली.
धारावी प्रकल्पाच्या विरोधात मविआनं आक्रमक पवित्रा घेतलाय..धारावी प्रकल्पाविरोधात मविआनं आज मुलुंड बंदची हाक दिलीये.. प्रकल्पाविरोधात काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी हे आज सकाळी उपोषणाला बसणार असून या ठिकाणी वर्षा गायकवाड सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलीय. यांत मध्य प्रदेशातील इटारसी आणि नागपूरला जोडण्यासाठी चौथ्या रेल्वे मार्गासाठी तब्बल 5 हजार 451 कोटींची तरतूद करण्यात आलीय.. संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेर मार्गिकेसाठी 2 हजार 179 कोटींची तरतूद करण्यात आलीय... तसेच रेल्वेसाठी 11 हजार 169 कोटींची तरतूद करण्यात आलीय... राष्ट्रीय सहकारी विकास संस्थेला सक्षम बनवण्यासाठी 2 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी 6 हजार 520 कोटींची तरतूद करण्यात आलीय...
इंग्लंडच्या फायद्यासाठी ओव्हलमध्ये श्रीलंकेच्या अंपायरने फसवणूक केली? Video पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्यhttps://t.co/miummgzsC9 #INDvsENG #OvalTest #KumarDharmasena #viralvideo
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 1, 2025
आजपासून UPI शी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. UPI सिस्टमचे व्यवस्थापन करणाऱ्या NPCI ने नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत जेणेकरून सिस्टमवरील दबाव कमी होईल. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत.
देशात सणासुदीचा हंगाम सुरू होतोय. यासोबतच मोठ्या संख्येने लोक भारतात येतात किंवा देशात अनेकजण नातेवाईकांकडे तसेच येथे भेट देण्यासाठी विमानाने प्रवास करतात. अशातच विमान प्रवास महागणार आहे. कारण तेल मार्केटिंग कंपन्यांनी मोठा धक्का देत विमानाचे इंधन महाग केलंय. ATF अर्थात एव्हिएशन टर्बाईन इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ झालीय.. ATFमध्ये 2 हजार 677 रुपये प्रति लिटर वाढ झालीय. ATFमध्ये वाढ झाल्यानं विमान प्रवास महागणार आहे...
एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा...व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आलीये...ओएमसींनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे...गेल्या महिन्यातही किमती 58.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या...हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत...मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलं नाहीये...
विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आलं आहे. कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर भरणे यांच्याकडे आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. कोकाटेंचं खातं बदललं जाणार ही बातमी झी २४ तासनं दाखवली होती. झी २४ तासच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता. परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
मनसेचं आज मुंबईत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. पश्चिम उपनगरातील पदाधिका-यांच्या या शिबिराला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज ठाकरे पदाधिका-यांना मार्गदर्शन करतील. मराठीचा मुद्दा, मुंबई मनपा निवडणुका आणि पश्चिम उपनगरातील इतर भाषिक मतदार यावर या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लावलेल्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन कुटुंबाला दरवर्षी सरासरी सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिलाय.. अमेरिकेतील सर्वसामान्य नाकरिकांवर याचा सर्वाधिक भार पडणार असल्याचेही एका अहवालात म्हटलंय.. येल विद्यापीठातील 'द बजेट लॅब' या संस्थेचे अर्थशास्त्र विभागाचे संचालक एर्नी टेडेस्ची यांनी हा अहवाल मांडलाय.. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची किंमत सर्वसामान्य अमेरिकन कुटुंबांना स्वतःच्या खिशातून मोजावी लागणार आहे. हा अहवाल ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ जाहीर केल्याच्या दिवशीच प्रसिद्ध करण्यात आलाय.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.