Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 Aug 2025: दिवसभरात राज्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी आणि राजकारण ते समाजकारणापर्यंतचे सर्व अपडेट्स, यासह क्रीडा वर्तुळ आणि देश-विदेशातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा लेखाजोखा पाहा झी 24 तासच्या दैनंदिन Live Blog मध्ये. एका क्लिकवर जाणून घ्या नेमकं कुठं घडतंय काय....
1 ऑगस्ट रोजी दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणावानंतर शांतता पाहायला मिळत आहे, याशिवाय राज्यात कोणत्या घटना वेधणार लक्ष.... पाहा Live Updates...
7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लोमसी असणार आहे. डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. डिनर डिप्लोमसीत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या कामकाजावर इंडिया आघाडीत चर्चा होणार आहे. यासह परराष्ट्र निती आणि देशाच्या आर्थिक, सामाजिक मुद्द्यांवर रणनिती ठरवली जाणार. आगामी काळात होणारी जातनिहाय जनगणना, प्रांतिक भाषावाद या मुद्द्यांवर चर्चा होणार आ्हे.
इगतपुरीजवळ पाडळी मुंढेगाव दरम्यान कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनमधून निघाला धूर. इंजिन मधून धूर निघाल्याने कामायनी एक्सप्रेस मुंढेगाव जवळ थांबवली. सुदैवाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. इंजिनची तपासणी सुरू असल्यानं कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी आहे. मागील अर्धा ते पाऊण तासांपासून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी असल्यानं प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे.
पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे लक्ष्मी नारायण चौकात आंदोलन सुरु आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरिता ठाणे येथील शुभ दिन निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुण्यामध्ये गुंडाराज वाढत आहे तो गुंडाराज नेमका कुणाचा वाढतोय हे विचारण्या करिता एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरिता आले आहे.. मी विरोधी पक्षनेता आहे हे विचारलं व त्यावर बोट ठेवणं माझं काम आहे. आत मध्ये भेटीबाबत काय चर्चा होईल हे मी सांगणार नाही पुण्यामध्ये गुंडाराज वाढतोय तो गुंडाराज नेमका कुणाचा वाढतोय हे विचारण्यासाठी मी शिंदेंना भेटण्यासाठी आलो आहे.
माजी जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. 42 वर्षांच्या महिलेवरील बलात्कार प्रकरणात माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रज्ज्वल रेवण्णाला 5 लाखांचाही दंडही ठोठावण्यात आला आहे. कर्नाटकच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
ससून डॅाक येथील मच्छीमारांना गोडावून खाली करण्याचे आदेश पोर्ट ट्रस्टने दिले आहेत. याविरोधात कोळी बांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमचे सरकार असते तर तुम्हाला लढायची वेळ आली नसती असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
शेकापच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी हल्लीचे आजार आणि सध्याचं राजकारण काही वेगळं नाही. महाराष्ट्रात सध्या व्हायरल खूप फिरतायत असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय. लाल ध्वजाच्या मंचावर 2 भगवे ध्वज एकत्र आले. आमच्या मंचावर येऊन फक्त मराठीवर बोला असं जयंतराव म्हणाले असं राज ठाकरे म्हणाले.
शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मातोश्री भवन मुंबई येथे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विलीनीकरण होत आहे.. संघटनेचे दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांचा आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ बिलेवार यांच्यासह जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा पक्षप्रवेश पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे
अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटल. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले..एक तरुण सोशल मीडियाचा वापरकर्ता आहे. सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेज द्वारे सांगितले.
शेकापच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे रवना. पनवेलमध्ये शेकापचा 78वा वर्धापनदिन सोहळा. मेळाव्याला राज ठाकरे- संजय राऊत एकाच मंचावर. शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त दोघांची उपस्थिती.
कासेगाव येथील अवैधरित्या खत जमा करून विक्री करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. 11 लाख 33 हजार रुपयाचा अवैधरीत्या साठा केलेला विविध कंपन्यांच्या खताच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आणि कृषी विभागाने संयुक्त करवाई केली असून महालक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या दोन जणांवर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रम्प तात्यांच्या आडमुठेपणाचा कोकणवासियांना कोट्यवधींचा फटका; 300 कोटींच्या...https://t.co/WQn0AAhSOB < येथे वाचा सविस्तर वृत्त...#ratnagiri #DonaldTrump #trump #TrumpTariffs #tariff #TariffsOnIndia #tariffnews #kokan #maharashtra
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 2, 2025
पुणे-मुंबई महामार्गावर खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना 31 जुलैच्या रात्री घडली. चर्च चौक खडकी येथे सुमारे रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे अशी जखमी झालेल्या पोलिस शिपायांची नावे असून, ते दोघेही मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनचालकाने गाडी अतिशय वेगात आणि वेडीवाकडी चालवताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या चार जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि बेदम झोडपले.
वडिलांवरील अन्याय अन्... काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी आमदारपुत्राची अजित पवारांना टाळीhttps://t.co/H1exhoEUFN
रायगडमध्ये मोठी राजकीय खेळी; कोणत्या नेत्याचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश... आजचा दिवस रायगडच्या राजकारणाचा... #news #raigad #maharashtra— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 2, 2025
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा आता गुजराती मतांवर डोळा ठेवून आहे. मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मतं सर्वाधिक असल्यामुळे ही मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचं नियोजन सुरु असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्यावतीने कांदिवलीत आज गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी संध्याकाळी एका गुजराती नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाट्यप्रयोगातून महिला संवेदनाचं चित्रण करणात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करणाऱ्या या नाट्यप्रयोगानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुंबईच्या जुहू येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेले दोन मुलं बुडाले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळतात अग्निशामक दल आणि जीव रक्षकांनी यातील एका मुलाचा सुरक्षितपणे बाहेर काढून जीव वाचवला. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. जुहूच्या गोदरेज गेट समोरील सिल्वर बीच वरील ही दुर्घटना आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हे दोन मुलं समुद्रकिनारी पोहण्यास गेले होते सकाळी मोठी भरती असल्याने लाटांसोबतच ते समुद्रात आत ओढल्या गेले त्या ठिकाणी असलेल्या जीव रक्षकांच्या निदर्शनासी बाब आली असता त्यांनी ताबडतोब समुद्रात जाऊन दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्यातील एक जणांचा जीव वाचवण्यात यश आलं परंतु दुसरा खोल समुद्रात लाटांसोबत ओढल्या गेला याची माहिती अग्निशामक दल यांना देण्यात आली अग्निशामक झाला आणि इतरांनी शोधाशोध केली असता दुसऱ्याचा अजून पत्ता लागला नाही युद्ध पातळीवर त्याचा शोध सुरू आहे.
दोन हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या यूपीआय ट्रान्सॅक्शनवर जीएसटी लावण्याची कोणतीही योजना नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. जीएसटी काऊन्सिलकडून दोन हजारांच्या वरच्या यूपीआय ट्रान्झेंक्शवर जीएसटी लावण्याचा कोणताही प्रस्ताव आला नाही, असे ते म्हणाले. जीएसटी दर आणि सूट पूर्णपणे जीएसटी काऊन्सिलच्या शिफारशींवर आधारित असतात. त्यामुळे सरकार काऊन्सिलच्या मंजुरीविना कोणताही निर्णय घेत नाही, अशी स्पष्टोक्तीही पंकज चौधरी यांनी दिली
काय म्हणावं? एकाच शहरात ऊन, वारा पाऊस... तर कुठे ढगफुटीचा इशारा; 24 तासांमध्ये पेचात टाकणार पावसाचे तालरंग https://t.co/cw9dDzXRRE
कुठे देण्यात आलाय ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा? पुढच्या 24 तासांमध्ये पर्जन्यमान कसं असेल? #news #maharashtra #weather— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 2, 2025
'नार्वेकरांनी माती खाल्ली', 'तारीख पे तारीख'ला कंटाळून ठाकरेच्या सेनेचं सरन्यायाधीशांना साकडं; 'जल्लादांचा...'https://t.co/SjNHQlJWrr < येथे वाचा सविस्तर वृत्त...
"पक्षांतरे आणि गद्दारीची प्रकरणे अशीच वाढत राहिली तर देशातली..."#uddhavthackeray #shivsena #supremeCourt #brs #mlas…— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 2, 2025
भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अटक, एमआयडीसी पोलिसांची कारवाईएका बांधकाम साइटवरून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याची प्राोतमिक माहीती. 35 लाखांमध्ये सौदा ठरला होता, याआधी 8 लाख रुपये घेतल्याचे तपासात उघड. शुक्रवारी 5 लाखांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी रक्कम स्वीकारताना पोलिसांकडून रंगेहाथ अटक.. प्रकरणाची सखोल तपास पोलीसांकडून सुरू.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत हि माहिती दिली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात, सन्मान निधीचे 1500 रुपये जमा होणार आहेत.
दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणावानंतर शांतता. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ. दोन जण पोलिसांच्या ताब्यात एटीएसची टीम पुण्यात दाखल.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.