Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: मनसेचा रविवार 27 जुलै रोजी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 July 2025: महाराष्ट्राबरोबरच देश आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा तुम्हाला या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.  

Maharashtra Breaking News Today LIVE: मनसेचा रविवार 27 जुलै रोजी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 July 2025: राज्याच्या राजकारणात सध्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चर्चेत असून, सोमवारी त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसे संकेतच दिले आहेत. तर दुसरीकडे मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा अद्यापही धगधगत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालघरमधील गुजराती पाट्यांची तोडफोड केली असताना, अभिनेत्री केतकी चितळेने मराठी न बोलल्यास भोकं पडतात का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय नेत्यांनी भेटीसाठी गर्दी केल्याने नेमकं काय शिजतंय याची चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींसह दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत.

 

25 July 2025
25 July 2025 21:18 PM

Live Update: मनसेचा रविवार 27 जुलै रोजी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 27 जुलै रोजी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा 

 रंगशारदा सभागृह वांद्रे येथे सायंकाळी 5 वाजता मेळावा 

 या मेळाव्यासाठी मनसेचे नेते,सरचिटणीस तसेच मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, मुंबईतील सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी राहणार उपस्थित 

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचे लक्ष

25 July 2025 21:02 PM

School Holiday: उद्या शाळांना सुट्टी जाहीर, 'या' जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं राहणार बंद

25 July 2025 20:58 PM

Live Updates: संजय शिरसाटांनी माधुरी मिसाळांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी 

परस्पर बैठका घेतल्याबद्दल शिरसाट नाराज 
बैठछक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली घ्या 
शिरसाट यांचे माधुरी मिसाळ यांना पत्र

 

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नाराज, विभागातल्या कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेत असल्याचा आरोप

आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती

बैठकांची बातमी संजय शिरसाठ यांना कळाल्यानंतर संजय शिरसाट झाले नाराज आणि थेट माधुरी मिसाळ यांना लिहिले पत्र

इतकच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्त राहिल असे खरमरीत पत्रच लिहिले

25 July 2025 19:50 PM

Live Updates: अजित पवारांनी घेतली विजयकुमार गाडगेंची भेट, कारवाईचं आश्वासन

आज पुण्यात छावा संघटनेचे विजयकुमार गाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सर्व तपशीलवार माहिती माझ्यासमोर मांडली. त्यांच्या तक्रारी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत, मी तात्काळ लातूरच्या पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, छावा संघटनेच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतला जाईल असा विश्वास मी त्यांना दिला आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. 

25 July 2025 19:48 PM

Live Updates: शिवसेना अलर्ट मोडवर, महाराष्ट्रात  निरीक्षकांची नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना घेऊन शिवसेना अलर्ट मोडवर

शिवसेनेकडून संपूर्ण महाराष्ट्रात  निरीक्षकांची नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातला आढावा घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती 

प्रत्येक निरीक्षकांवर शहरांची जबाबदारी

दिलेल्या शहराचा दौरा करून त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यावा लागणार

याबाबतचा अहवाल एका महिन्यात पक्षाच्या नेत्यांना द्यावा लागणार

25 July 2025 18:56 PM

Live Updates: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प 

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली आहे. खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनवर दरड कोसळली असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 

25 July 2025 18:31 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकर मोठा भूकंप! महायुती सरकारमधील 'या' 8 मंत्र्यांना डच्चू?

25 July 2025 18:29 PM

August Bank Holiday: 31 दिवसांचा महिना त्यातही 15 दिवस बँकांना राहणार सुट्टी! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा

25 July 2025 18:19 PM

Live Updates: मंत्री फोन बंद ठेवू लागले आहेत; रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट, म्हणाले 'स्वत:हून...'

मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. "काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा #not_reachable येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुय.  बघुया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच," अशी पोस्ट रोहित पवारांनी शेअर केली आहे. 

25 July 2025 18:02 PM

Live Updates मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास मला मंत्री करतील; शिंदेंच्या नेत्याचं मोठं विधान

काही मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे असं आज संजय राऊत पत्रकार परिषदेत सकाळी म्हणाले होते. त्याबाबत आमदार बांगर यांना विचारलं असता त्यांनी संजय राऊतला लागलं काय?संजय राऊत काहीही बोलतो, त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम नाही. महायुतीचे सरकार, मंत्री चांगलं काम करीत आहेत. याच्यात कुठल्या ही प्रकारचा फेर बदल होणार नाही. फेरबदल झालाच तर मला वाटते मला मंत्री करतील अस मला वाटते असं म्हटलं आहे. 

25 July 2025 17:45 PM

Live Updates: राधानगरी धरण 99 टक्के भरले, कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू होणार

राधानगरी धरण 99 टक्के भरले, कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजारून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. आतापर्यंत जिल्ह्यातील सात धरणे 100% भरली आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस राहिल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडले जातील. धरण 99% भरल्याने भोगावती पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकडच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

25 July 2025 17:08 PM

ना डोनेशन, ना फी; गणवेशापासून पुस्तकांपर्यंत सर्व फ्री...; लाखो रुपये फी भरणाऱ्या पालकांनो मुंबईतील 'या' शाळेबद्दल माहितीय का?

25 July 2025 17:07 PM

'उसे मेरी आँखों ने…' कोसळत्या पावसावर अमृता फडणवींसांच्या आवाजातील नवं हिंदी गाणं, VIDEO पाहिलात का?

25 July 2025 17:06 PM

ठाकरेंना शाळेवरुन डिवचणारी केतकी चितळे कोणत्या शाळेतून शिकली? किती झालंय शिक्षण? जाणून घ्या!

25 July 2025 16:57 PM

Live Updates: मुख्यमंत्री फडणवीस मॅरेथॉन भेटींनंतर राजधानी दिल्लीतून मुंबईकडे रवाना!

राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसेच नीती आयोगाशी या बैठका झाल्या.

अमित शहा आणि राजनाथसिंग यांची सदिच्छा भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर तसेच विषयांवर त्यांनी चर्चा केली. सुमारे 25 मिनिटे ही बैठक चालली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांचीही सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली.

निर्मला सीतारामन यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली. महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सर्व निकषांवर उत्तम राखल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी यावेळी प्रशंसा केली.
या प्रकल्पांमध्ये 1000 लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. यासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8651 कोटी रुपये) इतके आर्थिक सहाय्य मागण्यात आले आहे. दुसरा प्रकल्प महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍याची पातळी वाढत असल्याने त्याचे नैसर्गिक उपायांनी निराकरण करणे हा आहे. यासाठी 500 मिलियन डॉलर्स (सुमारे 4326 कोटी रुपये) इतकी मदत मागण्यात आली आहे. तिसरा प्रकल्प महापालिका शहरांमधून सांडपाण्याचा प्रक्रिया करुन उद्योगांसाठी पुनर्वापर हा आहे. यासाठी 500 मिनियन डॉलर्सचे (सुमारे 4326 कोटी रुपये) अर्थसहाय्य मागण्यात आले आहे. उर्वरित दोन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून मदत मागण्यात आली आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी वित्तमंत्रालयाने मंजुरी द्यावी, यासाठीचे निर्देश निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला वित्त विभाग सचिव अनुराधा ठाकूर, मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होत्या.

विदर्भात खताचा प्रकल्प, जे. पी. नड्डा यांच्याशी भेट
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीत विदर्भात एक खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. नागपूर जिल्ह्यात गेल, फर्टिलायझर विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा 12.7 लाख टनाचा प्रकल्प असणार आहे. सुमारे 10,000 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पासाठी सबसिडी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जे. पी. नड्डा यांनी दिल्या. फर्टिलायझर विभागाचे सचिव रजतकुमार मिश्रा यावेळी उपस्थित होते.

14,000 कि.मी.चे ग्रामीण रस्ते, शिवराजसिंग यांच्याशी भेट
महाराष्ट्रात 14,000 कि.मी.चे रस्ते तयार करण्यासाठीचा एक प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडे दिला आहे. हा एकूण प्रस्ताव 2.6 बिलियन डॉलर्सचा (सुमारे 22,490 कोटी रुपये) असून, यातच एडीबीचे सहाय्य घेण्यात येणार आहे. 25 वर्ष मेंटेनन्स फ्री या तत्त्वावर हे रस्ते उभारण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, यातून त्यांना चांगली कनेक्टिव्हीटी मिळेल, असे शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले. या प्रकल्पाला मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वेक्षणाचे काम अतिशय गतीने केल्याबद्दल शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक 30 लाख घरे केंद्र सरकारने मंजूर केली आहेत, हे याठिकाणी उल्लेखनीय.

नीती आयोगाची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम आणि सदस्य राजीव गौबा यांची भेट घेतली. एफआरबीएम मर्यादा 25 टक्के असताना महाराष्ट्राने 18 टक्के इतकी ती राखल्याबद्दल नीती आयोगाने प्रशंसा केली. एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसिज) स्क्रिनींगसाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर, बांबू आधारित क्लस्टर (हे दोन्ही प्रकल्प प्रत्येकी 500 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे), मराठवाडा वॉटर ग्रीड आणि दमनगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्पासह अन्य जलसंधारण प्रकल्प (सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स) तसेच महाराष्ट्रातील आयटीआयला खाजगी उद्योगांशी जोडून कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम इत्यादी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली आणि त्याचे सादरीकरण झाले. या प्रकल्पांच्या परवानग्यांना गती देण्यात येईल, असे आश्वासन निती आयोगाने दिले.

25 July 2025 15:28 PM

Live Updates: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती

- पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराची दुरावस्था 
- देवस्थान आणि विश्वस्तान कडून पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा 
-  पुरातत्व विभागाकडून मात्र पाठपुरावा करूनही मंदिर दुरुस्ती नाहीच
- त्र्यंबकेश्वर मंदिराचा गाभारा आणि सभामंडपात मोठ्या प्रमाणात गळती 
- सभा मंडपात होणाऱ्या गळतीमुळे भाविकांची गैरसोय 
- तर गाभाऱ्यात होणाऱ्या गळतीमुळे मंदिरालाही धोका
- चोल आणि नागरी शैलीतील या मंदिराचा 1754 साली माधवराव पेशवे यांनी केला आहे जीर्णोद्धार

25 July 2025 15:22 PM

Live Updates: सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष होणार? समोर आली प्रतिक्रिया

राहुल नार्वेकर यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान त्यांनी अशी कुठलीही चर्चा कोअर ग्रुपमध्ये झालेली नाही, मंत्रिमंडळाबाबतचा कुठलाही निर्णय राज्य स्तरावर होत नाही, केंद्रीय स्तरावर होत असतो. अशा प्रकारचा काही बदल होणार असेल तर तो त्यावेळी कळतो. पण सध्या असा काही बदल होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही असं ते म्हणाले आहेत.

25 July 2025 14:04 PM

अमित शाह-फडणवीसांची बैठक संपली; हनी ट्रॅप प्रकरणावर चर्चा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशनात अनेक मंत्र्यांवर झालेले घोटाळ्याचे आरोपांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच कथितरित्या समोर आलेले हनी ट्रॅप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

25 July 2025 13:13 PM

फडणवीस दिल्लीतून परत येताच 'या' 4 मंत्र्यांची पडणार विकेट? नावंही आली समोर

25 July 2025 12:36 PM

धाराशीव : HIV बाधित मुलीवर बलात्कार; गर्भपात केला, संस्थेतील लोकांविरोधात गुन्हा दाखल

एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा गर्भपात करण्यात आला.  औसा तालुक्यातील एका नामवंत एचआयव्हीबाधित संगोपन संस्थेत ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची माहिती मुलीने तक्रारीत दिली आहे. ढोकी पोलिसातील गुन्हा औसा पोलिसांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू. अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. औसा तालुक्यातील या नामवंत संस्थेला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली खळबळ. पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. 

25 July 2025 12:32 PM

झा भावांना 14 दिवसांची कोठडी

कल्याण सत्र न्यायालयाने आरोपी गोकुळ झा व त्याचा भाऊ रणजीत झा याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

25 July 2025 11:49 AM

मतदान होण्याआधीच प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीत प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरेकर याच्या सहकार पॅनलच्या नऊ उमेदवाराची बिनविरोध निवड झाली असून शिल्लक सहा उमेदवार सुद्धा निवडून आणण्याचा सहकार पॅनल प्रयत्न करणार आहे. या निवडणुकीसाठीचं मतदान रविवारी होणार आहे.

25 July 2025 11:49 AM
25 July 2025 10:39 AM

मुंबईत मुसळधार पाऊस! अंधेरी सबवे पाण्याखाली

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. एक ते दीड फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी बंद आहे. गोखले पूल आणि ठाकरे पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे.

25 July 2025 10:35 AM

महिलेला हिप्नॉटाइज करुन लुटलं अडीच तोळ्याचं सोनं

महिलेला हिप्नॉटाइज करून तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण, हातातील अंगठी असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास केला. महिला मंदिरात दर्शनासाठी गेली असताना ही घटना घडली. महिला मंदिरातून बाहेर पडताच एक अज्ञात मास्कधारी व्यक्ती त्यांच्या जवळ आली, त्यानंतर बनेश्वर रोडवरील काळूबाई मंदिराकडे घेऊन जात महिलेला हिप्नॉटाइज केले. आरोपी सोनं घेऊन पसार झाला आहे. 65 वर्षीय कमल शिवाजी रेणुसे यांच्यासोबत दुपारी हा प्रकार घडला. संबंधित अज्ञात व्यक्ती आणि महिला दुचाकीवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे भोरच्या राजगड पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

25 July 2025 10:20 AM

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या बडतर्फ IPS अधिकाऱ्याला जामीन नाकारला

सोशल माध्यमावर पोस्ट करत जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणात बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कासलेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजित कासलेने सोशल माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणात मोहन आघाव यांनी सायबर पोलिसात 30 मे रोजी तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात १७ जून रोजी रणजित कासले याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कासलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

25 July 2025 10:19 AM

सर्पमित्रांना ओळखपत्रासह 10 लाखांचा अपघात विमा

राज्यातील सर्पमित्रांना आता अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाखांचा अपघात विमा मिळणार आहे. त्यांना 'अत्यावश्यक सेवा' आणि 'फ्रंटलाइन वर्कर' म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालय दालनातील बैठकीत त्यांनी ही सूचना केली. बैठकीला वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव, अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणिमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळेल आणि त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.

25 July 2025 09:53 AM
25 July 2025 09:42 AM

रोहित आणि विराट पुन्हा मैदानात दिसणार? 'या' दौऱ्यावर जाणार भारतीय संघ, BCCI ने जाहीर केले वेळापत्रक

 

25 July 2025 09:33 AM

पोलिस मारहाण प्रकरणी भाजपाच्या माजी खासदाराची निर्दोष मुक्तता

2004 मध्ये पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्याची न्यायालयाने सुटका केली आहे. एफआयआरमध्ये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचे समर्थन खुद्द तपास अधिकाऱ्याने केलेले नाही. त्यामुळे ठोस, सुसंगत आणि विश्वासार्ह पुराव्यांअभावी दोन्ही आरोपी संशयाच्या फायदा मिळण्यास पात्र आहेत, असे निरीक्षणही यावेळी न्या. सत्यनारायण नावंदर यांनी नोंदवले. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, भाजप कार्यकर्ते नेताजी शिंदे यांना 9 सप्टेंबर 2004 रोजी महाराष्ट्र धोकादायक हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशीसाठी कांदिवली येथील कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. तेव्हा शेट्टी आणि गणेश खंकर हे दोघे रात्री पोलिस ठाण्यात धडकले. पोलिसांनी त्यांच्याकडे कोण आहात याची विचारणा केली असता दोघांनीही हवालदाराला धक्का मारला आणि आयुष्याची वाट लावण्याची धमकी देत आत निघून गेले. त्यानंतर ते डिटेक्शन रूममध्ये गेले आणि तेथील अधिकाऱ्याला शिवीगाळ केली, असा दावा सरकारी वकिलांनी केला. तक्रारदाराची नोंदविलेली साक्ष अत्यंत कमकुवत आणि अविश्वसनीय आहे. तपास अधिकाऱ्याने तपासाबद्दल आणि आरोपपत्राची माहिती दिली. घटना घडली तेव्हा स्वतः उपस्थित असल्याचा किंवा त्याला धमकाविण्यात आल्याबाबत काहीच म्हटले नाही. सरकारी पक्षाच्या दाव्याचे हवालदाराने अंशतः समर्थन केले. मात्र, त्याच्याही साक्षीत विसंगती आहेत आणि उलटतपासणीदरम्यान त्याची साक्ष कमकुवत ठरली, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

25 July 2025 09:28 AM

सहा फुटांवरील 'पीओपी' मूर्तीचे समुद्रातच विसर्जन

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार करण्यात आलेल्या पाच फुटांवरील गणेशमूर्तीच्या विसर्जनाला नैसर्गिक जलस्रोतांशिवाय तूर्त तरी पर्याय नसल्याच्या भूमिकेचा राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने गुरुवारी पुनरुच्चार केल्यानंतर उच्च न्यायालयाने त्याबाबत असमाधान व्यक्त केले. त्याच वेळी सहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तीना समुद्रासह अन्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये परवानगी दिली. पाच फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तीना कृत्रिम तलावाची अट बंधनकारक करणाऱ्या सरकारच्या निर्णयातही मुख्य न्यायमूर्ती आलोक विसर्जनास आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने यावेळी बदल केला. तसेच, ही अट सहा फुटांपर्यंतच्या सर्व पीओपी मूर्तीना लागू असेल, असे स्पष्ट केले. मोठ्या मूर्तीच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाबाबत सरकार आणि महापालिकेने सांगितलेल्या अडचणी विचारात घेऊन परवानगी देत आहोत.

25 July 2025 09:16 AM

खासगी क्लासमधील वादातून विद्यार्थिनीच्या आईला घरात घुसून मारहाण; चौघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

25 July 2025 07:52 AM

मोठ्या झोपडपट्ट्या संमतीविना बिल्डर्ससाठी खुल्या; फडणवीस सरकारने बदलला 'तो' नियम

मुंबईतील दहा एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या झोपडपट्ट्या विकासकांना झोपडीवासीयांच्या संमतीविना थेट विकासकांना उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात 18 वर्षांनंतर लागू झालेल्या नव्या गृहनिर्माण धोरणात यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात झोपडपट्टी कायद्यातील तीन क कलमान्वये मंजूर झालेल्या तीन योजना रद्द केल्या होत्या. नव्या गृहनिर्माण धोरणात पुन्हा याच पद्धतीच्या झोपु योजनांना चालना देण्यात आली आहे. 

25 July 2025 07:43 AM

भारताने FIDE Women’s Chess World Cup मध्ये रचला इतिहास! दिव्या देशमुखनंतर कोनेरू हम्पीनेही गाठला अंतिम टप्पा

 

25 July 2025 07:31 AM

'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची...', केतकी चितळेचा थेट ठाकरे कुटुंबावर निशाणा; 'तुम्हाला अक्कल...'

25 July 2025 07:28 AM

कोकाटेंचं कृषीमंत्रीपद जाणार? पण अजित पवारांचा प्लॅन B तयार

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कोकाटेंचं खातं बदललं जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात आज निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कोकाटे मंत्रीमंडळातच राहाणार असून केवल खातेबदल केला जाईल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

25 July 2025 07:05 AM

घटनेच्या प्रस्तावनेतून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटवणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत बोलताना काही गटांकडून राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याबाबत चर्चा होत आहे. मात्र, केंद्र सरकारची सध्या कोणताही योजना किंवा हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना अर्जुन राम मेघवाल यांनी भूमिका स्पष्ट केली. भारत सरकारनं औपचरिकपणे कोणतीही कायदेशीर आणि संविधानिक प्रक्रिया संविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याबाबत सुरु केली नसल्यचं म्हटलं. मात्र,काही सार्वजनिक आणि राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु असू शकतात. मात्र, सरकारचा तसा कोणताही औपचारिक निर्णय किंवा त्याबाबतचा प्रस्ताव नसल्याचं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. 

25 July 2025 06:21 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला आज सुट्टी

चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शाळा- महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस, अंगणवाड्याना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी हा आदेश जारी केला आहे. कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी सुटीचा आदेश जारी करण्यात आला असून अतिवृष्टी काळात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

25 July 2025 22:24 PM

Live Updates: उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा 

रायगड रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत  ऑरेंज अलर्ट जारी 

उद्या 12.40 ला 4.66 मीटरची मोठी भरती

उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा पुणे घाट, सातारा घाट, रायगड, रत्नागिरी भंडारा, गोंदीया, चंद्रपूर गडचिरोलीत रेड अलर्ट तर मुंबई, ठाण्या, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी.

25 July 2025 22:20 PM

Live Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दिल्लीत नेत्यांची रांगा

देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून यावेळी त्यांना भेटण्यासाठी नेत्यांनी रांगा लावल्या. 
सुनील तटकरे 
शरद पवार गटाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे
शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के
मुरलीधर मोहोळ 
भागवत कराड 
मुन्ना महाडीक 
अनिल बोंडे 
शाहनवाझ हुसैन

25 July 2025 22:18 PM

Live Updates: विजयकुमार घाडगे पाटील यांची प्रकृती खालावली

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील पुण्यात पोहचले आहेत. ते मुंबईला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, मात्र प्रवासादरम्यान पुण्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना छातीत अचानक दुखू लागलं. त्यानंतर तातडीने त्यांना पुण्यातील KEM खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विजयकुमार घाडगे हे मुंबई येथे अजित पवार यांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र त्याआधीच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

25 July 2025 22:17 PM

Live Updates: महाराष्ट्र जगातील 28 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था 

- मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करण्यात आलं आहे. सिंगापूर देशाच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असल्याचा मॉर्गन स्टन्लीतून दिला आहे.  महाराष्ट्र जगातील 28 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचं कौतुकही करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा आर्थिक राज्य असून त्याने सातत्याने देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मत  मांडलं आहे. मॉर्गन स्टॅन्लीच्या ‘India Economics and Strategy’ या अहवालानुसार, महाराष्ट्रची जीएसडीपी सध्या सुमारे 536 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असून, ती 2030 पर्यंत १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. 

Read More