Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Breaking News LIVE : राज्याच्या इतिहासात प्रथमच 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची घोषणा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा एकाच ठिकाणी

Breaking News LIVE :  राज्याच्या इतिहासात प्रथमच 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची घोषणा
LIVE Blog

Maharashtra Breaking News Topday LIVE Updates:   माळेगाव साखर कारखानाच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. . ठकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. चर्चेअंती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढवण्यावर  एकमत झाले. लवकरच महामंडळ वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगडच्या संघर्षाचा दुसरा अंक परभणीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी दुर्राणींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिवसेनेनं रेडसिग्नल दाखवला आहे. बाबाजानी दुर्राणींचा राष्ट्रवादी प्रवेश काही दिवसांवर आलेला असताना बाबाजानी दुर्राणींविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख मुंजाभाऊ टाकळकर यांनी मोहीम उघडली आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची 'अॅक्सिओम-४' अंतराळ मोहीम उद्या, २५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी झेपावणार आहेत. 

25 June 2025
25 June 2025 20:34 PM

राज्याच्या इतिहासात प्रथमच 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची घोषणा 

राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे अशी सोशल मिडिया पोस्ट ख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी केली आहे. 

25 June 2025 20:01 PM

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना आणि मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेने एकत्रित आंदोलन केलं. इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांच्या प्रश्नसंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे यांची युनियन आणि मनसे युनियनशी संबंधित कामगारांचे मॅनेजमेंट विरोधात काम बंद आंदोलन केलं  भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस  संजय कदम आणि मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष  संतोष धुरी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले आहे

25 June 2025 18:07 PM

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील आतापर्यंत बारा जागांचे कल हाती; सर्व जागांवर अजित पवार गटाच्या पॅनेलचे उमेदवार विजयी 

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील आतापर्यंत बारा जागांचे कल हाती आले आहेत. बाराच्या बारा जागी अजित पवार गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.  ऊस उत्पादक पणदरे गटातील निकाल जाहीर. तीनही जागा अजित पवार गटाकडे.

25 June 2025 16:17 PM

शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार 

शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः राज ठाकरेंची हिंदी भाषेवर समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहेत.  शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी आणि स्वतः मंत्री दादा भुसे हिंदी भाषेतल्या सक्तीवर राज ठाकरे यांना माहिती देणार आहेत.  हिंदी भाषेचा शासन निर्णय तसेच राज ठाकरे आपल्या काही तज्ञ मंडळींसोबत बैठकीला बसणार आहेत. 

25 June 2025 15:38 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय कॅबिनेटने आणि बाणी परिस्थितीत घटनात्मक अधिकार हिरावून घेतलेल्या आणि जुलमी सत्तेला विरोध करणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या त्यागाचा सन्मान करण्याचा ठराव केला आहे. 1974 साली नवनिर्माण आंदोलन आणि सम्पूर्ण क्रांती अभियानाच्या दमनानेच सुरू झालेल्या या जुलमी काळाचा उद्देश भारतीय संविधानाच्या

मूलभूत तत्वांना हादरविण्याचा होता.  बैठकीत आणि बाणी काळात ज्यांचे घटनात्मक अधिकार हिरावले गेले व ज्यांना कल्पनेपलीकडचे छळ सहन करावे लागले अशा जुलमी सत्तेला विरोध करणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ कॅबिनेटने दोन मिनिटांचे मौन पाळून आदरांजली अर्पण केली.

2025 साली संविधान हत्या दिवसाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय इतिहासातील या काळ्यात संविधानाचा मूलाधारच हादरविण्यात आला, गणराज्याच्या मूलभूत रचनेला घाला घालण्यात आला, संघराज्याचा अवमान करण्यात आला आणि मूलभूत अधिकार, व्यक्तिगत स्वातंत्र्य व मानवी प्रतिष्ठेचा ऱ्हास झाला.

केंद्रिय कॅबिनेटने भारतीय जनतेचा संविधानावरील अविचल विश्वास पुन्हा अधोरेखित केला आहे. तरुणाईने आणि ज्येष्ठांनी या जुलमी काळाचा विरोध करून संविधान व लोकशाही टिकवणाऱ्या लढ्याचा आदर्श घ्यायला हवा, असे कॅबिनेटने म्हटले आहे.

लोकशाहीचे जननी म्हणून भारत आपली संविधानिक मूल्ये जपण्याचा, संरक्षण करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा आदर्श आहे. या निमित्ताने कॅबिनेटने देशवासीयांना संविधानाच्या मूलभूत तत्वांचे, संघराज्यीय रचनेचे आणि लोकतंत्राच्या आत्म्याचे रक्षण करण्याचा नवा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

25 June 2025 14:27 PM

मुंबईत काँग्रेसकडून SRA कार्यालयावर धडक मोर्चा

काँग्रेसकडून एसआरए मध्ये गैरकारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. SRA मधील याच गैरकारभाराविरोधात एसआरएच्या वांद्रे (पू) मुख्य कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा काढण्यात आला. खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचा मोर्चा पाहता SRA कार्यालय बाहेर पोलिसांनी कडे कोड बंदोबस्त लावला आहे. थोड्या वेळामध्ये काँग्रेसच्या या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

25 June 2025 14:12 PM

इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देणार- अरविंद सावंत

खासदार अरविंद सावंत यांनी आज माध्यमांशी बोलताना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी शिवसेना UBT कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती दिली आहे. 

25 June 2025 13:21 PM

भरतीच्या लाटांनी कोस्टल रोडवर पाणीच पाणी

कोस्टल रोडवर समुद्रानजीकचं वॉटर पार्क तयार झालं आहे. समुद्रात भराव टाकून बनवलेला करोडो रुपयांचा कोस्टल रोड प्रकल्प भरतीदरम्यान पाण्यात जातांना दिसतोय. 

25 June 2025 12:57 PM

मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील दिवा-अंजूर खिंडीत राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची गती मंदावल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तासंतास वाहनं वाहतूक कोंडीत आडकली आहेत. गेली तीन ते चार तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचे समजते.‌

25 June 2025 12:29 PM
25 June 2025 12:03 PM

नालासोपाऱ्यातील राहुल इंटरनॅशनल स्कूल बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल

नालासोपारा पश्चिमेकडील राहुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेला बॉम्बे उडून देण्याचा धमकीचा ई-मेल आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी साडे चार वाजताच्या सुमारास हा मेल शाळेच्या इमेल वर पाठवण्यात आला आहे. नालासोपारा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त , नालासोपारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखा, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट टीमची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. शाळा परिसरात बॉम्ब आहे का याची तपासणी करण्यात येत असून पोलिसांच्या सायबर विभागामार्फत हा मेल नेमका कोणी पाठवला आहे याचा शोध घेतला जात आहे.

25 June 2025 11:47 AM

सामान्य नागरिक समजून पोलीस अधिकाऱ्याने लष्कर अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली, दुसऱ्या दिवशी...; VIDEO व्हायरल

25 June 2025 11:46 AM

राज्याच्या निधीची उधळपट्टी! अंदाज समितीला चांदीच्या ताटातून पंचपक्वानाची मेजवानी; एका ताटासाठी मोजले 4500 रुपये

25 June 2025 11:45 AM

'मला अपेक्षा होती की एक जिद्दी...', जय शाहांसोबत काम करण्याबद्दल सौरव गांगुली स्पष्टच बोलला, 'काही गोष्टी करायच्या होत्या...' 

25 June 2025 11:23 AM

अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलचा चौथा उमेदवार विजयी

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे अद्याप देखील ही मतमोजणी सुरूच आहे. आता तब्बल या मतमोजणीला 22 तास झाले आहेत. आतापर्यंत केवळ दोन निकाल घोषित झाले असून त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत.  तर भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून विलास ऋषिकांत देवकाते हे 2227 मतांनी विजयी झाले आहेत. 

25 June 2025 11:18 AM
25 June 2025 10:55 AM

गायीला वाचवताना एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू

25 June 2025 10:38 AM

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने ज्या सखल भागात पाणी येतं  तिथल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी  33 फूट 9  इंच झाली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. तर धोका पातळी  43 फूट आहे.

25 June 2025 09:51 AM

कोल्हापूरची तहान भागवणारा कळंबा तलाव ओव्हर फ्लो

कोल्हापूरची तहान भागवणारा कळंबा तलाव ओव्हर फ्लो झालाय. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम म्हणून अनेक तलाव आणि धरण भरू लागलेत. कळंबा तलाव देखील काठोकाठ भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी पडत आहे.

25 June 2025 09:41 AM

मुंब्रा स्टेशनवरील अपघाताला 'तो' प्रवासी जबाबदार? अपघाताचा अहवाल लवकरच समोर येणार

25 June 2025 09:18 AM

'या' 4 जिल्ह्यांवर महापुराचं संकट, हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा

 
25 June 2025 09:17 AM

'मी काय इथे बसून...', इंग्लंडविरोधातील पहिल्या पराभवासाठी गौतम गंभीरने कोणाला ठरवले जबाबदार? म्हणाला 'तुम्ही जिंकताना...'

25 June 2025 09:16 AM

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक: अजित पवार गटाची आघाडी, पहिल्या फेरीनंतर नेमकं चित्र काय; 22 तासांपासून मतमोजणी सुरु

25 June 2025 09:15 AM

मनसे आणि शिवसेनेची आज एकत्रित पत्रकार परिषद, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार?

25 June 2025 08:48 AM

मशि‍दीवरील भोंग्यांच्या मुद्यावर अजित पवारांनी बोलावली बैठक

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली आहे. यावेळी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित राहणार आहेत. मुस्लिम समाजाच्या या  शिष्टमंडळात नवाब मलिक, अबू आझमी, वारिस पठाण, जल्लाल उद्दीन, भायखळा आमदार मनोज जामसुतकर उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे. 

25 June 2025 08:05 AM

माळेगाव साखर कारखान्याच्या दुसऱ्या फेरची मतमोजणी सुरू

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू आहे. पहिल्या फेरीत वीस संचालकांपैकी 16 उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आघाडीवर आहेत. तावरे गटाचे केवळ चार उमेदवार आघाडीवर असून अंतिम निकाल हाती यायला दुपारी दोन वाजणार आहेत. 

25 June 2025 07:44 AM

बदलापुरातील कोंडेश्वर पर्यटनावर बंदी

बदलापुरातील कोंडेश्वर पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे.  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या पर्यटनावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिलेत. पावसाळ्यात कोंडेश्वरला मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनासाठी जातात.  या परिसरातील आदिवासी बांधवांना पर्यटकांमुळे  पावसाळ्याचे दोन ते तीन महिने चांगला रोजगार मिळतो. मात्र आता   कोंडेश्वर पर्यटनावर बंदी घातल्याने  आदिवासी बांधव हवालदिल झालेत.  हवं तर पोलीस बंदोबस्त लावा, पण रोजगार हिरावू नका, अशी मागणी  आदिवासी बांधवांकडून  करण्यात आली आहे.

25 June 2025 07:10 AM

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कामगार सेनेची आज एकत्रित पत्रकार परिषद

भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत आणि हवाई कर्मचारी सेना अध्यक्ष संतोष धुरी एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत.  तसेच मनसे नेते नितीन सरदेसाई देखील उपस्थित राहणार आहेत.  इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत भाजपच्या कामगार युनियन वर खोटारडेपणाचा ठपका ठेवत शिवसेना (UBT) आणि मनसे एकत्रित रित्या विरोध करणार आहेत. 

25 June 2025 06:41 AM

बाबाजानी दुर्राणींच्या प्रवेशाला शिवसेनेचा रेड सिग्नल

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगडच्या संघर्षाचा दुसरा अंक परभणीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी दुर्राणींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिवसेनेनं रेड सिग्नल दाखवलाय. बाबाजानी दुर्राणींचा राष्ट्रवादी प्रवेश काही दिवसांवर आलेला असताना बाबाजानी दुर्राणींविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख मुंजाभाऊ टाकळकर यांनी मोहीम उघडलीये. 

25 June 2025 06:33 AM

महायुतीचं ठरलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढवणार 

महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. . बैठकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. चर्चेअंती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढवण्यावर  एकमत झाले. लवकरच महामंडळ वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

Read More