Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Todays Breaking News LIVE: धारावीत महिलेवर गोळीबार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 July 2025: पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं राज्यातील बहुतांश शिवमंदिरांमध्ये भाविकांची रिघ, तर राज्याच्या राजकीय पटलावर घडामोडींची गर्दी... पाहा कुठं नेमकं काय घडतंय   

Maharashtra Todays Breaking News LIVE:  धारावीत महिलेवर गोळीबार
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 July 2025: श्रावणमासारंभ झाला असून, राज्यातील बहुतांश शिवमंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान राजकीय पटलावरही अनेक घडामोडींना वेग आला आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे, तर देश स्तरावर अनेक राजकीय घडामोडी आणि पक्षांतरं सुरू असून देशाच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होण्याची चिन्हं दिसत आहेत. 

आजचा दिवस महत्त्वुपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेसाठी. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 28 जुलै (आज) रोजी‘ऑपरेशन सिंदूर’वर 16 तासांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. चर्चेची सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने होणार असून, चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हस्तक्षेप करतील. ही चर्चा प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी सुरू होईल. काँग्रेसकडून राहुल गांधी हे पक्षनेते म्हणून चर्चेत हस्तक्षेप करतील. या दिवसभरातील सर्व घडामोडी पाहा एका क्लिकवर... 

28 July 2025
28 July 2025 21:47 PM

धारावीत महिलेवर गोळीबार

धारावीच्या मुस्लिम नगरमध्ये महिलेवर गोळीबार करण्यात आलाय. सर्वर बानू शेख असे तिचे नाव असून ती यात जखमी झाली आहे. रात्रीच्या सुमारास घराजवळ उभी असताना तिच्या दंडावर अचानक काही तरी आघात झाल्याने महिला जखमी झाली. सर्वर बानू शेखला सायन रुग्णालयात दाखल केलं असता दंडात गोळी घुसल्याच निष्पन्न झाले.शाहू नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

28 July 2025 20:56 PM

वनताराची टीम  हत्तीनीचा ताबा घेण्यासाठी गावात दाखल

कोल्हापूर जिल्ह्यातील  नांदणी मठातील  महादेवी हत्तीनी  संदर्भात नांदणी मठाने दाखल केलेली याचिका  सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर  गेल्या आठवड्यापासून  प्रतिक्षेत असणारी  गुजरात मधील वनतारा टीम हत्तीचा ताबा घेण्यासाठी नांदणी गावात पोहोचली आहे. सुप्रीम कोर्टाने  मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल  कायम ठेवला, त्यामुळे नांदणी इथल्या  स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य  महास्वामींचे संस्थान  मठ आणि  मठांतर्गत येणाऱ्या  865 गावा मधील जैन धर्मीय  समाज नाराज झालाय. दरम्यान प्रशासनाने मठाचे मठाधिपती  यांची भेट घेऊन  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे अंमलबजावणी करावे लागेल  असे सांगितलं, त्यामुळे नाराज  नांदणीकर ग्रामस्थ महादेवी हत्तीची गावातून मिरवणूक  काढून  महादेवी हत्तीन  वनतारा कल्याण केंद्राच्या स्वाधीन करणार आहे.

28 July 2025 20:04 PM

निसर्ग उन्नत मार्गाचे तिकिट व्हॉट्सॲपवरूनही काढता येणार

मलबार हिल परिसरातील निसर्ग उन्नत मार्ग मुंबईकरांच्या पसंतीस उतरत असून दर महिन्याला हजारो पर्यटक तेथे भेट देत आहेत.त्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी व्हॉट्स ॲपवरूनही तिकीट नोंदणी सुरु करण्याचे नियोजन पालिका करत आहे. याबाबत महापालिकेकडून तांत्रिक गोष्टींचा अभ्यास सुरु असून लवकरच ही प्रणाली सुरु होण्याची शक्यता आहे.

28 July 2025 19:23 PM

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी शासनाकडून नवी नियमावली

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी शासनाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली. गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणे, खोट्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे पसरविणे, शासकीय नियमांचे उल्लंघन करून समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करणे यासह अनेक बाबी टाळण्यासाठी शासनाकडून नव्याने सूचना जाहीर करणयात आल्या आहेत. शासकीय सूचनांचे पालन न केल्यास कर्मचाऱ्याला शिस्तभंग कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नव्या सूचनांचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

28 July 2025 18:36 PM

15 हजार रुपयांचा लाच स्वीकारताना रेल्वे अधिकाऱ्याला अटक

15 हजार रुपयांचा लाच स्वीकारताना रेल्वे अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय.केंद्रीय अन्वेषण पथकाकडून कारवाई रेल्वे वर्क शॉप विभागात काम करण्याऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. क्वालिटी चेक रिपोर्ट देण्यासाठी लाच मागितली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

28 July 2025 17:38 PM

महादेवी हत्तीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 

नांदणी मठाच्या महादेवी हत्तीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने देखील फेटाळली.सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे नांदणी ग्रामस्थ तीव्र नाराज झाले आहेत.नांदणी मठाच्या महादेवी हत्तीनीचा वनताराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालाय.

28 July 2025 17:25 PM

अमरिकेच्या दबावामुळे युद्ध थांबवलं का?- अरविंद सावंत

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सांगतोय मी युद्ध थांबवल. एक राष्ट्र आपल्यासोबत नाही.आपण तर विश्वगुरु आहोत.देशासाठी एक राष्ट्र आपल्यासोबत उभ राहील नाही. चीन सीमेवर घुसत आहेत.आम्ही अंतर्मुख होवून परीक्षण करणे गरजेचे होत, असे अरविंद सावंत म्हणाले.

28 July 2025 17:03 PM

धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे मैदानात

धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे आता मैदानात उतरलेत. नियम डावलत भरमसाठ सवलती अदानी कंपनीला देवून धारावीचा पुनर्विकास करायला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी आदित्य ठाकरे आज धारावीच्या कुंभारवाड्यातील स्थानिकांशी संवाद साधणारेत. सुरुवातीला कुंभारवाड्यात फिरून तिथल्या व्यावसायिकांचे मत ते जाणून घेणारेत. त्यानंतर इथल्या सभागृहात त्यांचे भाषण होणाराय.

28 July 2025 15:43 PM

शिंदेंच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरुन शिवसेनेचे एक शिष्टमंडळ मंगळवारी २९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची  भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटत असतात. त्यानुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयोगाने निमंत्रण दिले आहे. या शिष्टमंडळात महाराष्ट्रातून मंत्रीउदय सामंत आणि मंत्रीशंभूराज देसाई आणि काही खासदार निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

28 July 2025 15:21 PM

भारतीय लष्कराचं ऑपरेशन महादेव! पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

28 July 2025 15:05 PM

पाकिस्तानी जनतेला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतली- राजनाथ सिंह

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांना मी नमन करतो.6 आणि 7 जुलैला ऑपरेशन सिंदूर भारतीय जवानांनी राबवलं.22 एप्रिलला पहलगाम इथं अमानवीय आणि कायर हल्ला झाला. धर्म विचारून मारण्यात आलं.हल्ल्यानंतर तीन सेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेत त्यांना पूर्ण सुटका केली.पाकिस्तानला उत्तर द्यायला आमच्याकडे अनेक पर्याय होते. मात्र आम्ही पाकिस्तानच्या सामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही, अधिकाधिक दहशतवादी आणि त्यांचे तळ उध्वस्त करता येतील, असा पर्याय निवडला . पाकिस्तानच्या जनतेला लक्ष केलं नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

28 July 2025 14:01 PM

खराडी ड्रग्सपार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द 

खराडी ड्रग्सपार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द करण्यात आलाय. 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी अल्कोहोलचे सेवन केले असल्याचे अहवालात म्हटलंय. सर्व आरोपींचे रक्ताचे व लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत.

28 July 2025 13:31 PM

5 वर्षांमध्ये महाराष्ट्राचे  ट्रान्सफॉमेशन झालेलं दिसेल - CM फडणवीस 

वर्ध्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत अनेक मुद्दे अधोरेखित केले. 'येऊ  घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर चिंतन करण्याच्या दृष्टीने बैठक आहे.  विधानसभा निवडणुकीत तुम्ही विदर्भात अभूतपूर्व काम केले , काही जागा अतिशय कमी मतांनी हरलो नाहीतर आपण रेकॉर्ड केला असता', असं ते म्हणाले. यावेळी 2024 विधानसभा  निवडणुकीत सर्व रेकॉर्ड  तोडल्याचं म्हणत आता लोकांच्या अपेक्षा वाढल्याची आठवण कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांना करून दिली. 

सध्याचं हे सरकार ज्यावेळी 5 वर्ष पूर्ण काम करेल त्यावेळेस महाराष्ट्राचे  ट्रान्सफॉमेशन झालेलं दिसेल असं म्हणत लॉंग टर्म vision घेऊन आपण काम करतोय असा विश्वासार्ह शब्द दिला. 

28 July 2025 13:09 PM

कलंकित आमदार, मंत्र्यांना बडतर्फ करा- अंबादास दानवे 

कलंकित आमदार, मंत्र्यांना तातडीनं बडतर्फ करण्याची मागणी. मंत्री शिरसाट आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंच्या शिष्टमंडळाच्या वतीनं अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. 

 

28 July 2025 12:40 PM

सिंधुदुर्गात महायुतीत तणाव

सिंधुदुर्गात महायुतीत तणाव. भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून पक्षप्रवेशाचे प्रलोभने दिली जात आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तक्रार. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांना आर्थिक आणि विकासकामांच्या आश्वासनांचे प्रलोभन दिले जात असल्याचा आरोप. कुडाळ-मालवण व सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सेना पदाधिकारी भाजपाच्या पदाधिकारी यांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप. 

28 July 2025 12:28 PM
28 July 2025 12:28 PM

सायन- पनवेल मार्गावर भाजीचा ट्रक पलटी

पनवेल सायन मार्गावर भाजीचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती, खारघर ते बेलापूर दरम्यान मुंबई च्या लेनवर ट्रक पलटी झाला ,चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. मुख्य मार्गावर ट्रक पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती,यावेळी
वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली।ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू. 

 

28 July 2025 12:23 PM

योगेश कदम यांच्याविरोधातील सर्व पुरावे राज्यपालांकडे सुपूर्द

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधातील सर्व पुरावे राज्यपालांकडे सुपूर्द केले. अनिल परब हे लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेवून राज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधीतील पुरावे देणारेत. तत्पूर्वी त्यांनी आज राज्यपालांनाही पुरावे दिले.

 

28 July 2025 11:53 AM
28 July 2025 11:28 AM

ठाकरेंच्या खासदारांना थेट अमित शाहांचा फोन... काय बोलणं झालं? 

भाजपचा ठाकरेंच्या खासदारांवर डोळा आहे का अशी चर्चा रंगलीय. कारण केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला फोन करून शुभेच्छा दिल्याने हिंगोलीमध्ये एकच चर्चा सुरू झाली. अमित शाह यांची कोणती राजकीय खेळी आहे का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचाही रविवारी ६५ वा वाढदिवस होता, पण शाह यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नाहीत. मात्र हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शाह यांनी स्वत: फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

28 July 2025 11:21 AM

लोकसभा चर्चेची सुरुवात सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने होणार 

‘ऑपरेशन सिंदूर’वरील लोकसभा चर्चेची सुरुवात सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने होणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर बैजयंत जय पांडा हे सरकारच्या वतीने भूमिका मांडतील. तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उद्या (मंगळवार) या चर्चेत भाग घेणार आहेत. ऑपरेशन सिंदूर’संदर्भात सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने आधीच तीन ओळींचा व्हीप जारी केला असून राहुल गांधी हस्तक्षेप करतील. इंडिया ब्लॉकमधील अनेक प्रादेशिक पक्ष प्रादेशिक भाषांमध्ये आपली मते मांडणार आहेत. ही चर्चा 12 वाजता सुरू होणार असून एकूण 16 तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे.

 

28 July 2025 11:10 AM

बीएमसी सर्व वॉर्डांमध्ये हॉकर-मुक्त क्षेत्रे बनविण्याचा विचाराधीन 

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) शहरातील सर्व २४ वॉर्डांमध्ये हॉकर-मुक्त क्षेत्रे निर्माण करण्याची योजना आखत आहे. यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण कमी करणे आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि मोकळी जागा उपलब्ध करणे हा उद्देश आहे.

बीएमसीने प्रत्येक वॉर्डात किमान एक हॉकर-मुक्त क्षेत्र निश्चित करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि हॉकर यांच्याशी चर्चा करून योग्य ठिकाणे निवडली जातील. या योजनेत हॉकरांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे, जेणेकरून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही.

28 July 2025 11:05 AM
28 July 2025 10:39 AM

संजय राऊत यांच्या विरोधात नांदगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्या विरोधात नांदगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल. नांदगाव भाजप मंडळ अध्यक्षाने केली तक्रार दाखल. राऊतांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याचा फिर्यादीत उल्लेख. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत राऊत यांनी महाजन यांच्यासह भाजप पक्षावर वैयक्तिक स्वरूपाचे विधान केल्याचा तक्रारीत उल्लेख. भाजपचे संजय सानप यांनी केली नांदगाव पोलिसांत फिर्याद दाखल.

 

28 July 2025 09:56 AM

महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या 'ओल्या पार्टी'चा व्हिडिओ व्हायरल

यवतमाळच्या नेर येथील महावितरण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या धाब्यावरील ओल्या पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यात एक महिला अधिकारी देखील सहभागी असून, ती झिंगलेल्या अवस्थेत शिव्यांची लाखोळी वाहत आहे. या महिला अधिकाऱ्याचे अर्वाच्च भाषेतील संभाषण चांगलेच चर्चेत आले आहे. महावितरणचे हे अभियंते व कर्मचारी शेतकरी व सर्वसामान्यांकडून वीज बिलापोटी अवैध वसुली करीत असल्याचा देखील आरोप होत आहे. या अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

28 July 2025 09:54 AM

ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रिकरणाच्या विरोधात महायुतीनं कंबर कसली 

ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रिकरणाच्या विरोधात महायुतीनं कंबर कसली. प्रमुख महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जाणार, मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीचे धोरण. ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतील्या आमदारांकडे देणार.  कोकणी मतदारापर्यत पोहोचण्यासाठी गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन्स, एसटी बसेस सोडल्या जाणार तर गोविंदा पथक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही आपल्यासोबत जोडण्याचा महायुतीचा मनसुबा. 

28 July 2025 09:43 AM

औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असणाऱ्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये आज श्रावणातील पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. मध्यरात्री पासूनच अनेक भाविक अनवाणी पायाने दर्शनासाठी मध्यरात्रीच मंदिरात दाखल झाले होते,कमीत कमी वेळात दर्शन मिळाव यासाठी मंदिर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.

 

28 July 2025 09:43 AM

नाशिकमध्ये कोयता बाळगत दहशत माजवणाऱ्याला अटक

नाशिक शहरातील सिडको परिसरात कोयता बाळगत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईताला अटक करण्यात आलीये. गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने संभाजी स्टेडियम जवळ ही कारवाई केलीये. वैभव नंदू कुमावत असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाचे पोलीस यांना एक जण कोयता बाळगत नागरिकांना धमकी देत दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचत संभाजी स्टेडियमच्या भींतीलगत सिंहस्थनगर येथे त्याला ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आलीये.

 

28 July 2025 09:42 AM

विविध गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार केरला राजू जॉनला कारागृहात स्थानबद्ध

खंडणी, हाणामारी, जबरी चोरी अशा विविध गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ केरला राजू जॉन  याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) वर्षभरासाठी मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे... सुभाष रोडवरील भारती मठ येथे राहणारा सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ केरला राजू जॉन विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी जॉन यांचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. 10 जून रोजी स्थानबद्ध करण्याचा आदेश मंजूर झाला होता. मात्र, अनिकेत उर्फ केरला हा फरार होता. गुन्हे शोधा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक यांच्या पथकाने मनमाड येथे जाऊन सापळा रचून जॉन यास शिताफीने अटक केलीये. त्यानंतर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एकन वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

28 July 2025 09:38 AM
28 July 2025 09:08 AM

बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी अचानक पोहोचले 25 IPS अधिकारी; नेमकं कारण काय?

28 July 2025 09:04 AM

पवईत खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू 

पवई येथील रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार खाली पडला. त्याचवेळी मागून आलेला डम्पर अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार ठार झाला. मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव लालू कांबळे (59) असे आहे. मित्राला भेटण्यासाठी लालू कांबळे शनिवारी दुपारी बाहेर पडले. एनटीपीसी जंक्शन येथे आले असता त्यांना खड्डा दिसला. खड्डा पाण्याने भरलेला असल्याने त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकीसह ते खाली पडले. त्याचवेळी मागून आलेला डम्पर कांबळे यांच्या अंगावरून गेला. कांबळे यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी डम्परचालकाला अटक केली आहे.

 

28 July 2025 08:54 AM

...तर टोलनाके उखडून फेकू... राष्ट्रवादी SP आक्रमक

मुंबई गोवा महामार्ग अर्धवट असताना आणि रस्त्यांची दुरवस्था असताना ठिकठिकाणी टोल वसुलीची तयारी केली जात आहे आहे. रायगड जिल्ह्यात सुकेळी खिंड आणि पोलादपूर जवळ टोलनाके उभारण्यात आले आहेत. आता या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. रस्त्याचे काम अर्धवट असताना टोल वसुलीचा प्रयत्न झाला तर टोलनाके उखडून फेकण्याचा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलाय. 

 

28 July 2025 08:54 AM
28 July 2025 08:50 AM

पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर 

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस असल्यामुळे जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरले आहेत. राधानगरी धरण देखील 100% भरला असून त्यातून विसर्ग सुरू आहे. याचा परिणाम म्हणून नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात चौथ्यांदा पात्रा बाहेर पडले आहे. पण पहिल्यांदाच हे पाणी शहरातील गायकवाड पुतळ्याजवळ आले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 8 इंचावर पोहोचले असून पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली गेली आहेत. 

 

28 July 2025 08:45 AM

....तर कर्जतमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असता; सुनील तटकरेंचा मित्रपक्षांवर निशाणा

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांच्या पराभवाचं शल्य प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आजही सलतं आहे. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत सुनील तटकरे यांनी महायुती मधील मित्र पक्षांवरच निशाणा साधलाय. विधान सभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेल्या जागांवर मित्र पक्षांनी आयत्यावेळी एबी फॉर्म देऊन आपले उमेदवार उभे केले. याची थोडी जरी पूर्वकल्पना असती तर कर्जतमध्ये सुद्धा एबी फॉर्म दिला असता आणि आज आपला आमदार आपल्यासोबत बसलेला पाहायला मिळाला असता , असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. 

 

28 July 2025 08:10 AM

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरी सजली

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पहाटेची महापूजा आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून पहाटेपासूनच भाविक भक्तांची ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर परिसर गर्दी पाहायला मिळत आहे,बम बम भोले च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून,मंदिर गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला आहे. 

 

28 July 2025 08:01 AM

वारणा नदीची पाणी पातळी वाढल्याने ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.वारणा नदीची पाण्याची पातळी वाढल्याने ऐतवडे खुर्द पुलावरून पाणी वाहू लागला आहे,त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे
त्यामुळे कोल्हापूरचा जवळचा असणारा संपर्क तुटला आहे.खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाकडून पुलावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच चिकुर्डे आणि ठाणापुडे येथे वारणा नदी पात्र बाहेर पडली आहे. चांदोली अधरण-पांडोट क्षेत्रात पडणारा संततदार पाऊस त्यामुळे धरणातून पाण्याचा सुरू असलेला निसर्ग यामुळे वाहना नदीचे पाण्याची पातळी ही झपाट्याने वाढली आहे,या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडू वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

 

28 July 2025 07:57 AM
28 July 2025 07:55 AM

राज्यात 6 महिन्यांत अपघातांत वाढ 

राज्यात विविध सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करूनही जानेवारी ते जून या कालावधीत रस्त्यांवरील प्राणघातक अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 21 ने वाढली आहे. एकूण अपघात आणि अपघाती मृत्यूंमध्ये मात्र किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे. राज्य वाहतूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. राज्यात चार कोटींहून अधिक नोंदणीकृत वाहने आहेत. रस्त्यांवर दरवर्षी 35 हजारांहून अधिक अपघात होत असून, त्यांत 15 हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद होते. रस्ते आणि महामार्ग वाढल्याने रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आव्हान निर्माण झाले आहे.

28 July 2025 07:11 AM

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा

लोकसभेत उद्यापासून ‘ऑपरेशन सिंदूर’वर 16 तासांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.चर्चेची सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने होणार असून, चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हस्तक्षेप करतील.ही चर्चा प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी सुरू होईल.काँग्रेसकडून राहुल गांधी हे पक्षनेते म्हणून चर्चेत हस्तक्षेप करतील. विरोधी पक्षांकडूनही मातब्बर नेत्यांची यादी चर्चेसाठी तयार ठेवण्यात आली आहे. समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव आणि राजीव राय, तृणमूल काँग्रेसकडून अभिषेक बॅनर्जी, द्रमुककडून कनिमोळी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे चर्चेत भाग घेणार असल्याची शक्यता आहे.दोन्ही बाजूंकडून ताकदवान वक्ते चर्चेसाठी सज्ज झाले असून, ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या इतिहासातील एक दीर्घ आणि तीव्र चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

 

28 July 2025 07:01 AM

इंग्लंडच्या रडीच्या डावाची जगभरात चर्चा; सामना संपण्याच्या पाच ओव्हरआधी काय झालं पाहा

28 July 2025 06:59 AM

वर्ध्यात भाजपची बैठक

वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मंथन बैठक सेवाग्रामच्या चरखागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.  विदर्भातील भाजपचे मंत्री,खासदार आणि आमदार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असून निवडणुकांबाबत रणनीती ठरविली जाणार आहेय.एकेकाळच्या काँग्रेसच्या जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेय..सेवाग्राम मध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.बैठकीच्या आढाव्याच्या बातम्या पाठवितो.

 

28 July 2025 06:58 AM

ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकारी आज राज्यपालांची भेट घेणार

राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे याविषयावरून राज्यपाल यांची भेट घेणार,ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकारी राज्यपालांना भेटणार,वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची मागणी करणारे निवेदन राज्यपालांना दिले जाईल,  
काँग्रेसच्या खासदारांना व्हीप जारी. काँग्रेसने आपल्या लोकसभा खासदारांना 28, 29 आणि 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते सभागृह तहकूब होईपर्यंत उपस्थित राहण्याचा तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. या काळात पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

28 July 2025 06:56 AM

पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी शिवाजीनगर कोर्टानं सर्व 7 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाआरोपींना अडकवायचा प्रयत्न - आरोपींचे वकील ,पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी कोर्टात सुनावणी ,पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी,आरोपींना अडकवायचा प्रयत्न - आरोपींचे वकील
 

 

28 July 2025 06:56 AM

पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी शिवाजीनगर कोर्टानं सर्व 7 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाआरोपींना अडकवायचा प्रयत्न - आरोपींचे वकील ,पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी कोर्टात सुनावणी ,पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी,आरोपींना अडकवायचा प्रयत्न - आरोपींचे वकील
 

 

28 July 2025 06:55 AM

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली दौऱ्यावर

नागपंचमी व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपाच्या वतीने लोठेमंकाळ तालुक्यातल्या नांगोळे या ठिकाणी देवा भाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा आयोजन करण्यात आला आहे. 555 बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत.पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत या शर्यतीचे उद्घाटन होणार आहे.वेळ / 10 वाजता.

 

28 July 2025 06:54 AM

पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस 

पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस,भिडे पूल पाण्याखाली पुणे भिडे पुल पाण्याखाली,नदीपात्रातले रस्ते वाहतूकीसाठी बंद,काही गाड्या पाण्यात अडकल्या,पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला. नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 6 वाजल्यापासून 18 हजार क्युसेक ने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे 

 

28 July 2025 06:53 AM

भाजप नेते किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर

भाजप नेते किरीट सोमय्या हे उदया दुपारी 2 वाजता वाशिम दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील गैरव्यवहार, तसेच इतर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत

 

28 July 2025 06:53 AM

भारत विरुद्ध इंग्लंड चौथी टेस्ट ड्रॉ

जाडेजा आणि वॉशिंगटन सुंदरची शानदार शतकी खेळी,इंग्लंड सीरीजमध्ये 2-1 अशी आघाडीवर, टीम इंडियाचे सीरिजमधील आव्हान अजूनही कायम. 

 

Read More