Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Today LIVE: मराठी माणूस एकत्र येवू नये म्हणून हा GR रद्द केलाय - उद्भव ठाकरे

Maharashtra Breaking News Today 29 June 2025 LIVE Updates :  दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा तुम्ही या ब्लॉगमधून संक्षिप्त स्वरुपात घेऊ शकता.  

Today LIVE: मराठी माणूस एकत्र येवू नये म्हणून हा GR रद्द केलाय - उद्भव ठाकरे
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा तुम्ही या ब्लॉगमधून संक्षिप्त स्वरुपात घेऊ शकता.

29 June 2025
29 June 2025 20:18 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी दहा वाजता बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक 

मुख्यमंत्री फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची सकाळी दहा वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठक बोलावली आहे

29 June 2025 20:18 PM

मराठी माणूस एकत्र येवू नये म्हणून हा GR रद्द केलाय - उद्भव ठाकरे 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदपार पडली. यावेळी यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत म्हटले की, 'मराठी अमराठी वाद पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मराठी माणूस एकत्र येवू नये म्हणून हा GR रद्द केलाय. मराठी माणसाच्या शक्ती समोर लोक हारू शकतात हे स्पष्ट झालं'. 

29 June 2025 20:01 PM

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी नागोठणे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहने कोंडीत अडकली वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. वीकेंडला कोकणात आलेल्या प्रवाशांची परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. 

29 June 2025 19:36 PM

5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही - संजय राऊत 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करणार असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता शिवसेना UBT चे प्रमुख उद्धव ठाकरे हे रात्री आठ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वी शिवसेना UBT चे नेते संजय राऊत यांनी 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही असं ट्विट केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द!,हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण.. ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान)'. 

29 June 2025 19:22 PM

उद्धव ठाकरेंची रात्री आठ वाजता पत्रकार परिषद 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदपार पडली. यावेळी यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करणार असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता शिवसेना UBT चे प्रमुख उद्धव ठाकरे हे रात्री आठ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 

29 June 2025 18:59 PM

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदपार पडली. यावेळी यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करणार असं त्यांनी म्हटलं. 

29 June 2025 18:45 PM

नव्या जीआरमध्येही मराठी भाषा सक्तीची - मुख्यमंत्री 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी हिंदी भाषा सक्तीवरून चाललेल्या वादावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदी अनिवार्य नाही पर्यायी आहे असं म्हटलं. तसंच नव्या जीआरमध्येही मराठी भाषा सक्तीची असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.  

29 June 2025 18:45 PM

हिंदी अनिवार्य नाही पर्यायी - मुख्यमंत्री फडणवीस 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदपार पडली. यावेळी यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी हिंदी भाषा सक्तीवरून चाललेल्या वादावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदी अनिवार्य नाही पर्यायी आहे असं म्हटलं. 

 

29 June 2025 18:16 PM

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत. 

29 June 2025 17:58 PM

संत सोपान काका पालखीचे मेंढ्यांचे रिंगण पिंपळीत पार पडलं 

संत सोपान काका महाराज पालखी सोहळा पंढरपूर कडे जात असताना बारामती तालुक्यातील पिंपळी येथे सोपान काका पालखीचे मेंढ्यांचे रिंगण पार पडले आहे. बारामतीचा मुक्काम आटपून पालखी सोहळा  पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला असताना पिंपळी येथे मेंढ्यांचे रिंगण पार पडले हे रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी  गर्दी केली होती.

29 June 2025 17:16 PM

 नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झाडे पडली

 नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. तीन राज्यांना जोडणाऱ्या नेत्रंग शेवाळे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळलं. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. 

29 June 2025 17:04 PM

महाराष्ट्रात खळबळ! अमरावतीत पोलीस अधिकारी ASI अब्दुल कलाम यांची निर्घृण हत्या

 

29 June 2025 17:01 PM

महाराष्ट्रात एकाचवेळी 51 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि 5 नवीन डीसीपींची नियुक्ती; गृह खात्याचा मोठा निर्णय

 

29 June 2025 16:26 PM

मुंबई-नाशिक महामार्ग वाहतूक कोंडी... वाहनांच्या लांबस लांब रांगा

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी जवळील वडपे ते येलई या परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. जवळजवळ दोन तासांपासून जास्त काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचे वाहन चालकांतून बोलले जाते. यामुळे या मार्गावर वरून प्रवास करणारे सर्वच प्रवासी या वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. 

29 June 2025 16:26 PM

शिर्डी - साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरती?

िर्डीच्या साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरतीचा आरोप केला जातोय. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा संशय असून जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

29 June 2025 16:01 PM

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हिंदी भाषेच्या GR ची होळी

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हिंदी भाषेच्या GR ची होळी करण्यात आली. शहरातील शालीमार चौकात हिंदी भाषेच्या GRची होळी करण्यात येतंय.. आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो शिवसैनिक एकत्र आले. तसंच माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते आणि शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. 

29 June 2025 15:43 PM

हिंदी भाषेविरोधात शिवसेना UBT आक्रमक, राज्यभरात शासन निर्णयाची होळी करत आंदोलन

हिंदी भाषेविरोधात शिवसेना UBT आक्रमक झालीये. राज्यभरात शासन निर्णयाची होळी करत आंदोलन करण्यात येतंय. मुंबईत मराठी पत्रकार संघासमोर शिवसेना UBT ने आंदोलन केलंय. यावेळी हिंदीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. दुसरीकडे मुंबई प्रेस क्लबसमोरही ठाकरे सेनेकडून निदर्शन करण्यात आली.

29 June 2025 15:41 PM

'या' तारखेला सुरु होणार Asia Cup 2025, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट

29 June 2025 15:41 PM

मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी सरपंचांपासून आमदार खासदार, मंत्र्यांना जरांगेंचं आवाहन

27 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या  मोर्चात सहभागी व्हा आन आवाहन जरांगे यांनी सरपंचांपासून आमदार खासदार, मंत्र्यांना केलंय.हे लोकप्रतिनिधी या मोर्चात सहभागी न झाल्यास त्यांना न बोलता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा ईशारा जरांगे यांनी लोकप्रतिनिधीना दिलाय.हा मोर्चा काढायचा नसेल तर आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा असंही आवाहन जरांगे यांनी सरकारला केलंय. 

29 June 2025 14:50 PM

शिवसेना UBT ला आगामी महापालिका निवडणुका पूर्वी नाशिकमधून मोठा धक्का

उद्धव ठाकरे पक्षाला नाशिक मधून आगामी महापालिका निवडणुका पूर्वीच पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नाशिक मधील अनेक माजी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि  युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिट्टी दिली. काही वेळातच ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. 

29 June 2025 13:54 PM

गोपीचंद पडळकरांची किल्ले रायगडला भेट, धनगर समाजा सोबत साधला संवाद 

किल्ले रायगडावरील काही अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी प्रशासनाकडून तेथील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज किल्ले रायगडावर येऊन तिथल्या धनगर समाजाच्या वस्तीला भेट देऊन पहाणी करत संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर या नोटीस राज्य सरकार ने दिल्या नसून त्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आहेत कुणाच्या सूचनेवरून या नोटीस देण्यात आल्या याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी करत इथला अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत असे स्पष्ट केले पुरातत्व आणि वन विभागाचे जन्म होण्या आधीपासून धनगर समाजाचे वास्तव्य गडावर असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

29 June 2025 12:51 PM

गडचिरोलीच्या 108 सेवेच्या रुग्णवाहिकेला भीषण आग

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण व नातेवाईक घेऊन निघालेली 108 सेवेची रुग्णवाहिका आधीच्या विळख्यात सापडली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर गावाजवळ गोंडबोरी परिसरात घडली. रुग्ण घेऊन जाणाऱ्या या वाहनातून अचानक धूर निघू लागला व  स्फोट होऊन आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत रुग्ण व नातेवाईकांना बाहेर काढले. काही क्षणातच संपूर्ण रुग्णवाहिका जळू लागली.

29 June 2025 11:44 AM

शरद पवार अजित पवार यांनी एकमेका शेजारी बसणे टाळले

टेक्नॉलॉजी डेमोस्टेशन प्रोजेक्ट चे उद्घाटन कार्यक्रम बारामती सायन्स सेंटरच्या कृषी विज्ञान केंद्र येथे  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांचे शुभहस्ते झाल्यानंतर  काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार आज एकत्र आले मात्र त्यांनी एकत्र बसण्याचे टाळले.अजित पवारांनी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हाताला धरून त्यांना खुर्चीवर बसवत शरद पवार यांच्या शेजारी बसणे टाळले. थोड्या वेळात माळेगाव शारदानगर येथील  अटल इंक्युबेशन सेंटरमध्ये मंथन हॉल येथे  मुख्य कार्यक्रम होणार असून हे दोघे पुन्हा त्या ठिकाणी एकत्र येणार आहे.

29 June 2025 11:40 AM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी मनसे-ठाकरे गटात हालचाली सुरू

ठाकरे-मनसे युतीसाठी मागील महिनाभरात हालचालींना वेग आला आहे. वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यात दोन ते तीन गुप्त भेटी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. संदीप देशपांडे आणि वरून सरदेसाई यांच्यात चार वेळा सविस्तर चर्चा झाली. २०१७ मध्ये युतीची सूत्रं बाळा नांदगावकर-संदीप देशपांडे यांच्या हाती होतं; यंदाही तेच चेहेरे सक्रिय असल्याची माहिती आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसाठी दोन्ही बाजूंनी पडद्यामागून चाचपणी होत असून 
दोन्ही गटांत नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया; मात्र मागील महिनाभरापासून बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. 

29 June 2025 10:11 AM

ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण...; मनसेचं मनोरंजनसृष्टीला आवाहन

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत, "ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण, कृतज्ञता म्हणून सर्वांनी 5 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया 5 जुलैला मराठी मालिका, चित्रपट यांचे शुटींग बंद ठेवावे ही विनंती. धन्यवाद," असं आवाहन केलं आहे.

29 June 2025 09:39 AM

जगन्नाथ रथयात्रा: पुरीच्या गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी.

29 June 2025 09:25 AM

पुणे  नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच ड्रेनेज लाईनचं पाणी थेट महामार्गावर येतं आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र काल  चाकणच्या आंबेठाण चौकातील खड्डे बुजवल्यानं प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

29 June 2025 09:21 AM

शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहेत. सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान राणेंनी मारामा-या, मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. नारायण राणे यांना जवळून पाहिलं आहे. त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, मर्डर वगैरे सगळं झालं असं भरत गोगावले म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

29 June 2025 07:53 AM

5 जुलैला दोन बंधू एकत्र येणार असल्याचं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टू द पॉईंट या मुलाखतीत केलं आहे. दोन भावांनी एकत्र यावं, एकत्र ताकद दिसावी म्हणून एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. आमच्या शिवसेनेचा 7 जुलैला मोर्चा होता, आणि राज ठाकरेंनी आधी 6 जुलैला मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र यायला हवेत म्हणून आम्ही मोर्चाची तारीख 5 जुलै केल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

29 June 2025 07:51 AM

आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. अंतरवालीतली ही बैठक ही शेवटची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत. मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

29 June 2025 07:51 AM

 भाजप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाविरोधात आक्रमक

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाविरोधात भाजप आणि शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. याचाच भाग म्हणून आज भाजप मुंबईतील घाटकोपरमध्ये आंदोलन करणार आहेत. भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी त्रिभाषेचा अहवाल स्वीकारला होता. त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं राम कदम म्हणाले. 

29 June 2025 07:47 AM

तिसरी भाषा हिंदीविरोधात शिवसेना UBT आक्रमक

 हिंदीविरोधात राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदीबाबतच्या शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत वांद्रे आणि दादरमध्ये शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे. त्यांच्या या आंदोलनात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही सहभागी होणार आहेत. दुसरीकडे मनसेकडून 5 जुलैच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

29 June 2025 07:42 AM

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठत रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठत रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग लागली आहे. आगीत सात दुकाने जळून खाक झाली असून राजेश दत्ताराम पावस्कर यांच्या इमारतीला आग लागली आहे. आगीवर स्थानिक ग्रामस्थ आणि राजापूर अग्निशामक दलाने मिळवलेले नियंत्रण मिळवले आहे. इमारतीमध्ये असलेले दुकान गाळ्यातील सामान आणि दुकान गाळे जळून नुकसान झाले आहेत. ग्रामस्थांकडून खाजगी गाड्यांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

29 June 2025 07:40 AM

आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांचा मराठी बाणा पाहायला मिळाला आहे.  मला हिंदी भाषा येत नाही. मराठी येते आणि मराठीतूनच बोलणार असल्याचं रोखठोक विधान आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी केलं आहे. हिंदीत बोलणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.  राज्यात सध्या हिंदी सक्तीचा आरोप होत असतानाच मंत्र्यानेच मराठी बाणा दाखवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याShivrajyabhishek Sohala 2025Shivrajyabhishek Din 2025Shivrajyabhishek Sohala Wishes in Marath
Read More