Maharashtra Breaking News Today LIVE Updates 3 Aug 2025: दिवसभरात राज्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी आणि राजकारण ते समाजकारणापर्यंतचे सर्व अपडेट्स, यासह क्रीडा वर्तुळ आणि देश-विदेशातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा लेखाजोखा पाहा झी 24 तासच्या दैनंदिन Live Blog मध्ये.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 6 आणि 7 ॲागस्ट रोजी नवी दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. नवी दिल्ली दौऱ्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. 7 ॲागस्टला कॅाग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनालाही उपस्थित रहणार आहेत.
-- जालन्यात किरकोळ कारणावरून एकाची हत्या
-- घनसावंगीच्या बोधलापुरी गावातील घटना
-- पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
-- घनसावंगी पोलिसांकडून तपास सुरू
मालेगाव बॉम्बस्फोट,मग दोषी कोण?-शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
स्फोट आपोआप झाला का?, शंकराचार्य यांचा सवाल
नंदुरबारमध्ये आरोग्य विभागाने अवघ्या वर्षभरापूर्वी तब्बल दीड ते पावणे दोन कोटी रुपये खर्चून घेतलेली बोट ॲम्बुलन्स बुडाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी बोट ॲम्बुलन्स तैनात होती. काल रात्री अचानक बोट ॲम्बुलन्स मध्ये पाणी भरून ती बुडल्याचे दिसून आले. बोटॅम्ब्युलेन्सवर ड्रायव्हर आणि एक सहाय्यक तैनात असतो. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. आरोग्य विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच शासनाचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्याचे चित्र...
महादेवी हत्तीन परत मिळावी यासाठी पहाटे पाच वाजता नांदणीहुन निघालेली पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली आहे. राजू शेट्टी याच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. नांदणी ते कोल्हापूर 45 किलोमीटरचे अंतर असून पहाटे पाच वाजल्यापासून मोर्चात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय बांधव सहभागी झालेत. महादेवी हत्तीन परत मिळावी यासाठी राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे विनंती केली जाणार आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पदयात्रेची सांगता होणार आहे.
SIT प्रमुख पंकज कुमावत बीडमध्ये दाखल झाले आहेत. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात चौकशी सुरू होणार आहे. 21 सप्टेंबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. सोमवारी पथकातील अनेक अधिकारी बीडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणावर राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बार मनसैनिकांनी रात्री फोडलाय."आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही!" अशी घोषणा देत, रात्री मनसे समर्थकांनी बारची तोडफोड केली..
मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते त्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी जात होते मनोज जरांगे. आज दुपारी 2:30 वाजता अचानक लिफ्ट बिघडल्याने झाला अपघात. लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटलांसह सहकाऱ्यांना बाहेर काढले. कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती.
Maharashtra Breaking News Live Updates: मुंबईतील रंगशारदा सभागृहात उद्या मनसे पदाधिका-यांचा मेळावा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा. राज ठाकरे करणार पदाधिका-यांना मार्गदर्शन.
पुण्यातील 'ती' 22 ठिकाणं होणार हायटेक! राज्य सरकारनं तब्बल 70 हजार कोटी दिले कारण...https://t.co/uisgDq21M1
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 3, 2025
कृषिमंत्री दत्ता भरणेंचा राजीनामा मागितल्याने खडाजंगी. राष्ट्रवादी SP पदाधिका-याकडून दत्ता भरणेंच्या राजीनाम्याची मागणी
बागलाण तालुक्यातील पवित्र मांगीतुंगी श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र आणि 108 फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्ती या ठिकाणी पावसामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून रविवार पासून पुढील आदेश येईपर्यंत सर्वसामान्य पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे.
सरकार साजरा करणारा धरणाचा वाढदिवस! नियोजनाची जबाबदारी फडणवीसांवर; अजित पवारही..https://t.co/vduOBwYNrG < येथे वाचा सविस्तर वृत्त...#maharashtra #maharashtragovernment #birthday #dam #cm #devendrafadnavis #Tourism
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 3, 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वर्धा रोडवर असणारे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. या धमकीनंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
कुणी आरे केलं तर त्याला कारे करा पण कुणाला उगीच अंगावर घेऊन नका मात्र कुणी अंगावर आलाच तर शिंगावर घ्यायला मागे पुढं पाहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. अलिबाग इथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी आमच्याही नादी लागू नये. हे सर्व करत असताना कायद्याची चौकट मोडू नका असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं
शिवसेनेत आता कुठलीही घराणेशाही नाही, मक्तेदारी नाही. शिवसैनिकांच्या मनातील प्रमुखच पदावर बसणार अस वक्तव्य योगेश कदम यांनी केलं आहे. 'बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या'. उद्धव ठाकरेंनी पक्षांतर्गत निवडणुका बंद केल्याची टीका योगेश कदमांनी उद्धव ठाकरेंवर केली.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवायला बसलो आहे असं विधान खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्याकडे एवढे पैसे येतात कुटून? असा सवाल देखील नारायण राणे यांनी केला आहे.
बेंचवर बसण्याच्या वादातून विद्यार्थ्यांचा तुफान राडा! एकाचा मृत्यू, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल#nashikcrime #CrimeNews #TrendingNews https://t.co/ATLj2wQ1Zz
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 3, 2025
पनवेलमध्ये मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी रात्री बारवर काठ्या आणि दगडफेक करून बारची तोडफोड केली. या प्रकरणी मनसे पदाधिकारी योगेश चिले आणि 15 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे गुन्हे दाखल केले आहेत.
रायगड जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव आणि माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाकूर यांच्या अनेक समर्थकांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
नांदणी मठातील महादेवी हत्तीन परत मिळावी यासाठी कोल्हापुरात हजारोच्या संख्येत पदयात्रा काढली जात आहे. सकाळी पाच वाजता नांदणीमधून या पदयात्रेला सुरुवात झालीय. हजारोच्या संख्येने महादेवी हत्ती प्रेमी या पदयात्रेत सहभागी झालेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याच्या प्रमुख उपस्थितीतीत ही पदयात्रा काढली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत डान्सबारला थारा नाही!' असा घोषणा देत मनसेने पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बारवर रुद्रावतार धारण करत जोरदार हल्ला चढवला. शनिवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बारवर धडक देत तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्येही तीव्र पडसाद उमटले आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.