Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 30 July 2025: लोकसभेतील ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील चर्चा आणि राज्यातील राजकीय घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर  

Maharashtra Breaking News Today LIVE:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 30 July 2025:  लोकसभा आणि राज्यसभेतील घडामोडींसह राज्यातील राजकीय घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स, त्याचसोबत दिवसभरातील ताज्या घडामोडींचा धावता आढावा वाचकांना या ठिकाणी अगदी मोजक्या शब्दांमध्ये पाहता येईल.

30 July 2025
30 July 2025 21:11 PM

नागपुरात दिव्या देशमुखचं जंगी स्वागत 

FIDE महिला विश्वचषक 2025 चॅम्पियन महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख जिंकल्यानंतर बुधवारी नागपूर विमानतळावर आगमन झालं. FIDE महिला विश्वचषक 2025 चॅम्पियन जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. अवघ्या 19 व्या वर्षी, दिव्याने प्रतिष्ठित FIDE महिला विश्वचषक 2025 चॅम्पियन जिंकून ग्रँडमास्टर किताब मिळवून इतिहासात आपले नाव कोरले, ती भारताची ८८ वी ग्रँडमास्टर आणि ही उल्लेखनीय कामगिरी करणारी फक्त चौथी भारतीय महिला बनली. तिचा विजय जागतिक बुद्धिबळात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच उदाहरण आहे.

30 July 2025 20:42 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यपाल यांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

30 July 2025 20:41 PM

खराब हस्ताक्षर काढल्याने शिक्षिकेने तिसरीच्या विद्यार्थ्याच्या हातावर दिले जळते मेणबत्तीचे चटके

मुंबईच्या मालाड पूर्व येथील फिल्मसिटी रोडवरील गोकुळधाम परिसरात घडलेली ही घटना प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात संताप आणणारी आहे. एका खासगी शिकवणीत तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याला फक्त हस्ताक्षर नीट काढता येत  नाही म्हणून शिक्षिकेने जळत्या मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात सदर शिक्षिका विरोधक तक्रार दिली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली आहे.आरोपी शिक्षिकेचे नाव राजश्री राठोड असल्याचे पोलिसांनी सांगितले   असून पुढील चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले. 

30 July 2025 20:04 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्यावेळापूर्वीच दिल्लीत दाखल झाले आहेत. आज रात्री ते  दिल्लीत खासदारां तसेच सगळ्या राज्य प्रमुखांची बैठक सुद्धा घेणार आहेत. 

30 July 2025 20:03 PM

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून आलेल्या दिव्य देशमुखच मुंबई विमानतळावर स्वागत 

FIDE महिला विश्वचषक 2025 चॅम्पियन महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख जिंकल्यानंतर बुधवारी दुपारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. FIDE महिला विश्वचषक 2025 चॅम्पियन जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. अवघ्या 19 व्या वर्षी, दिव्याने प्रतिष्ठित FIDE महिला विश्वचषक 2025 चॅम्पियन जिंकून ग्रँडमास्टर किताब मिळवून इतिहासात आपले नाव कोरले, ती भारताची ८८ वी ग्रँडमास्टर आणि ही उल्लेखनीय कामगिरी करणारी फक्त चौथी भारतीय महिला बनली. तिचा विजय जागतिक बुद्धिबळात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच उदाहरण आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तिच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यात आला. 

30 July 2025 20:02 PM

खासदार संदीपपान भूमरे श्रीकांत शिंदे यांच्या घरी दाखल

संदीपान भूमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर शेकडो कोटींची जमीन घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संदीपान भूमरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. 

30 July 2025 18:59 PM

अमेरिकेकडून भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लागू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बुधवारी (30 जुलै) मोठी घोषणा केलीआहे. त्यांनी म्हटलं आहे की येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून भारताला 25 टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नाहीत.

30 July 2025 18:18 PM

 माविम च्या महिला गटाचा मोर्चा

महिला आर्थिक विकास महामंडळ सीएमआरसी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता २५ लक्ष रु. निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करुन द्यावेत. समुदाय साधन व्यक्ती यांना उमेद प्रमाणे ६०००/-रु. मासिक मानधन करिता तरतूद द्यावी, प्रत्येक गटाला ३०,०००/-रु. फिरता निधी तसेच ७% व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या

30 July 2025 17:15 PM

उल्हासनगरमधील इमारतीतील फ्लॅटला भीषण आग

उल्हासनगर कॅम्प नंबर दोन येथील अमर धाम चौकातील अमर पॅलेस इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली . पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 101 मध्ये अचानक आग लागली. त्यानंतर ही आग काही वेळातच दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 201 पर्यंत पोहोचली. सुदैवाने घरातील लोक बाहेर पळाल्याने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाहीये मात्र मालमत्तेचा मोठं नुकसान झाले आहे. सदर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

30 July 2025 17:02 PM

 आयुष्यभर कधीही भाजपसोबत जाणार नाही - महादेव जानकर

आयुष्यभर कधीही भाजपसोबत जाणार नाही तर भाजपला संपविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे काँग्रेसला मस्ती होती म्हणून भाजपसोबत गेलो होतो अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलीय ते आज अकोल्यात आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे

30 July 2025 17:02 PM

 आयुष्यभर कधीही भाजपसोबत जाणार नाही - महादेव जानकर

आयुष्यभर कधीही भाजपसोबत जाणार नाही तर भाजपला संपविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे काँग्रेसला मस्ती होती म्हणून भाजपसोबत गेलो होतो अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलीय ते आज अकोल्यात आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे

30 July 2025 17:01 PM

 अंगणवाडीच्या छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही विद्यार्थी जखमी नाही

अंगणवाडीतील खोलीत चिमुकले विद्यार्थी शिकत असताना अचानक छताचा काही भाग कोसळला, सुदैवाने यामध्ये कोणीही विद्यार्थी जखमी झाला नाही. नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील सातेगाव येथे ही घटना घडली. पावसामुळे आंगणवाडीच्या छताचा भाग कोसळल्यचे सांगण्यात आले. 30 ते 35 वर्ष जुनी ही अंगणवाडीची इमारत आहे. घटनेच्या वेळी काही लहान मुले अंगणवाडीत उपस्थित होती. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली आहे, त्यामूळे दुर्घटनेची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र आंगणवाडीसाठी नवीन जागा देण्यात आली नाही. या घटने नंतर तरी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 

30 July 2025 16:57 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार, राज्य प्रमुखांची घेणार बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. आज रात्री ते  दिल्लीत होणार दाखल होणार असून येथे ते खासदारांची घेणार बैठक घेणार आहेत. सगळ्या राज्य प्रमुखांची बैठक ते घेणार असून फक्त आज रात्रीच  शिंदेंचा दौरा असणार आहे. 

30 July 2025 16:52 PM
30 July 2025 16:45 PM

बुमराह, पंत, शार्दूल बाहेर... पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 4 मोठे बदल? गंभीर घेणार फायनल कॉल 

30 July 2025 16:45 PM

बुमराह, पंत, शार्दूल बाहेर... पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 4 मोठे बदल? गंभीर घेणार फायनल कॉल 

30 July 2025 16:38 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शिंदेंचा हा दौरा यापूर्वी ठरलेला नव्हता. सध्या मंत्री मंडळात काही बदल होण्याच्या चर्चा आहेत, तसेच वरिष्ठांच्या गाठीभेटी यासाठी शिंदेंचा हा दिल्ली दौरा असू शकतो. सध्या मुंबई विमानतळावर मंत्री उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे. 

30 July 2025 15:42 PM

रायगडावर एक दिवस संसदीय अधिवेशन घ्या - खासदार निलेश लंके यांची मागणी

रायगडावर एक दिवस संसदीय अधिवेशन घ्या अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे. निलेश लंके म्हणाले की,  'शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केल होते म्हणजे आताच मंत्रिमंडळ, अष्टप्रधान म्हणजे लोकशाहीचा पाया होता. एक दिवस अधिवेशन रायगडावर व्हाव ही माझी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की एक दिवसीय अधिवेशन रायगडावर घेण्यात यावं'. 

30 July 2025 15:42 PM

सरकारमधलं कोणी काही करो, मुख्यमंत्र्यांना मान्यचं - कोकाटेंच्या राजीनाम्यावरून जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

कोणी काही केलं तरी,कोणाला राजीनामा देऊ द्यायचं नाह,हेच सरकारचं धोरण असून मंत्री आणि आमदारांनी केलेलं कृत्य मुख्यमंत्र्यांना देखील मान्यच आहे, असाच अर्थ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच आपल्या सरकार जनतेसमोर कसं दिसतं याचा बारकाईने मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे,जर संवेदनशीलता कमी झाली तर असं विचार करणे थांबते,असा खोचक टोलाही जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून आमदार जयंत पाटलांनी ही टीका केली आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. 

30 July 2025 15:07 PM
30 July 2025 14:13 PM

मुंबई गोवा महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आज मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीतील टोल नाक्यावर आंदोलन केले. महामार्गाची दुरवस्था झाली आहे. प्रवासी, चाकरमानी खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत. पहिले खड्डे बुजवा, रस्ते सुस्थितीत आणा नंतरच टोल नाक्याची उभारणी करा. टोल नाक्याचे काम थांबवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. खड्डे बुजवले नाहीतर स्वातंत्र्य दिनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 

30 July 2025 13:29 PM

अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द 

अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द. योगेश कदम यांच्यावरील आरोपांबाबत होणार होती पत्रकार परिषद. सदानंतर कदम योगेश कदम यांचे काका. परबांचा बोलविता धनी कोण? 

30 July 2025 13:27 PM
30 July 2025 13:20 PM

Maharashtra Breaking News Today Live Updates: 'कृषी विभागातील घोटाळ्याची SIT चौकशी करा'

कृषी विभागातील घोटाळ्याची SIT चौकशी करा', अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. 'DBTचा निर्णय डावलून अनेक निर्णय झाले. 78 बोगस कंपन्यांमार्फत गैरव्यवहार झाल्याचा आरोप. मुंडेंच्या काळात कृषी विभागाचे निर्णय आकाच घेत होता असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

30 July 2025 13:19 PM
30 July 2025 13:12 PM

शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. उद्धव ठाकरेंच्या याचिकेवरची सुनावणी आता 15 सप्टेंबरनंतर. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी पुढे ढकलली. न्या. सूर्यकांत यांच्या घटनापीठाच्या सुनावणीमुळे शिवसेनेची याचिका पुढे ढकलली. 

30 July 2025 12:54 PM

शेतकऱ्यांचा अजित पवारांवरचा विश्वास उडाला, विजयकुमार घाडगेंची टीका

शेतकऱ्यांचा अजित पवारांवरचा विश्वास उडाला. विजयकुमार घाडगेंची पत्रकार परिषदेत टीका. माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाच्या व्हिडीओचा अहवाल  जनतेसमोर कधी येणार? विजयकुमार घाडगेंकडून सवाल उपस्थित.

30 July 2025 11:36 AM

अनिलकुमारांची नियुक्ती ठाकरेंच्या काळात, राऊतांच्या टीकेला दादा भुसेंचं उत्तर

वसई विरार महापालिका आयुक्तांवर झालेल्या ईडी कारवाईवरून राऊतांनी मोठा दावा केलाय. अनिलकुमारांवरील कारवाईचे धागेदोरे मंत्री दादा भुसेंपर्यंत जाऊ शकतात असं संजय राऊतांनी म्हटलंय. अनिलकुमार पवारांची नियुक्ती दादा भुसेंच्या आग्रहाखातर झाली असल्याचा दावाही त्यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना दादा भुसे यांनी अनिलकुमारांची नियुक्ती ठाकरेंच्या काळात झाल्याचे म्हणत याबाबतची शिफारस राऊतांनीही केली असू शकते म्हणत राऊतांना उत्तर दिलं आहे. तर ईडी स्वायत संस्था, चुकीचं आढळलं तर कारवाई होईल असं म्हटलं आहे.  

30 July 2025 11:27 AM

प्रांजल खेवळकरांच्या वकिलांचा खळबळ जनक दावा

प्रांजल खेवलकरांवरील कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे वकिलांनी म्हटलं आहे. पोलिसांनी केलेली कारवाई बनावट असून, प्रांजल खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. हे सगळं प्रकरण प्रांजल केवळकरांवर ट्रॅप लावून केलं असल्याचा आरोप खेवलकर यांच्या वकिल विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केलाय. ज्या महिलेचा पर्समध्ये हे कोकिण सापडले ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचा खळबळ जनक दावा प्रांजल केवळकर यांची वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केलाय.

30 July 2025 11:20 AM

बारामतीत या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी, प्रशासनाचा निर्णय

रविवारी बारामतीत झालेल्या भीषण अपघातानंतर अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत बारामतीत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. या वेळेत अवजड वाहनांना बारामती शहरात प्रवेश नाकारण्यात आलाय. शहरातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. 

30 July 2025 11:14 AM

बारामतीत या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी, प्रशासनाचा निर्णय

रविवारी बारामतीत झालेल्या भीषण अपघातानंतर अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत बारामतीत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. या वेळेत अवजड वाहनांना बारामती शहरात प्रवेश नाकारण्यात आलाय. शहरातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. 

30 July 2025 10:37 AM

संजय शिरसाट अजित पवार यांच्या भेटीला

संजय शिरसाट हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. निधीबाबतच्या मुद्यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील मल जलवाहिन्या आणि मैला टाक्या रोबोटद्वारे साफ करण्याबाबतच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. राज्यातील सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घरांबाबत धोरण निश्चित करण्याबाबतचा मुद्दा अधिवेशनात आला होता यावेळी बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. यानुसार बैठक आयोजित करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि या विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. राज्य सफाई कर्मचारी आयोग, सफाई कर्मचारी संघटना देखील या बैठकीत हजर राहणार आहेत. 

30 July 2025 10:33 AM

 रबाळेत 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय

नवी मुंबईतील रबाळे तलावात एका 25 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. अग्निशमन दलाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक माहिती नुसार आत्महत्या करणारा मुलगा मागील काही वर्षापासून एका विवाहित महिलेच्या प्रेमात होता. याच प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. रबाळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारताना तरुण सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

30 July 2025 10:13 AM

माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल- अंबादास दानवे

माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यांची चौकशी झालीय त्यात ते रमी खेळत होते स्पष्ट झाले आहे. तो रिपोर्ट बाहेर आला नाहीय. मात्र त्यांची संवेदन शिलता काय आहे असा प्रश्न पडतोय. त्यांना माफ करणे योग्य नाही अन्यथा सरकार शेतकरी विरोधी आहे. राजीनामा द्या घ्या काय करायचं ते करा. नाहीतर सभागृहात पट्ट्यांचा डाव सुरू करा. सरकार संस्कृतीच्या गप्पा मारते आणि मंत्र्यांचे काय सुरुय बघा. मुख्यमंत्री नुसती नाराजी व्यक्त करू नका, दमबाजी करू नका, कारवाई करा असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

30 July 2025 09:38 AM

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाख रुपयांची मागणी

एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फतच पोलीस अधिकाऱ्याकडे बदलीसाठी 35 लाखांची मागणी. पोलीस निरीक्षकाला इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी केली पैशांची मागणी. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी देखील मागितले पैसे. संशयित सागर पांगरे यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात.

30 July 2025 09:01 AM

नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात गुटखा बंदीसाठी अनोखे आंदोलन

गुटखा बंदीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने अनोखे आंदोलन सुरु केले आहे. गुटख्याच्या पुड्यांचे कपडे घालून या सामाजिक कार्यकर्त्याने पायी यात्रा काढली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते असा आकाश कोकने यांचा आरोप आहे. तेलंगना आणि कर्नाटक मार्गे देगलूर शहरातून नांदेड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी होते. गुटखा बंदीसाठी अनेकवेळा तक्रारी करुन कारवाई होत नसल्याने आकाश कोकणे यांनी गुटख्यांच्या पुड्याचा ड्रेस घालून निपाणी सावरगाव येथून पायी यात्रा काढली. गुटखा बंदीच्या मागणीसाठी त्यांनी देगलूर शहरात उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर त्यांनी आमरण उपोषण सरू केले आहे. 

30 July 2025 08:28 AM

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, बदलापूर- वांगणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी. बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला असून कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. 

30 July 2025 08:03 AM

ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज पंतप्रधान राज्यसभेत बोलणार 

पाकिस्तानकडून भारतावर 1 हजार हजार मिसाईल आणि ड्रोननं हल्ला. भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमनं पाकचे सर्व मिसाईल हवेतच नष्ट केले. लोकसभेत मोदींची मोठी माहिती. ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज पंतप्रधान राज्यसभेत बोलणार. 

30 July 2025 07:41 AM

पुण्यातील सर्व धरणे 90 टक्के पेक्षा अधिक भरली

पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत ही धरणे ९०% पेक्षा अधिक भरली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मंगळवार पासून मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने पुणेकरांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. नदीपात्रातील ब्लू लाईन क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

30 July 2025 07:13 AM

पुण्यात वाहन तोडफोडीचा सुळसुळाट

पुण्यात हडपसर, कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना वाढत असून, गेल्या दीड वर्षात 124 गुन्हे दाखल झाले आहेत. 2024 मध्ये 89 तर 2025 मध्ये जूनअखेर 35 घटना घडल्या.

30 July 2025 06:39 AM

पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री

पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून भाविकांना विकलं जातंय. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय.

Read More