Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News Live Updates: राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या मनसेचे प्रशिक्षण शिबिर

Maharashtra Breaking News Today LIVE: महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या बातम्या व घडामोडींचे अपडेट्स जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून 

Maharashtra Breaking News Live Updates: राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या मनसेचे प्रशिक्षण शिबिर
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE 31 July 2025: महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळं राज्यात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. तर एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का? याविषयी चर्चा रंगल्या आहेत. राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट जाणून घेऊयात एका क्लिकवर

 

31 July 2025
31 July 2025 21:11 PM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 31 July 2025: केंद्रीय मंत्रिमंडळात 6 निर्णय घेण्यात आले. 

इटारसी ते नागपूर चौथ्या रेल्वे मार्गाला आणि संभाजी नगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला 

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मंत्रिमंडळात एकूण ६ निर्णय घेण्यात आले आहेत -

१. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे बळकटीकरण - ₹२,००० कोटी

२. प्रधानमंत्री कृषी संपदा योजना बळकटीकरण - ₹६,५२० कोटी

३. इटारसी - नागपूर चौथा रेल्वे मार्ग - ₹५,४५१ कोटी

४. अलुबारी रोड - न्यू जलपाईगुडी तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग - ₹१,७८६ कोटी

५. छत्रपती संभाजीनगर - परभणी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण - ₹२,१७९ कोटी

६. डांगोआपोसी - जारोली तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग - ₹१,७५२ कोटी

31 July 2025 21:08 PM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 31 July 2025: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या ठिकाणी ही भेट झाली. गेल्या सहा दशकापासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न चर्चेतून सोडवावा. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी माणसाला सुरु असलेल्या अत्याचाराबाबत कर्नाटक सरकारला जाब विचारावा, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

31 July 2025 21:03 PM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 31 July 2025: राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या मनसेचे प्रशिक्षण शिबिर

शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. ह्या शिबिरात फक्त वरील नमूद पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. असून उद्या सकाळी दहा वाजता राज ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत. 

31 July 2025 17:54 PM

मुंबईतील गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचा मोठा निर्णय 

31 July 2025 17:52 PM

Manikrao Kokate : अखेर कोकाटेंना रमीचा डाव भोवला, खाते बदल की राजीनामा? मोठी माहिती समोर

31 July 2025 17:51 PM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 31 July 2025: पुणे ड्रग्ज पार्टीप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. 

31 July 2025 16:09 PM

Maharashtra Breaking News Live Updates: पुणे ड्रग्ज पार्टीप्रकरणी 5 आरोपी कोर्टात हजर

पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 5 आरोपींना  कोर्टात हजर करण्यात आलं. खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात कार्ट निर्णय देईल. तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. प्रांजल खेवलकर याच्यासह इतर चार आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानं, पुणे पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं. 

31 July 2025 16:04 PM

Maharashtra Breaking News Live Updates: महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT गठीत

- महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT गठीत
- पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन
- तात्काळ एसआयटी गठीत करण्याचे आदेश
- पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेखालील समितीत संतोष साबळे आणि एपीआय सपकाळ या अधिका-यांचा समावेश
- ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीवरून एसआयटी गठीत करण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश

31 July 2025 15:54 PM

Maharashtra Breaking News Live Updates: माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार -सूत्रांची माहिती

माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. कोकाटेंचं मंत्रिपद कायम राहणार आहे मात्र, खातं बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. खातं बदलण्याचा निर्णय सुद्धा फडणवीसांनी घ्यावा असा सुद्धा निर्णय झाल्याची माहिती आहे.

31 July 2025 15:35 PM

Ind vs Eng: लॉर्ड्समध्ये भारतासोबत सर्वात मोठा धोका! 30-35 ओव्हर्स जुना चेंडू देत गंडवलं; तो पराभव ठरवून?

31 July 2025 15:34 PM

Maharashtra Breaking News Live Updates: महादेव मुंडेंचे कुटुंबीय मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला 

31 July 2025 15:34 PM

मालेगाव स्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेनंतर फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले 'भगवा...'

31 July 2025 15:23 PM

Maharashtra Breaking News Live Updates: मिठी नदी गाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापे. मुंबई पालिकेला खोटे सामंजस्य करार करणा-या कंत्राटदारांचा समावेश.

31 July 2025 15:06 PM

Maharashtra Breaking News Live Updates: कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील त्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावातील कामगार मागील 10 वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्य टप्प्याने नियुक्ती पत्र दिली जातील. पहिली टप्प्यातील नियुक्तीपत्र 15 ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले. आज आमदार मोरे यांनी विविध विषयावर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली

31 July 2025 14:37 PM

Maharashtra Breaking News Live Updates:दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची घर वापसी

दौंडचे माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडून पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून रंगत होती. आता यावरती शिक्कामोर्तब झाले असून उद्या एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 

मागील अनेक दिवसांपासून दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे घरवापसी करणार अशा चर्चा होत्या. मागील दोन दिवसापूर्वी रमेश थोरात यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चांना अधिक ऊत आला होता.आता एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात यांचा दौंड तालुक्यातील वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अजित पवार गटात पक्ष पवेश होणार आहे.

31 July 2025 14:31 PM

Maharashtra Breaking News Live Updates: मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर इम्तियाज जलील यांचं प्रश्नचिन्ह

मालेगाव निकालाबाबत इम्तियाज जलील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जर आरोपी दोषी नव्हते तर ते इतके दिवस जेलमध्ये का होते असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय. जर सर्व जणं निर्दोष होते तर बॉम्बस्फोट कोणी घडवला याचं उत्तर कधी मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मुंबई ब्लास्टमध्ये राज्य सरकार तातडीने सुप्रीम कोर्टात गेले आता याबाबत जाणार आहे का ते ही सरकारनं स्पष्ट करावं असं जलील म्हणालेत.

31 July 2025 14:28 PM

Maharashtra Breaking News Live Updates: राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काय घडतंय? सह्याद्री अतिथीगृहावर गाठीभेटींना वेग

राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काही घडतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. सह्याद्री अतिथीगृहावर गाठीभेटींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री राज्यपाल यांना भेटले. त्याच दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्लीत काही ज्येष्ठ नेत्यांची गाठीभेटी घेतल्याचीही चर्चा. आज सकाळी अजित पवार वर्षावर जाऊन मुख्यमंत्री यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्री सह्याद्रीवर आले. सुनील तटकरे मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर आले. अजित पवार पुन्हा सह्याद्रीवर आले. आता मुख्यमंत्री, अजित पवार आणि सुनील तटकरे सह्याद्रीवर आहेत.

31 July 2025 14:11 PM
31 July 2025 14:09 PM

Maharashtra Breaking News Live Updates: मालेगाव स्फोटाचे पीडित हायकोर्टात जाणार

मालेगाव स्फोटातील पीडित निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहेत. आरोपींची निर्दोष सुटकेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार आहेत. दरम्यान NIA कोर्टाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही दोषी ठरवू शकत नाही असं सांगत 7 जणांची निर्दोष मुक्तता केलीय. याच निकालाला स्फोटातील पीडित हायकोर्टात आव्हान देणार आहेत

31 July 2025 13:44 PM

Maharashtra Breaking News Live Updates: सह्याद्री अतिथीगृहावर गाठीभेटींचा सिलसिला

सह्याद्री अतिथीगृहावर गाठीभेटींचा सिलसिला. माजी मंत्री धनजंय मुंडेंनी फडणवीसांची घेतली भेट.फडणवीसांची भेट घेऊन धनंजय मुंडे निघाले. अजित पवार, तटकरे अजूनही सह्याद्रीवर

31 July 2025 13:41 PM

Maharashtra Breaking News Live Updates: कोर्टाचा निकाल मान्य करावा लागेलः छगन भुजबळ

कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल. काही दिवसांपूर्वी मुंबई बॉम्ब ब्लास्ट बाबत देखील असंच काहीस झालं. नेमक पोलीस तपासात काय उणिवा आहेत ते तपासल जाईल. भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग तेव्हा आला परंतु त्यानंतर तो कधीही आला नाही. सगळे सुटले जरी असले तरी एवढी वर्ष ते जेल मधे होतेच ना, शिक्षा भोगली आहेच ना, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

31 July 2025 13:33 PM

सत्य कधी पराभूत होत नाही, मालेगाव निकालानंतर एकनाथ शिंदेंचं ट्विट

सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!

31 July 2025 12:54 PM

Maharashtra Breaking News Live Updates: वाघाच्या पिंज-यात शिरला अज्ञात व्यक्ती; नागपुरातील घटना

नागपुरातील महाराजाबाग प्राणी संग्रहालयात एक व्यक्ती चक्क वाघाच्या पिंज-यात शिरला.. इतकच नाही तर दोन वाघ असलेल्या पिंज-यात त्यानं एक रात्र जागून काढली... वाघांच्या पिंज-यातील नाईट शेल्टरमध्ये ही व्यक्ती कर्मचा-याना दिसून आली. याच पिंज-यात 2 वाघही होते. सुदैवानं ते पिंज-यातून नाईट शेल्टरमध्ये येऊ शकले नाहीत, त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला.. मात्र नाईट शेल्टरच्या गेटला बाहेरुन कुलुप असल्यानं त्याला बाहेर पडता आलं नाही.. प्राणी संग्रहालयाच्या कर्मचा-यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं. दरम्यान या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो सुरक्षा भिंत ओलांडून पिंज-यात कसा शिरला याची चौकशी पोलीस करत आहेत.

31 July 2025 12:35 PM

Maharashtra Breaking News Live Updates: मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर मालेगावात जल्लोष करण्यात आला...मुंबईतील विशेष NIA कोर्टाने आज 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व 7 आरोपींना निर्दोष ठरवले.... यानंतर, मालेगाव शहरात नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त करत जल्लोष केलाय..

31 July 2025 12:34 PM

Maharashtra Breaking News Live Updates: 'मालेगाव स्फोटातील मृतांच्या वारसांना 2 लाख द्या' 

'मालेगाव स्फोटातील मृतांच्या वारसांना 2 लाख द्या' तर 'जखमींना 50 हजार देण्यात यावेत', निकालावेळी एनआयए कोर्टाचे आदेश
 

31 July 2025 12:21 PM

Maharashtra Breaking News Live Updates:मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांची पोस्ट

मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांची पोस्ट, 'आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!', असं पोस्ट करत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

31 July 2025 11:42 AM

Maharashtra Breaking News Live Updates: 'पहिल्या दिवसांपासून निर्दोष होतं हे माहित होतं'

पहिल्या दिवसापासून आम्हाला माहिती होत आम्ही निर्दोष होतो. माझ्या मुलीला मुलाला आणि पत्नीला आतंकवाद्याचा मुलाला आणि पत्नी असं बोललं गेल, अशी प्रतिक्रिया रमेश उपाध्याय यांनी दिली आहे.

31 July 2025 11:24 AM

Live Updates: NIA न्यायालयाचा मोठा निर्णय! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

31 July 2025 11:23 AM

Maharashtra Breaking News Live Updates: 17 वर्षात खूप अपमान...; निर्दोष मुक्तता झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

मला गेल्या 17 वर्षात खूप अपमान सहन करावा लागला, स्वतःच्या देशात आम्हाला आतंकवादी बनवण्यात आले. मी संन्यासी आहे म्हणून कदाचित मी जिवंत आहे, मी दररोज मरत होते. आज मला आनंद झाला, कोण तरी आहे जो माझा आवाज ऐकत आहे. हिंदुत्व आणि भगव्याचे आज विजय झाला, असं साध्वी प्रज्ञ्रा सिंह यांनी म्हटलं आहे.

31 July 2025 10:32 AM
31 July 2025 10:31 AM

Maharashtra Breaking News Live Updates: मालेगाव बॉम्बस्फोट निकाल: 'पुरोहितांनी RDX आणि बॉम्ब आणल्याचा पुरावा नाही'

स्फोटस्थळी सापडलेल्या दुचाकीमध्ये आरडीएक्स लावण्यात आले होते हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. प्रसाद पुरोहित दयांनी rdx कश्मीर मधून आणले याचा कोणताही पुरावा नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे

31 July 2025 10:29 AM

Maharashtra Breaking News Live Updates: कर्नाळा सहकारी बँकेची गोठवलेली 380 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं परत केलीये. त्यामुळे या सहकारी बँकेतील जवळपास 5 लाख ठेवीदारांना संपत्तीच्या लिलावातून त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यामुळे या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील यांना अटकही झाली होती.

31 July 2025 10:29 AM

Maharashtra Breaking News Live Updates: साध्वी प्रज्ञासिंह एनआयए कोर्टात हजर

 

31 July 2025 10:18 AM

Maharashtra Breaking News Live Updates:अमेरिकेचा भारताला धक्का, पाकिस्तानशी हातमिळवणी

अमेरिकेचा भारताला धक्का देत पाकिस्तानशी हातमिळवणी केली. अमेरिका-पाकिस्तानमध्ये तेलसाठा करार. ट्रम्पना पाकिस्तानचा पुळका की भारतावर दबाबतंत्र? सवाल उपस्थित

31 July 2025 10:15 AM

Maharashtra Breaking News Live Updates:मनसे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

मनसेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणारेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ थोड्याच वेळात वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या भेटीत ते नागरिकांच्या विविध समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणारेत

31 July 2025 10:13 AM

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागणार, शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा 17 वर्षांनंतर निकाल. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितांसह सात जणांचे भवितव्य ठरणार, मालेगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त 

31 July 2025 10:13 AM

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागणार

नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल येणार आहे.. तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागणार आहे.. 2008 साली मालेगावच्या भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ हा बॉम्बस्फोट झाला होता.. यामध्ये सहा जणांचा मृत्यू तर 101 जण जखमी झाले होते.. आज लागणा-या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय

31 July 2025 10:12 AM

जळगावात जुन्या वादातून तरुणाची हत्या

जळगाव शहर हे आता गुन्हेगारीचे केंद्र म्हणून उदयास येऊ लागले आहे... दोन तरुणांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर भांडणात झाले त्यानंतर एका तरुणाने दुस-या तरुणाची भर रस्त्यात हत्या केलीय.धीरज दत्ता हिवाळे असा 27 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे...तर कल्पेश वसंत चौधरी हा यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव शहराच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवी जोशी कॉलनीत घडली आहे...

31 July 2025 10:07 AM

मुंबई-नागपूर महामार्गावर जळगावजवळ प्रचंड वाहतूक कोंडी

जळगावातून जाणा-या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलावर कंटेनर बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील गिरणा नदीवर असलेल्या बांभोरी पुलावर मधोमध कंटेनरमध्ये बिघाड होऊन ते बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाले आहे...गेल्या दीड तासापासून राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने किमान पाच ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

31 July 2025 09:27 AM

'आधी कॅमेरे लावलेत का पाहा, मगच 'हनी'च्या मार्गाने जा', फडणवीसांची मंत्र्यांना समज; शिवसेनेकडून दावा, 'सर्व CCTV...'

31 July 2025 09:26 AM

'देशहिताचं रक्षण करण्यासाठी....', डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 टक्के कर लादल्यावर मोदी सरकारकडून पहिली प्रतिक्रिया

31 July 2025 09:25 AM

'एक दिवस पाकिस्तान भारताला...,' डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा; पोस्ट शेअर करत घोषणा; आतापर्यंतचा सर्वात मोठा करार

31 July 2025 08:27 AM
31 July 2025 07:42 AM
31 July 2025 19:08 PM

Maharashtra Breaking News Today LIVE: अमेरिकेचा भारतावर पुन्हा टॅरिफ वार

1 ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर 25 टक्के कर, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती.

31 July 2025 19:07 PM

Maharashtra Breaking News Today LIVE: नाशिकमधील कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड

अनिल पवारांच्या नाशिकच्या घरात 1 कोटी 20लाख सापडले. तर काही कागदपत्रंही ईडीच्या ताब्यात

31 July 2025 19:07 PM

Maharashtra Breaking News Today LIVE: ईडीच्या कारवाईचा फटका शिवसेनेच्या मंत्र्यांना?

ईडीच्या कारवाईचा फटका शिवसेनेच्या मंत्र्यांना बसणार का अशी चर्चा सुरु झालीय. कारण वसई विरार महापालिका आयुक्तांवर झालेल्या ईडी कारवाईवरून संजय राऊतांनी मोठा दावा केलाय...अनिलकुमारांवरील कारवाईचे धागेदोरे मंत्री दादा भुसेंपर्यंत जाऊ शकतात असं संजय राऊतांनी म्हटलंय. अनिलकुमार पवारांची नियुक्ती दादा भुसेंच्या आग्रहाखातर झाली असल्याचा दावाही त्यांनी केलाय

Read More