Breaking News Live Updates : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस असून आजपासून पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात होईल. आज विधानसभेत गृह, कृषी,दुग्धव्यवसाय,उद्योग आणि मराठी भाषा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होणाराय. मराठी भाषा विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी हिंदी सक्तीचे उमटलेले पडसाद,मराठी भाषा भवन इमारतीचे अद्याप सुरू नसलेले काम यावरून विरोधक सरकारला घेरू शकतात.शनिवारी ठाकरे बंधूंच्या यशस्वी मेळाव्यामुळं ठाकरे गटाच्या आमदारांचा उत्साह नक्कीच वाढलेला आहे. जो यावेळच्या चर्चेतून दिसून येईल. तसंच कृत्रिम फुलांमुळे फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याबाबतची लक्षवेधी विधानसभेत मांडली जाणार आहे. परिषदेच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगरमधील vits हॉटेलबाबत विरोधी पक्षाकडून संजय शिरसाट यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तसेच नर्मदा नदीचे पाणी वाटप, कांदळवन जमिनींवरील अतिक्रमण आणि विशेष म्हणजे ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.
उद्या पासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा,उद्या १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे.प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहेेत.
सासवड मध्ये वारकऱ्यांचे प्रचंड हाल. पंढरपूर हून निघालेल्या वारकऱ्याना एसटी बस मध्ये सीएनजी भरण्यासाठी ५ तास थांबावे लागत आहे . एका बस मधे सीएनजी भरण्यासाठी अर्धा तास लागत आहे . १२० बसेस आता सीएनजी साठी थांबल्या आहेत. प्रवाशांमध्ये प्रचंड रोष
भिवंडीतील अनधिकृत गोदाम प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. गोदामांची परवानगी, गोदामांमध्ये अनधिकृतपणे ठेवण्यात येणारे रसायन व इतर अनियमितांवर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अनधिकृत गोदाम प्रश्नावर आमदार निरंजन डावखरेंनी वेधलं मुख्यमंत्र्यांचं लक्ष्य. जिओ स्पेशियल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोदामांवर नियंत्रण ठेवण्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश.
मुरूडच्या कोर्लई समुद्रकिनारी आढळून आलेल्या संशयित बोटीचा उलगडा झाला असून ती बोट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ती संशयास्पद वस्तू म्हणजे मासेमारीसाठी वापरण्यात येणारा बोया असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तटरक्षक दलाच्या शोधमोहीमेत ही बाब स्पष्ट झाली असून रायगड पोलीसांनी याबाबतचा खुलासा केला आहे. मच्छीमार आपली जाळी बुडू नयेत यासाठी हे तरंगते बोया वापरतात. संशयास्पद वस्तू म्हणजे तोच फलोटींग बोया असून पाकिस्तानी मच्छीमारांचा बोया भारतीय समुद्र हद्दीत वाहून आलेला आहे. अशाच प्रकारचा पाकीस्तानी तरंगता बोया जानेवारी महिन्यात गुजरातच्या ओखा किनारी आढळून आला होता. काल रात्री संशयित पाकीस्तानी बोट कोर्लई जवळच्या समुद्रात आली असल्याचा संदेश तटरक्षक दलाने दिला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. आता मात्र ती बोट नसून बोया असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात जनसुरक्षा विधेयक मांडले जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक बैठक पार पडली. विधेयकाचा मसुदा व तरतुदींबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली गेली. मुख्यमंत्र्यांसह समितीचे प्रमुख तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व काही प्रमुख अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
स्वारगेट पोलीस लाईन मध्ये पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल स्वरूप विष्णू जाधव वय 25 वर्ष रा.खो. नं 384, स्वारगेट पोलीस लाईन दुसरा मजला यांनी सदर खोलीमध्ये खिडकीला टॉवेल लावून गळफास घेतलेला आहे. सदर ठिकाणी खडक पोलीस स्टेशन कडे स्टाफ हजर असून तपास चालू आहे. अधिक माहिती घेता तो सध्या मुख्यालय येथे कार्यरत होता. तो 2023 चे बॅच असल्याचे समजत आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वर गावाजवळ असलेल्या निफाड व सिन्नर सह तालुक्यातील गावांना जोडणारा गोदावरी नदी वरील पुलापर्यंत पाणी पोहचले आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून 50 ते 55 हजार क्युसेक परंतु पूर पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्यास पुलावरून पाणी जाईल आणि निफाड-सिन्नर सह तालुक्यातील गावांचा संपर्क तुटेल यामुळे पुलावरून पाणी राहिल्यास वाहनधारकांनी आपली वाणी न येण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
सप्टेंबर अखेर नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार आहे. मंत्उरी दय सामंत यांची विधानसभेत याबाबत मोठी घोषणा केली. मराठी भाषा खरा साक्षीदार मी आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना त्रिभाषा प्रस्ताव २०२२ माशेलकर समिती रिपोर्ट आला. कॅबिनेटने स्वीकारले. त्यात स्पष्ट लिहीले मराठी हिंदी इंग्रजी सक्ती पाहिजे असे त्यावेळेस म्हटल होते असं उद्य सामंत म्हणाले. जे महायुती सीएमवर आता टीका करतायत. २०२२ साली रिपोर्ट स्विकारला,त्यावेळेस सीएम कोण होते ? त्यांनी त्यावेळेस त्रिभाषा मान्य होते मग आता विरोध का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
संघाने मराठी भाषे संदर्भात भूमिका जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
संघाने मराठी भाषे संदर्भात भूमिका जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध! मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत?
प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे संघाचे म्हणणे!
मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत?
असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
तोडो फोटो असंच भाजपचे राजकारण आहे. त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात जे जे करावे लागेल ते आम्ही करु. असे काही तरस प्राण्यासारखे आहेत ज्यांना आमचा आनंद पहावत नाही. आम्ही आनंदात असताना आमच्यात आग लावण्याचे काम ते करत आहेत. मराठीच्या हक्कासाठी आंदोलन करणारे, दहशतवाद्यांशी तुलना करणारे हे मराठीचे मारेकरी आहेत. भाजप वाले या वादाला पहेलगाम मध्ये झालेल्या अतिरेक्यांशी तुलना करत आहे. पहलगामध्ये हल्ला करणारे आतंकवादी गेले कुठे? भाजप मध्ये गेले का? मूळ भाजपा मेलेला आहे. शिवसेने सोबत जी भाजप होती ती मेली आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत विधानभवनात ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक सुरु आहे.
ISS वरून शुभांशू शुक्ला यांनी जणू एखाद्या लहान मुलाप्रमाणं न्याहाळली पृथ्वी.... पाहा PHOTOS https://t.co/FbOdBg87pa
अवकाशातून पृथ्वी नेमकी कशी दिसते याची झलक आजवर अनेकदा पाहायला मिळाली आहे. पण, भारतीय अंतराळवीरानं दाखवलेली पृथ्वीची झलक मात्र खास आहे... #news #Photos #earth— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 7, 2025
वर्ध्यात 12 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने प्रवेश करण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली आहे. ही घटना वर्ध्याच्या लोणसावळी या गावात घडली असून मुलीचे अखेरचे बोलणे तिच्या वडिलांसोबत झालें असून प्रतिक्रिया देतांना वडील अतिशय भावनिक झाले आहे.
पोलीस भरतीत निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू असून, लवकरच त्यापैकी किमान एक हजार उमेदवारांना पुणे पोलिस दलात सहभागी करून घेतले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून सिंहगड रस्ता पोलिस स्टेशन अंकित विठ्ठलवाडी येथील 'आनंदनगर पोलिस चौकी'च्या इमारतीचे लोकार्पण करताना पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, "वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाहनांची संख्या ही वाढत आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलिस यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे."
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या, घरगुती वादातून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, पतीला कळताच पतीनेही घेतला गळफास. कासेगाव येथील आसबे कुटुंबातील मोनाली आसबे यांनी लहान मुले ऐश्वर्या आणि कार्तिक यांना सोबत घेऊन घरगुती वादातून विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. ही बाब पती ममाजी याला कळताच त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी आसबे कुटुंबाचा असा शेवट झाल्याने कासेगावात हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार आहे.
Govt Jobs : ...तरच पगारवाढ होणार; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम https://t.co/agrgqjk4HH
पंतप्रधानांच्या निर्देशानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरीवर परिणाम. कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम लागू. पाहा आता पगारवाढीसाठी काय करावं लागणार... #news #salay #Governmentnews— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 7, 2025
कोर्लई येथील समुद्रात दिसलेल्या बोटीसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून पोलिसांना देण्यात आला होता अलर्ट. अद्याप तरी अशी कुठलीही संशयास्पद बोट आढळलेली नाही, तथापि यंत्रणांकडून बोटीचा शोध सुरू. उच्चपदस्थ सूत्रांची माहिती
मराठी भाषा न बोलणाऱ्या मीरारोड येथील परप्रांतीय दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर राज्यभरात वाद पेटला होता. मनसेच्या (MNS) या कृतीनंतर परराज्यातील अनेक हिंदी भाषिक नेते आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून 'आम्ही मराठी बोलणार नाही, आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा', अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. यामध्ये आता वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांची भर पडली आहे. निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे 'कुत्रा' म्हणून संबोधले आहे.
मुरूड तालुक्यातील कोरलई येथील संशयित बोट प्रकरण समोर आल्यानंतर रायगडची पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागात अधिक सतर्कता बाळगली जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. संशयास्पद वाहनांवर पोलिसांची नजर आहे.
निधीवाटपावरुन महायुतीमध्ये खदखद. अजित पवारांकडून निधी वाटपात भेदाभेद. आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप. अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार- थोरवे
राज्यातील अनेक अंगणवाड्या अजूनही भाड्याच्या जागेत, समाज मंदिरात किंवा असुरक्षित ठिकाणी चालवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकात्मिक बालविकास योजनेत आता ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही, त्या जवळच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करता येणार आहेत. महिला व बालविकास विभागाने या निर्णयाबाबतचा शासननिर्णय जारी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्र्यांसोबत बैठक. भाजपच्या मंत्र्यांची आज रात्री आठ वाजता वर्षावर बैठक. अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना मार्गदर्शन करणार.
Maharashtra Weather News : जे सांगितलं तेच घडलं! पूर्व विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट; 'या' किनारपट्टी भागाला रेड अलर्ट, तापमानात घट https://t.co/75v5cGOoDU
पावसाचा जोर वाढू लागल्यामुळं हवामान विभाग पुन्हा सतर्क. काही भागांमध्ये शाळांना सुट्ट्या तर, काही भागांमध्ये गारठा वाढला...…— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 7, 2025
अहमदपूर तालुक्यातील हाडोळतीतील अंबादास पवारांनी बैल नसल्याने स्वतः खांद्यावर जू घेऊन शेती केली... आणि आता त्याच तालुक्यातील धानोऱ्यातून आणखी एक शेतकरी थेट विधान भवनाच्या दिशेनं पाई चालत निघालाय... फरक इतकाच आहे की या वेळी खांद्यावर जू नाही, तर नांगर आहे... शेतकरी सहदेव होणाळे यांनी कर्जमाफीसाठी खांद्यावर नांगर घेऊन पायी मुंबईकडे कूच केलीय. सरकारकडून आश्वासनांपलीकडे काहीच मिळत नाही, म्हणून हा ''''खांद्यावरचा लढा'''' सुरु असल्याचं ते सांगतायत. दरम्यान, या शेतकऱ्याशी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी थेट फोनवरून संवाद साधला... आणि सुरू असलेल्या अधिवेशनात तुमचा प्रश्न आम्ही मांडणार, असं आश्वासनही दिलं. लातूरच्या मातीतून पुन्हा एकदा शेतकऱ्याचा हंबरडा निघतोय... आता प्रश्न एवढाच आहे कि सरकार केव्हा ऐकणार ?"
Just 10 mins of metro service shut today morning 8:45am has caused this..
Ghatkopar pic.twitter.com/vY9vTEOVy1
— Shubham Shirodkar (@svs_shubham) July 7, 2025
वर्सोवा घाटकोपर मेट्रो ट्रेन सेवा उशिराने. घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी. घाटकोपर मेट्रो स्थानकात अनेक प्रवासी अडकले
समग्र शिक्षण अभियानाचा अर्थसंकल्प ठरवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीतील 'युडायस'च्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल 8 हजार 123 गावांमध्ये शाळांची सुविधा नसल्याचे शिक्षण विभागाने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मान्य केले आहे.
देशात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालली असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात गरीबांची संख्या वाढतेय आणि पैसा व संपत्ती मात्र काही मोजक्या श्रीमंतांच्याच हाती एकवटली आहे, असे जळजळीत वास्तव त्यांनी मांडले. नागपूरमध्ये सीएच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी देशातील गरीब हळूहळू वाढत चालले आहेत आणि देशातील संपत्तीचे श्रीमंतांकडे केंद्रीकरण होत आहे, असे सांगितले. अर्थव्यवस्थेचे असे केंद्रीकरण होणे योग्य नाही, संपत्तीचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी सडेतोड भूमिकाही त्यांनी मांडली.
IND VS ENG : 'तिला कॅन्सर आहे...'; ऐतिहासिक विजयानंतर आकाशदीप भावुक, 'या' व्यक्तीला दिलं श्रेय, Video https://t.co/fzrUsGNESK #Aakshdeep
— ZEE २४ तास (zee24taasnews) July 7, 2025
उद्या आणि परवा राज्यातील कुठल्याही शाळा बंद राहणार नाहीत. शिक्षण विभागाने याबाबत आदेश काढलेत. शिक्षक समन्वय संघाने हा बंद पुकारला होता. विद्यार्थ्यांचे हित पाहता शाळा बंद राहणार नाहीत असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय. माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढलेत.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील घटना. आरोपी सूरज शुक्लाला पोलिसांकडून अटक. हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न.
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात उद्या बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सुनावणी.. वाल्मीक कराडला मकोका मधून दोष मुक्त करण्यासाठी झालेल्या अर्जावर मागील सुनावणीत युक्तिवाद झाला होता. याचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. उद्याच्या सुनावणीत या अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे
नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात शनिवारी राऊस अव्हेन्यू न्यायालयात राहुल गांधींनी युक्तिवाद मांडले. राहुल गांधी यांच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील आर.एस. चीमा म्हणाले की, काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) विकण्याचा प्रयत्न केला नाही तर ही संघटना वाचवू इच्छित होती कारण ती स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग होती. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी करण्याचे आदेश दिले.
अकरावी प्रवेश : 4 लाख 45 हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालये, कॅप फेरीत 3 लाख 71 हजार जणांचे प्रवेश,अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाही; तर दुसऱ्या फेरीचे नियोजन ७ जुलैनंतर होईल. आतापर्यंत 4 लाख 45 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत; तर कॅप फेरी प्रवेश 3 लाख 71 हजार, तर कोट्याअंतर्गत 74432 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभाग संचालक महेश पालकर यांनी शनिवारी दिली.9435 महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी 30 जूनऐवजी 28 जून रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरातील 9435 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.विद्यार्थ्यांना जे महाविद्यालय दिले गेले आहे, तेथे जाऊन त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे.
टीम इंडियाकडून इंग्लंडचा 336 रन्सनं धुव्वा,टीम इंडियाची सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी,कॅप्टन शुभमन गिल विजयाचा शिल्पकार,दुसऱ्या इनिंगमध्ये आकाशदीपला 6 विकेट्स,दोन्ही टीम्समध्ये तिसरी टेस्ट लॉर्ड्सवर रंगणार,इंग्लंडची दुसरी इनिंग 271 रन्सवर संपुष्टात
उद्या पासून 138 किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा,उद्या 138 किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे.प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे, उद्यापासून बच्चू कडू 7/12 कोरा.. कोरा..कोरा.. यात्रा काढणार आहे.. उद्या सकाळी 11 वाजता स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात याचा समारोप होणार आहे... एकूण 7 दिवसाची 138 किलोमीटर पायी पायदळ यात्रा बच्चू कडू काढणार आहे. या सात दिवसाच्या पदयात्रेत बच्चू कडू हे गावागावात सभा घेणार आहे.
शरद पवार, सुषमा अंधारे, नीलेश लंके, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ उद्या रायगडात, सोमवारी सकाळी 10 वाजता शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि या निमित्ताने पीएनपी नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवार , खासदार निलेश लंके, शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे, काँग्रेस जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई मधील तुर्भे सेक्टर 21 मध्ये ट्रक टर्मिनलला आग लागली आहे. या ट्रक टर्मिनलच्या आवारात काही गोदाम होती तेथे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती नवी मुंबई महापालिका आपत्कालीन विभागाने दिली असून या परिसरात एपीएमसी मद्ये येणारे ट्रक पार्क केले जात आहेत, घटनास्थळी तीन अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल असून, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोदामात प्लास्टिक, तसेच कागदी बॉक्सचा मोठा साठा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.