Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE: भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत दोघे सख्ये भाऊ बुडाले

Maharashtra Breaking News Today 20 June LIVE Updates: राज्यातील आणि देशातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्या आणि इतर क्षेत्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या.   

Maharashtra Breaking News LIVE: भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत दोघे सख्ये भाऊ बुडाले
LIVE Blog

Maharashtra Breaking News 20 June LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबद्दल खूप चर्चा सुरु आहे. याशिवाय राज्यात वारीला सुरुवात झाली आहे. त्याचेही अपडेट्स बघुयात. राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या. इराण-इस्रायल संघर्ष सुरूच आहे. त्यासंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या. 

 

20 June 2025
20 June 2025 21:31 PM

वंदे भारत एक्सप्रेस दोन तासापासून खोळंबली 

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्टेशनजवळ ओव्हर हेड केबल तुटल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सुमारे सायंकाळी 7 वाजता ही ओव्हर हेड केबल तुटली आहे. यामुळे या मार्गावरील गुजरात आणि मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या प्रभावीत झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड केबल दुरुस्तीचं कार्य सुरू केलं असल्याची माहिती आहे. वाणगाव रेल्वे स्थानकावर मुंबईकडे येणारी वंदे भारत ट्रेन गेल्या दोन तासापासून उभी आहे. मात्र या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार ओव्हरहेड केबल तुटल्याने जोरदार आवाज झाला यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

20 June 2025 20:34 PM

यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये ठोकलं 5 वं शतक, इंग्लंड विरुद्ध केली दमदार कामगिरी

20 June 2025 20:34 PM

भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत दोघे सख्ये भाऊ बुडाले 

भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत दोघे सख्ये भाऊ बुडाल्याची घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील गोरसई येथील ही घटना असून सागर परशुराम धुमाळ (वय ३०)  आणि अक्षय परशुराम धुमाळ (वय २५) अशी पाण्यात बेपत्ता असलेल्यांची नावे आहेत. घटनास्थळी भिवंडी पालिका आपत्तीव्यवस्थापन आणि  अग्निशामक पथकाकडून दोघांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. नदीवर एक भाऊ पोहायला गेला असताना तो बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे‌ बुडाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

20 June 2025 19:57 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज डिनर डिप्लोमसी

बांद्राच्या ताज लँडस एन्ड मध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे आपल्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. डिनर डिप्लोमसी करत अधिवेशनात नेमके काय मुद्दे उपस्थित करायचे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका, ऑपेरेशन टायगर ज्या पद्धतीने सुरु आहे त्या भुलथापांना बळी न पडता आपलं काम कसं सुरळीत ठेवायचं यावर कानमंत्र दिला जाणार आहे. 

20 June 2025 19:35 PM

पालघर रेल्वे स्थानकांत ओव्हर हेड वायर तुटून रेल्वे सेवा विस्कळीत 

पालघर रेल्वे स्थानकांत ओव्हर हेड वायर तूडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. वांद्रे अजमेर एक्स्प्रेस स्थानकात येत असताना ओव्हर हेड वायर तुडली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाडयांना बसला असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

20 June 2025 19:08 PM

इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर केला मोठा हल्ला

इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात २७१ लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने करण्यात आला. हल्ल्यानंतर रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला.

20 June 2025 18:45 PM

विश्वयुद्ध होण्याच्या धोक्यात समोर आली जगातील टॉप 10 सुरक्षित आणि असुरक्षित देशांची यादी; भारत आणि पाकिस्तान या क्रमांकावर

20 June 2025 18:21 PM

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दाखल!

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दाखल झाली आहे.यंदा ही पालखी तब्बल अडीच  तास उशिराने पुण्यात दाखल झाली आहे. पुणेकरांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. फुलांची उधळण  आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झालं होतं. 

20 June 2025 18:19 PM

विमान अपघातामागे भयानक षढयंत्र? 2020 च्या घटनेशी काय कनेक्शन? खरं ठरलं जगात माजेल गोंधळ!

20 June 2025 18:17 PM

'आता राज ठाकरेंकडे भीक मागतायत; तेव्हा म्हणाले होते...' रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट

20 June 2025 18:15 PM

'उंची पेंग्विनची,आवाज कोंबडीचा...' ठाकरेंच्या टिकेवर राणेंची पहिली प्रतिक्रिया, सर्वच काढलं,'स्वत:चा मुलगा..'

20 June 2025 18:11 PM

जागतिक योग दिवसाच्या जनजागृती निमित्ताने वाशिम शहरात काढण्यात आली रॅली 

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला योगाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने वाशिम शहरात योग रॅलीचे आयोजन करण्यात आले.पतंजली परिवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नारीशक्ती, पाणी फाउंडेशन,तरुण क्रांती मंच, सास संस्था आदींच्या पुढाकारातून ही रॅली पार पडली.

20 June 2025 18:04 PM

एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला पक्षी धडकला; विमानतळावर तात्काळ लँडिंग

20 June 2025 18:02 PM

गायत्री मंत्र किंवा वैदिक मंत्र असलेला कुर्ता घालणं योग्य आहे का? प्रेमानंद महाराज सांगितलं उत्तर

20 June 2025 18:01 PM

देशातील सर्वात मोठा घोटाळा! 2700 कोटींची फसवणूक, दोन भावांनी 70000 लोकांना लावला चुना; गुजरात कनेक्शन उघड

20 June 2025 17:47 PM

जागतिक योग दिवसाच्या जनजागृती निमित्याने वाशिम शहरत काढण्यात आली रॅली 

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला योगाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने वाशिम शहरात योग रॅलीचे आयोजन करण्यात आले.पतंजली परिवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नारीशक्ती, पाणी फाउंडेशन,तरुण क्रांती मंच, सास संस्था आदींच्या पुढाकारातून ही रॅली पार पडली.

20 June 2025 16:35 PM

उजनी धरणातून भीमा नदीत 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडणार

उजनी धरणातून भीमा नदी सायंकाळी 5 वाजता 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडणार आहे. भीमा नदी काठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. 

20 June 2025 15:57 PM

पुढील 24 तासाकरिता पुणे घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24  तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

20 June 2025 15:49 PM

एअर इंडियाच्या विमानाला धडकला पक्षी, दिल्ली-पुणे विमान रद्द 

एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे दिल्ली-पुणे विमान रद्द  करण्यात आलं आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून विमानाची लँडिंग झाल्यावर त्याला पक्षी धडकल्याचे समोर आले. यासंदर्भात सविस्तर तपास होणार आहे. 

20 June 2025 15:45 PM

चंद्रभागेत बुडून एका भाविकाचा मृत्यू  

चंद्रभागेत पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा भाविक बेळगाव मधील असून तो चंद्रभागेत स्नान करत होता. शुभम ज्ञानेश्वर पावले असं २७ वर्षीय तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर चंद्रभागातीरी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असायला हवी अशी मागणी होतं आहे. 

20 June 2025 15:31 PM

मनसे नेत्यांची राजगड पक्ष कार्यालयात बैठकीला सुरूवात 

केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर आता मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक मनसेच्या राजगड पक्ष कार्यालयात बैठकीला सुरूवात झाली आहे. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात विभाग अध्यक्षांची बैठक सुरु हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेच्या आंदोलनाची पुढची दिशा  बैठकीत ठरू शकते.

20 June 2025 15:29 PM

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतली जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुखांची बैठक 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घेतली जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे. राज्यभरात स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. युती आघाडी होईल नाही होईल पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार राहा, उद्धव ठाकरे यांचे बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

20 June 2025 14:51 PM

भारतासाठी दिलासादायक बातमी! HIV पासून बचावासाठी 'गेमचेंजर' ठरणार 'हे' नवे इंजेक्शन; WHO चं मोठं विधान

 

20 June 2025 14:38 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले असून थोड्याच वेळात अंधेरीतील आंतरराष्ट्रीय सहकार वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तर संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार आहेत. 

20 June 2025 14:36 PM

गेल्या चार वर्षात 17 हजार 348 विद्यार्थ्यांनी सोडली जिल्हा परिषदेची शाळा; आठ शाळांना लागलं टाळं

गेल्या चार वर्षांत 17 हजार 348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून त्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेच्या आठ शाळांना टाळं लागलं आहे. गेल्या चार वर्षातील ही धक्कादायक आकडेवारी असून विद्यार्थी पटसंख्या वाढीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न केवळ कागदोपत्रीचं असल्याचे दिसून येत आहे. पटसंख्या घटली म्हणून बुलढाण्यात शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यामुळे आता अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न रबविण्याची मागणी होत आहे. दरम्यान २०२१- २२ शाळांची संख्या होती १५८० तर विद्यार्थ्यांची संख्या १,१६,६६९ वर्ष २०२२- २३ शाळांची संख्या होती १५७६ तर विद्यार्थ्यांची संख्या होती १,१०,०४९ वर्ष २०२३- २४ शाळांची संख्या होती १५७६ तर विद्यार्थ्यांची संख्या होती १०५३८२ वर्ष २०२४- २५ मध्ये शाळांची संख्या होती १५७२ तर विद्यार्थ्यांची संख्या ९९३२२ त्यामुळे गेल्या चार वर्षात १७,३४८ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांना पाठ दाखवली असून आठ शाळा ह्या बंद पडल्याच भयाण वास्तव आहे.

20 June 2025 14:18 PM

50 ते 60 अतिक्रमण केलेले दुकानं जमीनोध्वस्त-छत्रपती संभाजीनगर

अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई करण्यात आली आहे.महापालिकेकडून 10 ते 12 जेसीबी लावून ही कारवाई करण्यात आली आहे.चिकलठाणा, मुकुंदवाडी परीसरात 50 ते 60 दुकानांवर ही कारवाई करण्यात आलीय. कच्च्या आणि पक्क्या बांधकामांवर जेसीबीच्या माध्यमातून ही कारवाई करत अनाधिकृत बांधकामे हटवण्यात आलीय.पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आलीय.ही कारवाई केल्यामुळे जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक आता सुरळीतपणे सुरू राहणार आहे.अतिक्रमण केल्यानंतर या महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होत होती.

20 June 2025 13:58 PM

तेजस्वी घोसाळकरांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती 

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती, त्या जागेवर तेजस्वी घोसाळकर यांना संचालकपद दिले गेले आहे. काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेकडून तेजस्वी घोसाळकरांना संचालक केले आहे.  त्यामुळं  त्या भाजपमध्ये जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून संचालकपद मिळावे म्हणून तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील होत्या. प्रविण दरेकर मुंबै बँकेचे अध्यक्ष आहेत

20 June 2025 13:55 PM

'चाटायला बूट कमी पडत असतील तर...', संजय राऊत एकनाथ शिंदेंवर संतापले, 'फडणवीसांनी तुमचं पायपुसणं करुन...'

20 June 2025 13:54 PM

संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा 'ठाण्याचा अब्दुल्ला' म्हणून उल्लेख, म्हणाले 'गुवाहाटीत कापलेले रेडे...'

20 June 2025 13:53 PM

मुंबईत 18 वर्षाच्या तरुणीसोबत सेक्सटॉर्शन, मोबाईलमध्ये एक मेसेज आला अन् सगळं गंडलं

20 June 2025 13:52 PM

मनसेकडून मुंबईत संघटनेत होणार मोठे फेरबदल 

मनसेकडून मुंबईत संघटनेत होणार मोठे फेरबदल होणार. काम न  करणाऱ्या विभाग अध्यक्षांना तसेच शाखाध्यक्षांना नारळ देण्यात येण्याची शक्यता. २४ जूनला याबाबतीत सविस्तर अहवाल राज ठाकरेंना देण्यात येणार  आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल आणि नवीन नेमणूका जाहीर होतील.

मुंबई महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. काम न करणाऱ्यांना काढून टाका व तात्काळ पर्यायासह २४ जूनला अहवाल सादर करा असा आदेश त्यांनी केंद्रीय समित्यांना दिला आहे. मनसेत अनेक विभागात पर्याय शोधणे सुरू आहे.

20 June 2025 13:46 PM

शिवसेना भवनात बैठकीला सुरुवात

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवन इथं नेते, जिल्हाप्रमुख,संपर्कप्रमुख यांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीला संजय राऊत,अंबादास दानवे,भास्कर जाधवही उपस्थित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन केलं आहे. रात्री आमदार,खासदारांची बैठक आणि स्नेहभोजन बांद्रातील ताज लँड एन्ड हॉटेलला होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांना सूचना केल्या जात आहेत. सचिव अनिल देसाई पक्षाच्या सूचना पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत

20 June 2025 13:13 PM

रायगडमध्ये महायुतीत वाद पेटणार?

रायगडमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगलीय.. आगामी मनपा, झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नको असा सूर शिवसेनेच्या बैठकीत उमटलाय... रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपाने युती करावी मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये अशी भूमिका शिवसेनेच्या बैठकीत मांडण्यात आलीय.. कर्जत इथं रायगड जिल्हा शिवसेनेची आढाव बैठक पार पडली. 

20 June 2025 12:41 PM

स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा झाला तिप्पट 

स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा वाढल्याची माहिती समोर आलीय. हा पैसा तिप्पट वाढून 37 हजार कोटी रुपये झालाय. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक शाखा आणि अन्य वित्तीय संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांत मोठी वाढ झाल्यामुळे हा आकडा वाढला असल्याचे बँकेने म्हटलंय.. 

20 June 2025 12:16 PM

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष विकोपाला

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष विकोपाला गेलाय. इराणकडून इस्रायलवर जोरदार एअर स्ट्राईक करण्यात आलाय.. दक्षिण इस्रायलमधील बीरशेवा शहरावर इराणनं मिसाइल्स डागल्या.. या हल्ल्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागलीये.. 

20 June 2025 12:11 PM
20 June 2025 12:04 PM

'मनसेशी युती केल्यास ठाकरेंच्या थोड्या जागा येतील'- चंद्रकांत पाटील

ठाकरे बंधूंच्या युतीची सध्या जोरदार चर्चा रंगलीय.. कालच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय. यावरुनच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणलाय.. मनसेशी युती केल्यास ठाकरेंच्या थोड्या जागा येतील असा टोला पाटलांनी हाणलाय. तर '2 भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजपची फडफड सुरु आहे असा पलटवार संजय राऊतांनी केलाय..

20 June 2025 11:49 AM

शरद पवारांसोबत एकत्र येणं अजितदादांनी टाळलं, बारामतीतील कार्यक्रमाला अजितदादांची दांडी

-- शरद पवारांसोबत एकत्र येणं अजितदादांनी टाळलं

-- बारामतीतील कार्यक्रमाला अजितदादांची दांडी 
-- अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण 
-- एआय करियर मार्गदर्शन कार्यक्रमाकडे अजित पवारांची पाठ 
-- अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आजच्या शेवटच्या दिवस प्रचारासाठी बारामती परिसरात व्यस्त आहेत....

20 June 2025 11:10 AM

'युतीच्या चर्चेपेक्षा मराठीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे'- मनसे नेते संदीप देशपांडे 

--मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वक्तव्य 
--'हिंदीविरोधात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत' 
--राज्यात हिंदी सक्तीचा प्रयत्न केला जातोय- देशपांडे 
--युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील- संदीप देशपांडे 

20 June 2025 10:38 AM

भटके श्वान आणि मांजरींना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा 

रस्त्यावरील भटक्या श्वान-मांजरींना अन्न देणाऱ्यांना रोखले कर दंड होणार. तसंच श्वानांसंदर्भात कर भरणे बंधनकारक आवश्यक आहे.  पाळीव आणि भटक्या प्राण्यांसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलीयेत. पाळीव प्राण्यांच्या परवानासंदर्भातील नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलंय. भटके श्वान आणि मांजरींना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा असेल.  तसेच, पाळीव श्वानासंदर्भात निश्चित करण्यात आलेले कर महानगरपालिकेकडे भरणे आणि पाळीव प्राण्यांच्या परवानासंदर्भातील नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.  सध्या अनेक नागरिक पाळीव श्वानांना सहचर म्हणून ठेवतात. तसेच, प्राणिमित्र/कार्यकर्ते भटक्या श्वानांची देखभाल, उपचार आणि अन्न पुरवठा करून संवेदना व्यक्त करतात. मात्र, अनेकवेळा पाळीव प्राणी मालक, भटक्या प्राण्यांचे काळजीवाहक, निवासी कल्याण संस्था व गृहनिर्माण संस्था यांच्यात मतभेद आणि संघर्ष निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

20 June 2025 10:33 AM

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मध्यरात्री 2 वाजता सुरु, शरद पवार म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीला...'

20 June 2025 10:32 AM

Sharad Pawar on Hindi:  'हिंदीचा द्वेष करणं हिताचं नाही'; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, 'पालकांनी मुलांना...'

20 June 2025 10:29 AM

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती समजून चक्क 'या' व्यक्तीशी केलं हस्तांदोलन; G7 परिषदेत पडले तोंडघशी

20 June 2025 10:16 AM

माझा भाजप पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हाचा संपला आहे- एकनाथराव खडसे 

देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावरती या दौऱ्याप्रसंगी खडसे यांची भेट होण्याची शक्यता राजकीय चर्चा. खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती आज काही विषय होतो का ? यावर खुद स्पष्टीकरण एकनाथराव खडसे यांनी दिला आहे.  "माझा भाजप पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हाचा संपला आहे. मी त्याला पूर्णविराम दिला आहे.  मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे." 

20 June 2025 09:50 AM

समृद्धी महामार्गावर पहाटे अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर कोळकेवाडी आणि आमने टोलनाका दरम्यान पहाटे ५ वाजता चॅनल क्रमांक ६९० येथे क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये या दोन गडयानचहा भीषण अपघात. अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर ७ जन गंभीर जखमी.या अपघातात अब्दुल पाशा शेख ६५, जाहीद सिद्दिकी ४० यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी आहेत त्यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. परभणी जिल्ह्यातून भिवंडी येथे आपल्या नातेवाईकांकडे येत असताना क्रुझर जीप चालकाचा चॅनल नंबर ६९० येथे पावसामुळे आणि झोपेच्या डुलकीने समोरिल वाहनास भरधाव वेगाने मागून जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तात्काळ जखमींना भिवंडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात मृतांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

20 June 2025 09:48 AM

Tendulkar-Anderson Trophyचे झाले अनावरण! 17 वर्षांनंतर ‘पतौडी ट्रॉफी’चं नाव का बदललं? जाणून घ्या कारण

 

20 June 2025 09:29 AM

लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदे म्हणतात... 

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत, आदिवासी विभागाचा पैसा वळवला, आरोप उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केलाय. याला एकनाथ शिंदेंनी शिवसेना मेळाव्यातून प्रत्युत्तर दिलंय. कुणी काहीही बोललं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

20 June 2025 09:27 AM

हिंदीबाबत पालकांनी निर्णय घ्यावा- शरद पवार

"हिदीची सक्ती नको. हिंदी भाषेचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. विद्यार्थ्यांनी यासंबंधी निर्णय घ्यावा. पालक मार्गदर्शन करतील त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात. कोणी येत असेल, शिकायचं असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. ही गोष्ट दुर्लक्ष करुन चालणार नाही," असं शरद पवारांनी सांगितलं आहे.  

20 June 2025 09:01 AM

आज रंगणार IND vs ENG 1st Test ! टीव्हीवर आणि ऑनलाइन कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना? जाणून घ्या

 

20 June 2025 09:00 AM

माऊलींच्या पालखीचं अलंकापुरीतून पंढरपूरकडे प्रस्थान

माऊलींच्या पालखीचं अलंकापुरीतून पंढरपूरकडे प्रस्थान...दोन्ही पालख्या आज पुण्यात येणार... पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल 

20 June 2025 08:59 AM

शिवसेना UBTच्या खासदार, आमदारांची आज बैठक

शिवसेना UBTच्या खासदार, आमदारांची आज बैठक....शिवसेनाभवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक....रात्री ताज लँडमध्ये आमदार आणि खासदारांची बैठक

20 June 2025 08:33 AM

'उंची पेंग्विनची, चाल बदकाची...' उद्धव ठाकरेंची राणेंवर जहरी टीका

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यातून नितेश राणेंवर जोरदार टीका केलीय.. उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा असल्याचा घणाघात ठाकरेंनी नितेश राणेंवर केलाय.. नितेश राणेंनी केलेल्या टिकेला ठाकरेंनी त्याच भाषेत उत्तर दिलंय..

20 June 2025 07:55 AM

भारतात ब्लॅकबॉक्समधील डेटा रिकव्हर होईना, तपासणीसाठी अमेरिकेत पाठवला जाणार

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवला जाणार आहे. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी बोइंग 787-8 ड्रीमलाईनर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता. विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की, त्यातून डेटा रिकव्हर करणे कठीण झालंय. त्यामुळे तो अमेरिकेत तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अर्थात CVR आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर अर्थात FDR या ब्लॅक बॉक्सचे दोन भाग उष्णता आणि आगीमुळे खराब झालेत. देशात अशी कोणतीही लॅब नाही जिथे डेटा रिकव्हर करता येईल. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. 

20 June 2025 07:33 AM

पुण्यातील  खडकवासला धरणातून विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली 

पुण्यातला पाऊस थांबला असला तरी खडकवासला धरणातून 15 हजार क्युसेकचा विसर्ग सुरूय मुठा नदीला पूर, भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. 

> खडकवासला धरणातून 15 हजार क्यूसेकनं विसर्ग

> विसर्ग वाढवल्यानं मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ

> खडकवासला धरणातून विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली 

> नदीकाठच्या गावांना आणि घरांना सतर्कतेचा इशारा

20 June 2025 07:31 AM

Vivek Lagoo Passed away: दिग्गज अभिनेते विवेक लागू यांचे निधन; वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

20 June 2025 07:27 AM

गुरुवारी दिवसभरात 36 पेक्षा जास्त लोकल रद्द 

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर गुरुवारी दिवसभरात ३६ पेक्षा जास्त लोकल रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पश्चिम रेल्वेवर पॉइंट फेलुअर, तर मध्य रेल्वेवर पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

20 June 2025 07:25 AM

एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली

ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवलीये. तिकीट भाडेवाढ, वेळेवर सेवा नसल्यानं एसटीला याचा फटका बसलाय. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात सरासरी 20 लाखांची घट झालीये. यंदा एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत घट झालीय.

20 June 2025 07:24 AM

कोकण रेल्वेकडून 23 जूनपासून गणपती स्पेशल आरक्षणाला सुरूवात 

कोकणातील चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून 23 जूनपासून गणपती स्पेशल आरक्षणाला सुरूवात होतेय. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह गणपती उत्सव तिकिट आरक्षण सुरू करत आहे. तर कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकात बदल करुन आता गणपती स्पेशल आरक्षण सुरु करत आहे.

20 June 2025 07:15 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज मुंबई दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज मुंबई दौरा असणारेय ... सहकार विभागांशी संबंधित कार्यक्रमांसाठी अमित शाह यांचा आज एक दिवसीय मुंबई दौरा राहणारेय...

20 June 2025 07:14 AM

ईडीकडून अभिनेता दिनो मोरियाची तीन तास चौकशी

ईडीकडून अभिनेता दिनो मोरियाची तीन तास चौकशी झाली. मिठी नदी गाळ उपसा कंत्राटातील 65 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो याची चौकशी केली जातेय.  या प्रकरणात ईडीने दोघांची दुसऱ्यांदा चौकशी केली.

20 June 2025 07:13 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणारेय. त्यांच्या दौ-याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आहे. 

Read More