Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Breaking News Today: Live Updates: झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणारा संशयित ताब्यात

Maharashtra Breaking News Today 26 June 2025: दिवसभरात घडणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाची शहरं आणि गावातील ताज्या बातम्या, राजकीय बातम्या, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या. 

Breaking News Today: Live Updates: झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणारा संशयित ताब्यात
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today 26 June LIVE Updates: दिवसभरात घडणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाची शहरं आणि गावातील ताज्या बातम्या, राजकीय बातम्या, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या. 

26 June 2025
26 June 2025 21:43 PM

झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणारा संशयित ताब्यात 

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात आलाय.सिद्दिकी यांचा पाठलाग करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला वांद्रे निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. संशयित व्यक्तीची पोलिसांकडून चौकशीस सुरू आहे. हा संशयित आज सकाळपासून झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करत होता.

26 June 2025 21:04 PM

अकरावी ऑनलाइनची पहिली यादी आता थेट सोमवारी होणार प्रसिद्ध 

अकरावी ऑनलाइन ची पहिली यादी आता थेट सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. नियोजित वेळापञकानुसार आज पहिली यादी प्रसिद्ध होणार होती. किमान कला शाखेची तरी पहिली यादी आज राञी उशिरापर्यंत प्रसिद्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरूंय पण ऑनलाईन सॉफ्टवेयर मधील तांञिक अडचणींमुळे कॉलेजेसची कट ऑफ लिस्ट दिसत नाहीये.

26 June 2025 19:06 PM

अजित पवार यांच्या ऑडिटच्या मागणीमुळे एकनाथ शिंदे अडचणीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) आर्थिक व्यवस्थापनाचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे. कर्जामुळे राज्यावर आर्थिक भार पडेल, महाराष्ट्राच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल, असे मंत्रिमंडळाच्या नोटमध्ये मंजुरीपूर्वी नमूद करण्यात आले आहे.  मंगळवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 802 किमी नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्गासाठी जमीन अधिग्रहणासाठी 20,787 कोटींच्या कर्ज हमीला मंजुरी दिली, यामध्ये 12,000 कोटी मुख्य रक्कम आणि 8,787 कोटी व्याज आहे.

26 June 2025 19:05 PM

अजित पवार यांच्या ऑडिटच्या मागणीमुळे एकनाथ शिंदे अडचणीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) आर्थिक व्यवस्थापनाचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे. कर्जामुळे राज्यावर आर्थिक भार पडेल, महाराष्ट्राच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल, असे मंत्रिमंडळाच्या नोटमध्ये मंजुरीपूर्वी नमूद करण्यात आले आहे.  मंगळवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 802 किमी नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्गासाठी जमीन अधिग्रहणासाठी 20,787 कोटींच्या कर्ज हमीला मंजुरी दिली, यामध्ये 12,000 कोटी मुख्य रक्कम आणि 8,787 कोटी व्याज आहे.

26 June 2025 18:01 PM

पक्षीय भेदाभेद विसरून मराठी भाषेच्या लढ्यात सामील व्हा- उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात आवाहन केलंय.  तमाम मराठी माणसांना मी आवाहन करतो; पक्षीय भेदाभेद विसरून, मराठी भाषेच्या लढ्यात सामील व्हा!, असे ते म्हणाले.

26 June 2025 17:29 PM

एकच मोर्चा असावा, मनसेची भूमिका 

एकच मोर्चा असावा ही मनसेची भूमिका आहे. सर्वपक्षीयांनी मोर्चात सहभागी व्हावं असा आग्रह मनसेकडून करण्यात आलाय. 

26 June 2025 17:25 PM

एकच मोर्चा असावा, मनसेची भूमिका 

एकच मोर्चा असावा ही मनसेची भूमिका आहे. सर्वपक्षीयांनी मोर्चात सहभागी व्हावं असा आग्रह मनसेकडून करण्यात आलाय.

26 June 2025 17:21 PM

मनसेकडून मोर्चात सहभागी होण्यासाठी संजय राऊतांना निमंत्रण

मनसेकडून मोर्चात सहभागी होण्यासाठी संजय राऊतांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज ठाकरेंचा मोर्चा 6 जुलै रोजी 5 जुलैला होणार आहे.

26 June 2025 17:16 PM

राज ठाकरेंच्या मोर्च्याची तारीख बदलली

राज ठाकरे हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्याची तारीख बदलली आहे. 6 जुलै रोजी हा मोर्चा होणार होता. ती तारीख आता 5 जुलै रोजी होणार आहे. 

26 June 2025 16:51 PM

शिक्षक भरती प्रक्रिया;उपलब्धतेच्या आधारावर प्राधान्यक्रमावर शिफारस

शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीसह पदभरतीसाठीची उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली. ‘मुलाखतीसह’ शिक्षक पदभरतीमध्ये ८५५६ रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. १८६१ व्यवस्थापनातील ८५५६ रिक्त पदांपैकी ८२६४ पदांसाठी १२९६६ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या आधारावर प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली आहे.

26 June 2025 16:20 PM

तिसरी भाषा निवडतील त्यासाठी 5 तासिका निश्चित- दादा भुसे  

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील काही गोष्टी राज्यावर सोडल्या आहेत. त्यांनी बंधनकारक काही केले नाही. 2 ते 8 या वयात मुलं भाषा लवकर शिकतात,असं तज्ञांचे मत आहे. साप्ताहिकमध्ये 10 तासिका मातृभाषेसाठी सुचवल्या आहेत. पण आपण 15 तासिका घेण्याचा निर्णय घेतलाय, असे दादा भुसे म्हणाले.  विद्यार्थी पालक जे तिसरी भाषा निवडतील, त्यासाठी 5 तासिका निश्चित केल्या आहेत. तिस-या भाषेसाठी 1 व 2 वर्गासाठी मौखिक शिक्षण देतील. पुस्तके केवळ शिक्षकांसाठी असतील. तिसरीपासून पुढे लिखाण,अध्ययन होईल.म्हणजे तिसरीपासून तिसरी भाषेचा अभ्यास सुरू होईल. 20 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर शिक्षक उपलब्ध करून देणार व कमी संख्या असेल तर ई शिक्षण दिले जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

26 June 2025 15:35 PM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली. रविवारी ठाण्यातील टिप टॉप हॉटेल येथे दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री,आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवली होती बैठक, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अँक्शन मोडवर आहेत. 

26 June 2025 15:33 PM

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या क्रॅश विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा सापडला, शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? आता समोर येणार सत्य!

Air India च्या क्रॅश झालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा जाणून घेण्यासाठी तो परदेशात पाठवण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र आता यामधील सर्व डेटा सुरक्षित असून तो इथेच कलेक्ट झाला आहे. यामध्ये अपघाताचं खरं कारण आणि शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? याचा खुलासा झाला आहे.

26 June 2025 15:32 PM

अजब प्रकार! भूतबाधा झाल्याचे सांगून मोलकरणीच्या अडीच वर्षाच्या मुलाला दिले चटके अन् मारहाण

Mumbai Crime : मुंबईतील भांडूपमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अडीच वर्षांच्या चिमुकल्यासोबत अघोरी प्रकार घडल्याच समोर आलं आहे.

26 June 2025 14:26 PM

विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर करण्यात यश

विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर करण्यात यश आले आहे. 25 जून रोजी मेमरी मॉड्यूल यशस्वीरित्या अॅक्सेस करण्यात आला असून ब्लॅक बॉक्सचा डेटा AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला. सीव्हीआर आणि एफडीआर डेटाचे विश्लेषण सध्या सुरू आहे. विमान अपघातास कारणीभूत असलेल्या घटनांचा क्रम पुनर्रचना करणे आणि विमान वाहतूक सुरक्षितता वाढविण्यासाठी याचा फायदा होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याची माहिती दिली.

26 June 2025 13:46 PM

हिंदीची सक्ती होऊ देणार नाही म्हणजे नाही- राज ठाकरे 

" दादा भुसेंची भूमीका मी फेटाळून लावलीय.  दादा भुसेंनी हे मान्य केलंय की राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा विषय नाही; तरी राज्याचा तिसऱ्या भाषेसाठी आग्रह आहे. काही गोष्टींची उत्तरं दादा भुसेंकडे नव्हती.  येत्या 6 जूलैला गिरगांव चौपाटीवरुन आम्ही मोर्चा काढायचा ठरवला आहे. कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा नाही. या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल. सर्व साहित्यिक; मराठी प्रेमी; सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावं. 6 जूलैच्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल." असं राज ठाकरे म्हणाले. 

26 June 2025 13:42 PM

शक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज ऑनलाईन राज्यव्यापी बैठक

नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवारी 26/06/25 रोजी सायंकाळी 05 वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असून आहेत. या ऑनलाईन बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी, उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर आदी सहभागी होणार आहेत.

26 June 2025 11:59 AM

वाढवण बंदर ड्रोन सर्व्हेचा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता, पोलीस प्रशासन-स्थानिकांमध्ये झटापट

वाढवण बंदर हायटाईड साठी सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेचा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज ड्रोन सर्व्हे पूर्ण करून माघारी परतणाऱ्या पोलीस प्रशासनासह सर्व्हेयरना स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला . त्यामुळे पोलीस प्रशासन आणि स्थानिक यांच्यात काही काळ झटापट झाली असून या ठिकाणी तणावाच वातावरण निर्माण झालं होतं . सर्व्हे ठिकाणी जाण्यासाठी स्थानिकांना रोखणाऱ्या पोलीस प्रशासनाला देखील स्थानिकांनी माघारी परतताना मज्जाव केला असून यावेळी पालघरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही प्रमाणात हा वाद क्षमला असला तरी येत्या काळात पुन्हा एकदा वाढवण बंदर उभारणीचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

26 June 2025 11:37 AM

पुरामुळे वर्धा-राळेगाव महामार्ग बंद, पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

वर्ध्याच्या सरूळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली... पुरामुळे वर्धा राळेगाव महामार्ग गेल्या एक तासापासून वाहतुकीस बंद करण्यात आलं आहे....पहिल्याच पावसानं दाणादाण उडल्याचं दिसून येतंय...

26 June 2025 11:11 AM

अजित पवारांची पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर कुरघोडी

शक्तिपीठ मार्ग उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील सुरू असलेले प्रकल्प आणि त्याची आर्थिक देणी लक्षात घेता महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनाची पडताळणी करण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाने केली आहे. यावरून उपमुख्यमंत्री आणि  राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याचे मानले जाते. शक्तिपीठ मार्गासाठी 'हुडको' कडून घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे प्रमाण दोन टक्के अधिक असल्याने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असा अभिप्राय वित्त विभागाने देऊनही महागड्या कर्जाचा मार्ग सरकारने  स्वीकारलाय.. महामंडळाने हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे देणी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांचा अजित पवारांवर आक्षेप असतो. त्यातच अजितदादांच्या खात्याने थेट शिंदे यांच्या खात्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची भूमिका मांडून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्याचे मानले जाते. 

26 June 2025 11:02 AM

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात ते  शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल होणार आहेत.. हिंदी सक्तीबाबत दादा भुसे राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावेळी  दादा भुसेंसह शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी राज ठाकरेंना हिंदी भाषा सक्तीबाबत माहिती देणार आहेत. तसंच यावेळी राज ठाकरेंसोबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असतील अशी माहिती मिळतेय... त्यामुळे या बैठकीत राज ठाकरेंची समजूत काढण्यात शिक्षणमंत्र्यांना यश येणार का हे पाहावं लागेल.. 

26 June 2025 10:51 AM

पोलिसांनी खड्डा खोदून सूनेचा मृतदेह बाहेर काढला, शवविच्छेदनातून धक्कादायक खुलासा, सासऱ्याने झोपेच्या गोळ्या देत...; सासूलाही अटक

26 June 2025 10:48 AM

मेक्सिकोमध्ये धार्मिक कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, रस्त्यावर नाचणाऱ्या, मद्यपान कऱणाऱ्यांना घातल्या गोळ्या; 12 जण जागीच ठार

26 June 2025 10:47 AM

'तुम्ही पाप करत आहात, बळीराजाची कबर....', ठाकरेंच्या शिवसेनेने CM फडणवीसांना सुनावलं, 'महाराष्ट्राची आराध्य दैवतं...'

26 June 2025 10:28 AM

उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, अलकनंदा नदीत कोसळला यात्रेकरूंचा टेम्पो, 2 जणांचा मृत्यू

 
26 June 2025 10:17 AM

भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी मतदारांचा बाप काढलाय

भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी मतदारांचा बाप काढलाय... जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मग्रुरी पाहायला मिळाली... तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ताफळं लोणीकरांनी उधळलीत.. आमचंच घेऊन आमच्याविरोधात का बोलता असंही लोणीकर बरळलेत.... त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना कसली मग्रुरी आहे असा सवाल उपस्थित होतोय... 
 

26 June 2025 09:57 AM

सूर्यकुमार यादवचा हॉस्पिटलमधील फोटो Viral... अचानक काय झालं? चाहत्यांना दिली महत्त्वाची अपडेट

 

26 June 2025 09:47 AM

आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने केली आत्महत्या

हिंगोलीच्या पिंपळदरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये...स्वाती सुखदेव झाटे असं आत्महत्या करणा-या विद्यार्थीचे नाव आहे... स्वाती ही दहावीच्या वर्गात होती..स्वातीने शाळेतील खोलीमध्ये सिलिंग फॅनला ओढणी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केलीये...आत्महत्येचा कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरुये....

26 June 2025 09:46 AM

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सातही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालीय. काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झालीय. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यताय. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

26 June 2025 09:18 AM

3442 कोटी रुपयांच्या लीगच्या विरोधात BCCI राहिली उभी! सौदी अरेबियाच्या विरुद्ध 'या' देशाशी मिळवला हात

 

26 June 2025 09:08 AM

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, अलकनंदा नदीमध्ये बस कोसळली

एक ब्रेकिंग न्यूज उत्तराखंडमधून.. उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झालाय... प्रवाशांनी भरलेली एक बस अलकनंदा नदीमध्ये कोसळलीये.. या बसमध्ये 18 प्रवासी असल्याची माहिती आहे... मुसळधार  पावसामुळे अलकनंदा नदी दुथडी भरुन वाहतीये.. या नदीत ही बस  कोसळलीये.. बसमधील 5 प्रवासी बाहेर फेकल्याचंही कळतंय. दरम्यान पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्याला वेग आलाय. 

26 June 2025 08:41 AM

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झालंय... पाईपलाईनचा टेलपीस दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे...टेलपीस दुरुस्त करण्याचे काम हाती घेतल्याने उजनी आणि पाकणीचे पंप  बंद राहणार आहे...त्यामुळे उद्याचा पाणीपुरवठा उशिराने सुरु होणार आहे...सोलापूरकरांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत...

26 June 2025 08:25 AM

 राज्यातील वीजग्राहकांना मोठा दिलासा, वीजदर कमी होणार

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील पाच वर्षात 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महावितरणच्या याचिकेवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं निकाल दिलाय.. त्यानुसार पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्यानं 26 टक्के वीजदर कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये.. पहिल्या वर्षी 10 टक्के वीजदर कमी होणार असल्यानं राज्यातील वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे...

26 June 2025 08:24 AM

मुंबईतील कर्नाक पुलाचं काम पूर्ण.... 

मुंबईतील कर्नाक पुलाचं काम पूर्ण.... येत्या दोन-तीन दिवसांत पूल वाहतुकीस खुला होणार...

26 June 2025 07:28 AM

वाल्हेकरांचा पाहुणचार घेऊन माऊलींची पालखी लोणंदकडे मार्गस्थ 

वाल्हेकरांचा पाहुणचार घेऊन माऊलींची पालखी लोणंदकडे मार्गस्थ झालीये.. या प्रवासात एक खास आणि पवित्र क्षण येतो .. निरा नदीत माऊलींच्या पादुकांचं ‘निरास्नान’ केलं जातं. हा क्षण अत्यंत श्रद्धेचा मानला जातो. हजारो भाविक निरा तीरावर जमून या दैवी प्रसंगाला साक्षीदार होतात... माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम हा लोणंदमध्ये असणार आहे.. तर जगतगुरु संत तुकोबा महाराजांची पालखी उंडवडीकरांचा निरोप घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झालीये.. आज तुकोबांची पालखी बारामती तालुक्यात दाखल होणार आहे.. यावेळी दोन्ही बाजूंनी टाळ-मृदुंगाचा गजर, भजन-कीर्तन आणि फुलांच्या पायघड्या पाहायला मिळतील. दोन्ही पालख्यांनी या आठ दिवसात १०० किलोमीटरहून अधिक पायी प्रवास पूर्ण केला आहे. 

26 June 2025 06:57 AM

पासपोर्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन, हजारो नागरिकांची तब्बल ५ तास प्रतीक्षा

पुणे: मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयात वेळेवर पोहोचलेल्या नागरिकांना ना नंबर, ना प्रक्रिया फक्त वाट पाहत बसावे लागल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाता सामोरे जावे लागते. याचे कारण होते सर्व्हर डाऊन होऊन संपूर्ण यंत्रणा ठप्प होणे. 

26 June 2025 06:52 AM

पाऊस 'या' जिल्ह्यांत असा धुमाकूळ घालणार

 गेले काही दिवस राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील चार ते पाच दिवस अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

26 June 2025 06:46 AM

युद्धविराम होताच इराणकडून भारताचं तोंडभरून कौतुक, मानले जाहीर आभार

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये इराणसोबतच इस्रायलचं देखील मोठे नुकसान झालं आहे. युद्ध सुरू असतानाच अमेरिकेनं इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला केला. त्यानंतर अखेर आता इराण आणि इसापलमध्ये युद्धविराम झाता आहे.
पुद्धविराम झाल्यानंतर इराणने भारताचे आभार मानले आहेत. इस्रायलसीबत झालेल्या युद्धादरम्यान भारताकडून मिळालेल्या समर्थनासाठी इराणने भारताचे आभार मानले आहेत. नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये इराणने भारताचे आभार मानले आहेत. सोबतच या पोस्टमध्ये इराण आणि भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील भागीदारीचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

26 June 2025 22:19 PM

दादा भुसे राज ठाकरे यांची भेट घेणार 

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुनमंत्री दादा भुसे स्वतः राज ठाकरेंची हिंदी भाषेवर समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ही भेट होईल. शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी व स्वतः मंत्री दादा भुसे हिंदी भाषेतल्या सक्तीवर माहिती देणार आहेत. हिंदी भाषेचा शासन निर्णय तसेच राज ठाकरे आपल्या काही तज्ञ मंडळींसोबत बैठकीला बसणार आहेत.

26 June 2025 22:17 PM

आदिवासी समाजास वाढीव आरक्षण देण्याबाबत बैठक

राज्यातील पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांत ही संख्या अधिक आहे. याठिकाणी नोकरीमध्ये आरक्षण वाढवून देण्याची आवश्यकता असून, यासाठी इतर मागासवर्ग, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या वर्गातील आरक्षण काही प्रमाणात कमी करुन ते आदिवासी समाजास देण्याचा प्रस्ताव आहे. यावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

26 June 2025 22:16 PM

हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात बैठक बोलावली आहे. तिसरी भाषा सक्ती विरोधी  समन्वय समितीला बैठकीसाठी बोलावले. गुरुवारी  दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे.

26 June 2025 22:15 PM

इराणी बेक-यांना पर्यावरणपूरक इंधनाचाच वापर करावा लागणार

ज्या बेकऱ्या कोळसा आणि, डिझेल, लाकडाचा वापर करून चालवण्यात येत आहेत त्या लवकरात लवकर पर्यावरण पूरक इंधनाचा वापर करून चालवल्या जातील यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन एक कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा तशी एक योजना तयार करावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज महापालिकेला दिले.

26 June 2025 22:14 PM

मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढला 

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि दहिसर- गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून या दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने  विक्रम केला. या मार्गिकेवरून २४ जून रोजी - तब्बल २ लाख ९७ हजार ६०० प्रवाशांनी प्रवास केला. या दोन्ही मार्गिकांवरील आतापर्यंतची ही सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. सुरुवातीला असलेली प्रतिदिन ३० हजार प्रवासी संख्या आता थेट २ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. दिवसाला सरासरी इतके प्रवासी प्रवास करतात. तर वर्षभरात दैनंदिन प्रवासी संख्येने २ लाख ६० हजारांची संख्या पार करत विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या नोंदवली आहे.

Read More