Breaking News LIVE: आज दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींही काश्मीरमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. श्रीनगरमधील दल सरोवरच्या किनारी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होत असून, मोदींसोबत जवळपास 7 हजार लोक योगा करताना दिसतील. यंदा स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी योग दिनाची थीम आहे. या थीमचा अर्थ योगाद्वारे आपण आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो आणि त्यातून समाजाचे कल्याणही शक्य आहे.
योददिनाशिवाय महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकीय क्षेत्रासह इतर अनेक विभागांमध्ये विविध घडामोडी घडत असून त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम नागरिकांवर होत असतात. पाहूया अशाच काही घडामोडी.... LIVE
ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक सुरू, पंकजा मुंडे, छगन भुजबळही बैठकीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिष्टमंडळाशी चर्चा करणार, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय बनसोडे, आमदार गोपीचंद पडळकरही बैठकीला उपस्थित
यवतमाळमध्ये काँग्रेसने राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात चिखलफेक आंदोलन केले. संविधान चौकात केलेल्या या आंदोलनात महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. भाजप नेतृत्वातील सरकार शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, युवक तसेच गरीब व सामान्य जनतेच्या विरोधात आहे, महागाई, भ्रष्टाचार व सरकारी यंत्रणांचा अवैध वापर केल्या जात असल्याची टीका यावेळी काँग्रेसने केली.
रायगडात पावसाळी पर्यटनाचे 4 बळी, मुंबईतील येथील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू, पावसाळी सहलीतील दुर्घटना, खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी येथील घटना, सत्य साई बाबा धरणात चार युवक बुडाले, एकूण 37 युवक युवती गेलेले पावसाळी सहलीला,
मंडल आयोग सहजासहजी आलेला नाही, अनेक लोकांच्या रेट्यामुळे मंडल आयोग लागू झाला, जरांगे सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जा. जरांगे यांनी लोकशाहीत धमक्या देऊ नये, मंडल आयोग चॅलेंज होणं सोपं वाटत का? देशाचा पंतप्रधान ठिकाण्यावर राहणार नाही. जरांगे लोकसभेत तुम्हाला मुसलमान चालले नाहीत, दलित चालले नाहीत. शेतकऱ्यांच्या चळवळी वेगवेगळ्या जातींच्या लोकांनी लढल्या, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सक्षम, जरांगेंची बोलायची लायकी नाही. मुंडे, भुजबळांना टार्गेट करु नका, खाडाखोड करुन जरांगेंनी नोंदी मिळवल्या, लक्ष्मण हाकेंचा आरोप
मनोज जरांगे पुन्हा हॉस्पिटल दाखल, तब्येत अस्वस्थ वाटत असल्याने संभाजी नगरच्या रुग्णालयात दाखल, अंतरवली दौरा टाळून परत संभाजी नगरात
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे, पंकजा मुंडे यांचे ट्वीट
सोलापूर : बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाका कारखान्याला लागली आग, कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूतील परिसराला बसला हादरा, युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा आहे फटाका कारखाना, या कारखान्यात जवळपास 15 महिला मंजूर काम करतात. सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला गेली नव्हती कामाला, या स्फोटात कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाही. पण कारखाना मालकाला बसला मोठा आर्थिक फटका, घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील कारवाई करत आहेत.
बीड जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आंदोलक महिला आक्रमक, बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथे रस्त्यावर उतरत महिलांनी टायर जाळले आहेत. बीड - अहमदनगर - कल्याण महामार्ग ओबीसी आंदोलक महिलांनी टायर जाळून अडवला. तर सरकारने आमच्या भावनांचा विचार केला नाही, तर दुर्गेचे आवतार धारण करू असा इशारा आंदोलक महिलांनी दिला. तर यावेळी पंकजा मुंडे यांनी सरकारला जे लेखी पत्र दिले आहे, त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे
सांगोला मिरज महामार्ग ओबीसी आंदोलकांनी रोखला, अनकढाळ टोल नाक्याजवळ ओबीसी बांधवांनी अडवला रस्ता, लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी आंदोलनात रस्त्यावर
सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभा केले आहे, या माध्यमातून त्यांना दंगली घडवायचे आहेत. परंतु सरकारचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. गाव गाड्यातील एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देणार नाही, प्रसंगी एक पाऊल मी मागे घेईन परंतु सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जर सरकारने आम्हाला दिलेले 13 तारखेची आश्वासन पाळले नाही, तर आम्ही सरकार डुबवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून जवळपास दीडशे ते दोनशे गाड्यांचा ताफा रवाना झाला आहे. लोहा आणि कंधार तालुक्यातून ह्या गाड्या वडी गोद्री कडे रवाना झाल्या आहेत. हाके यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद वाढत आहे. लोहा कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. लोहा कंधार सकल ओबीसी समाजातर्फे ह्या गाड्या निघाल्या आहेत. वडीगोद्री येथील आंदोलनात हे ओबीसी बांधव सामील होणार आहेत.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, किरकिटवाडीमध्ये टोळक्यांचा धुडगूस, 20 ते 25 गुंडांचा तरुणावर हल्ला, तरुण गंभीर जखमी, हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या नियामक मंडळाची नववी सभा बैठक पुण्यातील साखर संकुल इथे सुरू झाला आहे. मात्र इथं अजित पवार यांनी मात्र या बैठकीला दांडी मारली आहे. मागील बैठकीलाही त्यांची अनुपस्थिती लक्ष वेधून गेली होती. दरम्यान या सदस्य बैठकीसाठी शरद पवार, दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, जयंत पाटील असे 8 सदस्य उपस्थित आहेत.
कुणीही रास्ता रोको किंवा आंदोलनाला गालबोट लावू नका असं आवाहन कार्यकर्त्यांना हाकेंनी केलं असून, मी पाण्यावरच जगणार, मी पाणी अधून मधून पीत आहे असं सांगितलं. दरम्यान, उपोषणस्थळी असणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्याशी मुख्यमंत्री दूरध्वनीवरून संपर्क साधत असून, तिथं गिरीश महाजनही उपस्थित आहेत.
कोकणात झालेल्या आतापर्यंतच्या पावसामुळं अनेक जलस्त्रोत प्रवाहित झाले असून, रत्नागिरी - खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. खेड परिसरात जोरदार पाऊस झाल्यामउळं नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या जगबुडी नदिची पाणीपातळी 5.25 मीटर इतकी असून, खेड आणि चिपळूण परिसरात सध्या जोरदार पाऊस पाहता इथं एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.
आरक्षणावरून होणारा वाद हा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे. आमचा कोणालाही विरोध नाही, पण, समाज एकत्र येण्यासाठी प्रयत्न करा. सरकारनं तुमची फसगत केली आहे असं म्हणत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात नसल्याची भूमिता वडेट्टीवारांनी स्पष्ट केली. मराठा समाजाच्या नेतृत्त्वात आम्ही काम केलं असून, त्या नेत्यांनी आम्हाला जपलं आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून खळबळ उडवलीय. गोपनीय माहितीनुसार माझ्या जिवीताला धोका असल्याच बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे माहिती दिलीय. माझा अपघात झाला अश्या प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याची बच्चू कडू यांनी पोलिसांना माहिती दिलीय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केलीय. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडालीय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती असून, बीडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातील काही नेत्यांचा आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याचं समजतंय.
नागपूर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर वाशिम च्या पेडगाव जवळ सकाळी ट्रेलर व दोन ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात. नागपूर कडून संभाजीनगर कडे जात असलेल्या टेलर व पुण्याकडून अमरावतीला जाणाऱ्या 2 ट्रॅव्हल्स मध्ये वाशिमच्या पेडगाव गावाजवळ झाला अपघात. या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी इतर 15 जण किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती. अपघातानंतर जखमींना कारंजा येथिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
अरुंद रस्ता असल्याने वाहतूकीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं कारण पुढे करत अवजड वाहतुकीसाठी तिलारी घाट बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानंतर घाट वाहतुकीसाठी बंद झाला असून, 13 ऑक्टोबरपर्यंत इथून जाणारी एस टी वाहतूकही बंद रहाणार आहे.
मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने केवळ १२ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सर्वात कमी पेरण्या नागपूर आणि कोकणामध्ये तर सर्वाधिक पेरण्या लातूर संभाजीनगर विभागामध्ये झाल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरण्या सरासरी 15 ते 16 टक्क्यांपर्यंत गेल्या. येत्या आठवडाभरात पाऊस जोर धरेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतरच पेरण्या मार्गी लागतील, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे पेरण्यांची आकडेवारी अपडेट होण्यासाठी वेळ लागत असल्याने अद्याप चित्र स्पष्ट नसलं तरी दोन चार टक्क्याने यामध्ये फरक होऊ शकतो असेही विभागाने स्पष्ट केला आहे बीज पावसानंतरच शेतकरी खऱ्या अर्थाने सुरुवात करेल त्यानंतर वेग घेतला जाईल असे तज्ञांचे म्हणणे आहे
#WATCH | Srinagar, J&K: On International Day of Yoga, PM Narendra Modi says, "We can feel the energy in Srinagar, that we gain through Yoga. I extend greetings to people of the country and people performing Yoga in every corner of the world on Yoga Day. International Yoga Day has… pic.twitter.com/N3sVDnF8XC
— ANI (@ANI) June 21, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांपर्यंत, संपूर्ण देश योगसाधनेत रमला... पाहा काही खास क्षण...
#WATCH | ITBP personnel perform Yoga at Pangong Tso in Leh, on the 10th International Yoga Day.
(Video source - ITBP) pic.twitter.com/6LCV406hla
— ANI (@ANI) June 21, 2024
#WATCH | Defence Minister Rajnath Singh, Army chief Gen Manoj Pande and others perform Yoga in Mathura, Uttar Pradesh on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/ke7DgB80ld
— ANI (@ANI) June 21, 2024
#WATCH | EAM Dr S Jaishankar and other diplomats perform Yoga in Delhi, on the International Day of Yoga. pic.twitter.com/MSbucUs40x
— ANI (@ANI) June 21, 2024
#WATCH | Actor Jackie Shroff performs Yoga in Mumbai, on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/ffCHxRvDvV
— ANI (@ANI) June 21, 2024
दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीतनंतर आता महाराष्ट्र भाजपची बैठक होणारेय. महाराष्ट्र भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक आहे.. प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात चर्चा होणारेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंसह कोअर कमिटीतील सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभेप्रमाणेच विधानसभेत एकत्र लढून 155 जागा जिंकू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय... लोकसभेत 3 पक्ष एकत्र लढून 31 जागा जिंकल्या... यात 288 विधानसभा मतदारसंघापैकी 155 मतदारसंघात आमचा विजय झालाय... त्यामुळे लोकसभेसारखी रणनीती आम्हाला विधानसभेला आखावी लागेल असं पवार म्हणाले.
मुंबईतही जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मरीन ड्राईव्ह याठिकाणी योगदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणारेत. योगा बाय द बे असं या कार्यक्रमाचं नाव आहे. यासाठी मरीन ड्राईव्हला विशेष तयारी करण्यात आलीये. अनेक जण याठिकाणी योग दिवस साजरा करण्यासाठी आले आहेत.
विरोधा पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल हाकेंची आंदोलस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले. त्यांनी हाकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चाही केली.
यंदा स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी योग दिनाची थीम आहे...या थीमचा अर्थ योगाद्वारे आपण आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो आणि त्यातून समाजाचे कल्याणही शक्य आहे...योगामुळे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकास होतो...त्यामुळे योगा खूप महत्त्वाचा आहे, असा संदेश दिला जात आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.