Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज घरोघरी आणि मंडळात गणराया विराजमान होणार आहे. सर्वत्र वातावारण बाप्पामय झालं आहे. कोकणाचं आराध्य दैवत गणेशाचं वाजत गाजत आणि पारंपरिक पद्धतीने आगमन होतंय. मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची रीघ लागली आहे.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : पुण्यामध्ये बाप्पांच्या आगमनाची सुरुवात झालीय. अनेक गणपतीच्या मिरवणुका निघत असून... ढोल पथकांचं वादन सुरू आहे. त्यामुळे भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. मिरवणुकीसमोर वेगळेवेगळे वादन, नृत्य, आणि लाठी-काठीचं प्रात्यक्षिकं सादर केलं जातंय.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आली. त्याआधी दगडूशेठ बाप्पाची सकाळी मुख्य मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी घरातील सर्व सदस्य उपस्थित होते. राज्यातील बळीराजावरील संकट दूर होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी गणरायाकडं घातलंय.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ'वर गणरायाची स्थापना करण्यात आली..यावेळी त्यांनी गणरायाचे सहकुटुंब पूजन केले..राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना झालीय..
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : वाशिम जिल्ह्यातील कामरगाव इथल्या वीर मराठा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने यंदा कागदापासून गणेशाची साडे पाच फूट उंचीची पर्यावरणपुरक मुर्ती साकारली. गणेश मूर्तीसाठी सेंचुरी पेपरचा वापर केला असून विविध रंगीबेरंगी कागदी फुलांनी मूर्तीला आकर्षक स्वरूप देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय..
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : येवला शहरासह परिसरामध्ये गणरायाचं जल्लोषात आगमन झालंय. यावेळी विद्यार्थ्यांनी झांज, लेझीम खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली.. तर काही विद्यार्थ्यांनी महादेव, गणपती बाप्पाची वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला..
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवास्थानी गणरायाचं आगमन झालं.. मोठ्या भक्तीभावात दानवेंनी घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली..
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देखील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय..नागपूरचा ग्रामदैवत असा मान असलेला गणपती म्हणजे टेकडी गणेश...सकाळी आरतीपासून टेकडी गणपती मंदिरात गणेश उत्सवाला सुरवात झालीय...
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : कोल्हापुरात मोठ्या उत्साहात गणेशाचे आगमन होतंय. ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करत भाविक गणेश मूर्ती आपल्या घरी नेतायत.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जवळपास 350 मंडपांना परवानगी नाकारण्यात आलीय. मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. अरुंद रस्ता, वाहतूक कोंडीच्या शक्यतेमुळे ही परवानगी नाकारण्यात आली.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर नैना प्रकल्प परिसरामध्ये 171 घरांची विक्री होणारेय... गृहनिर्माण योजनेंतर्गत 21 सप्टेंबरपासून या घरांसाठी अर्ज सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणारेत...यामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी 17 तर अल्प उत्पन्न गटांसाठी 164 सदनिका ठेवण्यात आल्यात..
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : गणेश भक्तांची गैरसोय होऊनये म्हणून बेस्टनं रात्रभर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी बेस्टनं मुंबईतील 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसगाड्या सुरु ठेवल्यात.. 19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत या अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार आहेत..
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमची फास्टॅग स्कॅनरमधून टोलची रक्कम गेल असल्यास काळजीचं कारण नाही. कारण ही रक्कत तुम्हाला परत मिळणार आहे.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : Sindhudurg Ganeshotsav 2023
कोकणातील परंपरा आणि संस्कृतीच दर्शन घडविणारा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. हा उत्सव कोकणात अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 71 हजार 789 घरगुती तर 31 सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. मागील 4 महिने गणेश चित्र शाळांमध्ये आकार घेणारे बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होण्यासाठी निघाले.
Lalbaugcha Raja : राजांचा राजा लालबागचा राजा...नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रीघ लागली आहे. राज्यात काही मंडळांचे गणपती हे विशेष प्रसिद्ध आहेत व त्यामध्ये अग्रणी आहे तो म्हणजे मुंबईमधील लालबागचा राजा.
Chinchpokli Cha Chintamani : चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकांच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी लांबच रांग लागली आहे. तुम्ही घ्या घरबसल्या दर्शन
Mumbaicha Raja Ganesh Gali Ganpati : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया..चा जयघोष करत राज्यभरात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे.मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाचा. गणेश गल्लीच्या मंडळाचं यंदाचं हे 96 वं वर्ष आहे. तर यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा मुंबईच्या राजाच्या दरबारात साकारण्यात आला आहे.
Manmad Ganeshotsav 2023 : मनमाड शहरात गणरायाचं मोठ्या थाट्यात माट्यात आगमन झाले आहे. ढोल-ताश्यांच्या गजरात मनमाड शहर दुमदुमलं होतं. गणेशभक्तांमध्ये जोरदार उत्साह दिसून येतं आहे. यंदा लहान मोठे जवळपास 100 गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : अष्टविनायकातील सातव्या स्थानी असलेला मानाचा गणपती असलेल्या ओझरच्या विघ्नेश्वराचा द्वारयात्रा उत्सव सुरू झाला आहे. लाडक्या बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त ओझरच्या विघ्नेश्वर नगरीत दाखल आहे.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : शेताच्या बांधावरून गणरायाचं वाजत गाजत आगमन केलं जातं आहे. मोठ्या संख्येने चारकमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यात एक लाखांहून अधिक घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. लाडक्या गणरायाचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र आगमन होत आहे. घरगुती गणपतींबरोबरच सार्वजनिक गणपतींचे पारंपारिक खालुबाजा आणि ढोल ताशांच्या तालावर वाजत गाजत गणेशमुर्ती आणल्या जात आहेत. अधून मधून पावसाच्या किरकोळ सरी कोसळत असल्या तरी गणेश भक्तांचा उत्साह तसूभरही कमी होताना दिसत नाही.
Siddhivinayak Temple Mumbai : गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच रीघ लावली आहे.
Shreemant Dagdusheth Halwai Pune : पुण्यातील प्राचीन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर हे प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. गणेश भक्तांनी आज सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे.
Pune Kasaba Ganpati : मानाचा पहिला कसबा गणपती
पुण्याचा पहिला मानाचा गणपती श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11:37 ला होणार आहे. डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.
Ganesh Aarti Sangrah /Ganapati Prarthana/Ganapati Stotra/ mantra pushpanjali : पुढील दहा दिवस मोठ्या उत्साहाने मनोभावे गणरायाची आराधना सेवा करण्यात येणार आहे. बाप्पाची सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाणार आहे. अशावेळी संपूर्ण आरती संग्रह, श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली साठी खालील दिलेली माहिती तुमच्या कामी येईल.
Pune Traffic Change : पुण्यातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतं आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे. थोड्याच वेळात पुण्यातील मानाच्या बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहे.
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates :
घरात स्थापना आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त
पहिला मुहूर्त - सकाळी - 9.30 ते 11.00 वाजेपर्यंत
दुसरा मुहूर्त - सकाळी 11.25 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत
दुकान, ऑफिस आणि फॅक्ट्रीसाठी शुभ मुहूर्त
पहिला मुहूर्त - सकाळी - 10.00 ते 11.25 वाजेपर्यंत
दुसरा मुहूर्त - दुपारी 12.00 ते 1.20 वाजेपर्यंत
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : गणेश चतुर्थी तिथी
पंचागानुसार चतुर्थी तिथी 18 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी सुरु झाली असून 19 सप्टेंबरला 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत असणार आहे. दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र असून त्यानंतर विशाखा नक्षत्र सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगावर पूजा केल्यास दुप्पट फळ प्राप्त होईल अशी मान्यता आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.