Gujarat Ahemdabad Plane Crash News Live Updates in Marathi: गुजरातमधील अहमदाबाद येथील विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेघानी येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिल्लीहून अहमदाबादमार्गे इंग्लंडला जात असलेलं हे विमान रहिवाशी भागात पडले असून विमानामधून 52 ब्रिटीश नागरिक प्रवास करत होते.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत 230 जणांचा मृत्यू झालाय. यात सुदैवाने वाचलेल्या प्रवाशाला मी भेटलो. गुजरातमध्ये मृतांची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.
अहमदाबाद-लंडन फ्लाइटमध्ये एकूण 242 लोक होते. त्यापैकी 230 प्रवासी होते. भूमी चौहानलाही या फ्लाइटने लंडनला जायचे होते, परंतु ट्रॅफिक जाममुळे तिचे फ्लाइट चुकले. ती चढू शकली नाही. अपघाताची बातमी कळताच तिने देवाचे आभार मानले.
अहमदाबादहून लंडन गॅटविकला दुपारी 1.38 वाजता निघालेले हे विमान, बोईंग 787-8 होते. विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यामधील 2 पायलट आणि 10 क्रू मेम्बर्स होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त केलंय. अभिनेता सलमान खान याने त्याचा अहमदाबादमध्ये होणारा इव्हेंट रद्द केलाय.
Pained and shocked to know about Air India passenger flight incident at Ahmedabad airport.
Praying for everyone’s safety— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 12, 2025
एअर इंडिया विमान अपघाताबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "अहमदाबादमध्ये जे घडले आहे ते अतिशय दुःखद अपघात आहे. आम्ही बरेच लोक गमावले आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. यामध्ये अनेक परदेशी लोकांचाही समावेश आहे."
अहमदाबाद विमान अपघातानंतर आपत्कालीन सेवांवर देखरेख करण्यासाठी चार आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही टीम आरोग्य प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. अपघातस्थळी आणि संबंधित ठिकाणी समन्वित मदत, बचाव आणि वैद्यकीय प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
अहमदाबाद विमानतळावर विमान वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने माहिती दिली आहे की अहमदाबाद विमानतळ आता 16.05 IST पासून उड्डाणांसाठी उपलब्ध आहे. उड्डाण सुरक्षा नियमांचे अत्यंत काळजीपूर्वक पालन केले जात आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृत्यू झाल्याची माहिती अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत सुनील तटकरेंच्या नातेवाईकाचाही समावेश, कोण आहे अपर्णा महाडिक?https://t.co/Qo9y2hF43Z#planecrash #Ahemdabad #AhemdabadPlaneCrash #Explained #blackbox #aeroplane #AirIndia #Flight Aparna Mahadik
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2025
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. हे विमान दिल्लीहून अहमदाबाद व्हाया लंडन असा प्रवास करणार होतं. धक्कादायक बाब म्हणजे उड्डाण करताच अवघ्या 15 किमी अंतरावरच मेघानी रहिवाशी परिसरात विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत 10 गोष्टी टप्प्या टप्प्याने आपण पाहणार आहोत. हा अपघात कसा झाला?
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं, पाहा कशी होती Time Line; 10 महत्त्वाचे मुद्देhttps://t.co/o1pS2C53Cq#Ahmedabad #AhmedabadPlaneCrash #AhmedabadAirport #AirIndia #AirIndiaCrash
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2025
अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त विमानाच्या केबीन क्रु अपर्णा महाडीक या तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी आहेत.
एयर इंडिया विमान दुर्घटना | गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबाद के असरवा सिविल अस्पताल पहुंचे, जहां विमान दुर्घटना में घायलों को लाया गया है। pic.twitter.com/VueNQlvkfH
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
लोकसभा में विपक्ष के नेता और कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कहा, "अहमदाबाद एयर इंडिया दुर्घटना दिल दहला देने वाली है। यात्रियों और चालक दल के परिवारों को जो दर्द और चिंता हो रही होगी, वह अकल्पनीय है। इस अविश्वसनीय रूप से कठिन क्षण में मेरी संवेदनाएं उनमें से प्रत्येक के साथ हैं।… pic.twitter.com/I7CpWDSzIb
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने कहा, "अहमदाबाद में हुए दुखद विमान हादसे के बारे में जानकर मैं बहुत व्यथित हूं। यह हृदय विदारक आपदा है। मेरी संवेदनाएं और प्रार्थनाएं प्रभावित लोगों के साथ हैं। अवर्णनीय दुख की इस घड़ी में राष्ट्र उनके साथ खड़ा है।" pic.twitter.com/YpHv8Z1fOn
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
PM Narendra Modi tweets, "The tragedy in Ahmedabad has stunned and saddened us. It is heartbreaking beyond words. In this sad hour, my thoughts are with everyone affected by it. Have been in touch with Ministers and authorities who are working to assist those affected." pic.twitter.com/HWX2yR3kZ9
— ANI (@ANI) June 12, 2025
#WATCH एयर इंडिया विमान दुर्घटना: गुजरात के अहमदाबाद के सिविल अस्पताल पहुंची रमीला ने कहा, "मेरा बेटा लंच ब्रेक के दौरान हॉस्टल गया था और विमान वहीं दुर्घटनाग्रस्त हो गया। मेरा बेटा सुरक्षित है और मेरी उससे बात हुई है। वह दूसरी मंजिल से कूद गया था इसलिए उसे कुछ चोटें आई हैं।" pic.twitter.com/AFgdvWiV0k
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
CISF Rescue Operations Underway at AI 171 Crash Site, Ahmedabad.
Following the tragic crash of London-bound Air India flight AI 171 near Ahmedabad Airport, #CISF personnel immediately activated emergency protocols and rushed to the site. Rescue operations are being carried out in… pic.twitter.com/jnfIWxQF1b— CISF (@CISFHQrs) June 12, 2025
अहमदाबाद विमानतळाजवळ लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 171 च्या दुर्दैवी अपघातानंतर, सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ने तात्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल सक्रिय केला. सीआयएसएफने घटनास्थळाचे फोटो ट्विट केले आहेत आणि माहिती दिली आहे.या दुःखाच्या क्षणी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे आहेत आणि सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे सीआयएसएफने म्हटलंय.
गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 12, 2025
<blockquote class="twitter-tweet"><p lang="hi" dir="ltr">केंद्रीय गृह मंत्री अमित शाह एयर इंडिया विमान दुर्घटना के बाद अहमदाबाद के लिए रवाना हुए। <a href="https://t.co/7OVGMBQIAa">pic.twitter.com/7OVGMBQIAa</a></p>— ANI_HindiNews (@AHindinews) <a href="https://twitter.com/AHindinews/status/1933105127906308304?ref_src=twsrc%...">June 12, 2025</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
अहमदाबादमधील विमान अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. माहिती देताना एनडीआरएफने सांगितले की, गांधीनगरहून विमान अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 90 जवानांचा समावेश आहे. वडोदराहून आणखी तीन तुकड्या पाठवण्यात येत आहेत.
अपघातग्रस्त विमानाने 24 मिनिटे उशिराने उड्डाण केले होते. आज अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1.34 वाजता उड्डाण घेतले. तर उड्डाणाची नियोजित वेळ 1.10 होती. एअर इंडियाच्या या विमानाने लंडनसाठी उड्डाण करताच अवघ्या 4 मिनिटांत हा अपघात झाला.
अधिक माहिती देण्यासाठी 1800 5691 444 हा प्रवासी हॉटलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे.एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (x.com/airindia) आणि airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती जाहीर करत आहे.
#WATCH | Relief and rescue efforts are underway at the site of Air India plane crash in Ahmedabad
Union Home Minister Amit Shah has spoken to the Gujarat CM and promised all Central assitance pic.twitter.com/PqsaCsnFKd
— ANI (@ANI) June 12, 2025
अहमदाबाद विमान अपघातावर एअर इंडियाच स्पष्टीकरण
Air India says, "The flight, which departed from Ahmedabad at 1338 hrs, was carrying 242 passengers and crew members on board the Boeing 787-8 aircraft. Of these, 169 are Indian nationals, 53 are British nationals, 1 Canadian national and 7 Portuguese nationals. The injured are… pic.twitter.com/G7jaEIcZla
— ANI (@ANI) June 12, 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला रवाना झाले आहेत. विमानात सुमारे 242 लोक होते
दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, मी अत्यंत दुःखाने पुष्टी करतो की अहमदाबाद लंडन गॅटविक येथून उड्डाण करणारे एअर इंडियाचे फ्लाइट 171 अपघातग्रस्त झाले आहे. या दुर्देवी घटनेत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांसोबत आमच्या संवेदना आणि खोल सहानुभूती आहेत. सध्या, आमचे प्राथमिक लक्ष सर्व बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधित लोकांना आवश्यक ती सर्व मदत आणि काळजी देण्यासाठी आमच्या शक्तीनुसार सर्वकाही करत आहोत.
या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी संवाद साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक एजन्सी मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.
नुकसानाची सविस्तर माहिती अद्याप कळू शकलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने चौकशी सुरू केली आहे. विमानाची तांत्रिक स्थिती, धावपट्टीवरून उड्डाणादरम्यानची परिस्थिती आणि वैमानिकांमधील संवाद याबद्दल सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. विमान 11 वर्षे जुने होते आणि उड्डाणानंतर लगेचच कोसळले.
आगडोंब! एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा पहिला व्हिडीओ आला समोरhttps://t.co/kwtukFJqoq#AirIndia #PlaneCrash planecrash विमान अहमदाबाद Vijay Rupani #एअरइंडिया #Gujarat #Ahmedabad #Meghani
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2025
एअर इंडियाचं विमान क्रॅश, दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जखमीhttps://t.co/BJgSdUnRNw#AirIndia #Ahmedabad #ahmedabadplanecrash #Ahmedabad #VijayRupani #GujaratExCMVijayRupani
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2025
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेची माहिती अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये असणारे प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हे प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळलं आहे. यानंतर या परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ही घटना अहमदाबादच्या मेघानी भागात घडली आहे. विमानात 133 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबादमधील मेघानीमध्ये विमान कोसळलं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे विमान एअर इंडियाचे असल्याचं म्हटलं जात आहे.
शिवसेना UBT युतीचा चेंडू सध्या राज ठाकरे यांच्या कोर्टात सुरु आहे. अशातच अनेक नेते राज ठाकरेंच्या भेटीला येत आहेत. यामध्ये आता राज ठाकरे यांनी कोणाला भेटायचं हे ठरवावं. मराठी माणसचं स्वप्न पूर्ण करणार का? असा सवाल देखील अनिल परब यांनी राज ठाकरेंना केला आहे.
रोहित पवार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी बच्चू कडू यांच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यामुळे या आंदोलनात खासदार म्हणून काळेही सहभागी झाले आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मुक्तगिरीवर दाखल झाले आहेत.
फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?https://t.co/buAms7UyP4 < येथे वाचा सविस्तर वृत्त...#cm #devendrafadnavis #MNS #RajThackeray #TajLandsEnd #Hotel #alliance #uddhavthackeray #shivsena #Maharashtra…
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2025
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलंय. कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याने हे आंदोलन करण्यात आलं. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा असल्याने अजित पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्याला ऊसाचे पैसे देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरु होणार. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती. या मागणीला रेल्वे प्रशासनाने ही सकारात्मक प्रतिसाद दिला.
मुंबई महापालिकेने आता अॅप चॅट बोट सेवा सुरू केली आहे. याद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी करता येणार आहेत. हा अॅप ओपन केल्यानंतर केवळ 5 पेक्षा कमी क्लिकमध्ये तक्रार नोंदवता येणार आहे. तसंच 48 तासाच्या आत या तक्रारींचं निवारण होणार.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या संभाव्य गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी आणि सध्याचे सरकार बरखास्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना केली.
ठाणे मनसे मध्यवर्ती शाखेचा वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातील शाखेला भेट देणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता ते शाखेत उपस्थित राहणार आहेत. राज यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढत मनसे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणारेत. राज ठाकरे शाखा अध्यक्ष, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्याचीही शक्यता आहे. यावेळी राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडं लक्ष लागलंय.
राज्य शासनाने मुंबई महापालिकेला प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान गोपनीयता पाळण्याच्या कडक सूचनाही केल्या आहेत. गोपनीयता भंग केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी महापालिकेला प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचा संदर्भ देत नगरविकास विभागाने काढलेल्या या 34 पानी आदेशात, निवडणुकांची प्रक्रिया तत्काळ सुरू करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष रंगणार असल्याचं दिसून येतंय. पाटणमध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादी SP ला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय.
पक्षप्रवेशानंतर शिवसेना आणि शंभूराज देसाई यांच्याकडून येणाऱ्या टीकेला उत्तर देताना पाटणकरांनी थेट हल्ला चढवला. आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पण तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी, सुरतला पळून गेलात, याचं काय कारण होतं?” असा रोखठोक सवाल शंभूराज देसाई यांना पाटणकर यांनी केलाय.
तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. माझ्यावर प्रेम कर , लग्न कर नाही तर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेन अशी धमकी आरोपीकडून मुलीला मिळत होती. त्यामुळे पंधरा वर्षाच्या मुलीने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं. बंदुक दाखवत आरोपीने मुलीला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती, या प्रकरणी मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर यापुर्वीही गुन्हा दाखल आहे.
आता प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 9 नाही 10 तासांची शिफ्ट करावी लागणार!
आता 9 नाही 10 तासांची शिफ्ट करावी लागणार! प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा आदेश; संतापाची लाटhttps://t.co/InlzEZAqfo < येथे जाणून घ्या नव्या नियमांबद्दल...
कामाच्या ठिकाणावरील अनेक नियमांमध्येही करण्यात आलाय बदल#OfficeWork #Shift #Private #Office #Corporate…— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2025
... तरच तात्काळ तिकीट बुक करता येणार, 1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू
Indian Railway New Tatkal Ticket Booking: तात्काळ आरक्षण प्रणालीत रेल्वे महत्त्वपूर्ण सुधारणा करणार आहे. https://t.co/42ATmQSaMB— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2025
काँग्रेसचा राज्यभर 12 ते 14 जूनला मशाल मोर्चा काढणार आहे. निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवत जनजागृती करणार.
अमरावती - बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. कडू यांच्या आंदोलनाला छत्रपती संभाजी राजे, रोहित पवार, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे भेट देणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. सायंकाळी सहा वाजता मनसे मध्यवर्ती कार्यालयात कार्यालय वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहणार आहेत.
आज दुपारी बारा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष यांची शिवतीर्थ येथे बैठक होणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईकरांसाठी फुफ्फुस आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राष्ट्रीय उद्यान आवश्यकच असून यामधील नागरिकांचे पुनर्वसन करणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यातही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कुर्ला येथील प्रीमियर कंपनीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या मिठी नदीशेजारील नागरिकांचे पुनर्वसन केलेल्या इमारतींची डागडुजी तातडीने करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी स्वच्छता आणि कचरा उचलणे अशा मूलभूत सुविधा पुरवण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले.
आयुर्वेदिक UG नंतर होणारी NEXT (National Exist Test Exam) परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2019 साली पहिल्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यावी लागणार नाही. 2019 ऐवजी 2022 नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी NEXT परीक्षा लागू राहणार. परीक्षासरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.