Lok Sabha Elections Live Updates 3 May 2024: लोकसभा निवडणुकीची तिसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेले असतानाच निवडणुकीचा प्रचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींचा जोर वाढू लागला आहे. आजही राज्यासहीत भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून...
दक्षिण मुंबईतून आमच्या यामिनी जाधव या उमेदवार आहे. आजचा उत्साह पहता त्या मोठ्या फरकाने निवडून येतील आम्ही आम्ही केलेल्या विकासावर मत मागतोय.अडीच वर्षात आम्ही फक्त विकास कामांना प्राधान्य दिलं, आणि त्याच जोरावर मत मागतोय.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चित्रा वाघ यांनी ज्याचा फोटो Adult Star म्हणून दाखवला, तो अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार! म्हणाला- 48 तासांच्या आत…ठाणे, रत्नागिरीमध्ये एकीकडे उमेदवारी, निवडणूक प्रचारावरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये पॉलिटिकल कॅम्पेनवरुन चांगली जुंपली आहे. 'पॉर्न स्टार' शब्दावरुन लोकसभा निवडणुकीत राज्यात आता वाद सुरु झालाय. भाजपच्या चित्रा वाघ यांनी थेट फोटोच दाखवत उद्धव ठाकरेंच्या निवडणुकांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतलाय. यामुळे अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी हे व्यथित झाले आहेत. त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना गंभीर इशारा दिलाय. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...
To The Point | Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांचे संबंध एवढे का बिघडले?#tothepoint #devendrafadnavis #uddhavthackeray #loksabhaelection2024 #maharashtrapolitics pic.twitter.com/7I1umXe0QN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 2, 2024
काँग्रसचे नेते राहुल गांधींनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.
ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. या भाजपा समर्थकांना गणेश नाईक किंवा संजीव नाईक यांना तिकीट देण्याची मागणी केली आहे.
काँग्रसचे नेते राहुल गांधी आज पुण्यात सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे आज दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बारामतीत असणार आहेत. ते सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजीचा सूर आळवला आहे. मोदी आणि शाह अडचणीत असून खोटं बोलत असल्याची टीका राऊतांनी केली. यावेळी चाणक्यनितीतील अडचणीतला व्यापारी आणि त्याची खोटं बोलण्याची सवय याचा संदर्भ त्यांनी दिला. सध्याच्या घडीला शिंदे गटाच्या शिवसेनेवर असणारं पंतप्रधानांचं प्रेम खोटं असल्याचं म्हणत त्यांनी यावेळी पवार कुटुंबात पक्षातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून फूट पडल्याच्या सर्व चर्चा त्यांनी धुडकावल्या. येथे वाचा सविस्तर वृत्त...
नाशिकमध्ये 20 मे रोजी मतदान होणार असून महाराष्ट्रातील 5 व्या टप्प्यातील मतदानामधील 13 मतदारसंघामध्ये नाशिकचा समावेश आहे. नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. नाशिकमधून महायुतीचा उमेदवार निवडताना अनेक उलट-सुलट घडामोडी घडल्या. यानंतर अखेर शिंदे गटाने हेमंत गोडसेंना उमेदवारी जाही केली आणि महायुतीचा नाशिकचा उमेदवार कोण या चर्चेवर पडदा पडला. एकीकडे हा सस्पेन्स संपला असताना आता पुन्हा एकदा नाशिकमधील निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...
प्रहार शेतकरी संघटनेचे नेते आणि महायुतीबरोबर असलेल्या बच्चू कडू यांनी बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. अमरावतीनंतर बारामती हा दुसरा मतदारसंघ आहे जिथे महायुतीमध्ये असूनही कडू यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत वेगळी भूमिका घेतली आहे.
प्रियंका गांधी अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रियंका गांधी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षाने राहुल गांधींना रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर केली आहे. तर अमेठीमधून पक्षाने के. एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा उल्लेख पुण्यातील सभेमध्ये 'भटकती आत्मा' असा केल्यानंतर या प्रकरणावरुन नवीन वाद निर्माण झालेला असतानाच आता एका मुलाखतीत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या कारकिर्दीसंदर्भात बोलतना पंतप्रधांनी शरद पवारांना कुटुंब संभाळता येत नाही तर ते महाराष्ट्र काय संभाळणार? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे. मात्र मोदींच्या या टीकेला शरद पवारांच्या नातवाने उत्तर दिलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...
मुंबईमधून रविंद्र वायकर तर ठाण्यामधून नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाकडून हे दोघेही निवडणूक लढवत आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही इजा झालेली नाही. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी वाढवलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि नागपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नितीन गडकरींच्या मतदारसंघात आकडेवारी कमी करण्यात आल्याकडेही ठाकरे गटाने लक्ष वेधलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरदरम्यान नवगणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये नवगणे यांच्या कारचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. अनिल नवगणे यांनी हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी केल्याचा आरोप केला आहे.
रायगडमध्ये काल गुरुवारी नेमकं घडलं काय? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम येथे क्लिक करुन...
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वाय्यनाडबरोबरच उत्तर प्रदेशमधून काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ राहिलेल्या रायबरेलीमधून निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षाने राहुल गांधींना रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर केली आङे. तर अमेठीमधून पक्षाने के. एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. के. एल. शर्मा हे भाजपाच्या स्मृती इराणींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर राहुल गांधींसमोर रायबरेलीमधून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांचं आव्हान असेल.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.