Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: या राज्यातील सहा जिल्हयात एकही मत पडलं नाही

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.   

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: या राज्यातील सहा जिल्हयात एकही मत पडलं नाही
LIVE Blog

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात लोकशाहीचा उत्सव सुरु होत असून, त्यासाठी संपूर्ण भारत देश सध्या सज्ज झाला आहे. देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 

महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात निवडणूकीच्या धर्तीवर मतदान पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडकरी, विकास ठाकरे, मुनगंटीवार, धानोरकरांसह बड्या नेत्यांचं भवितव्य इथं मतपेटीत बंद होणार आहे. तर, पूर्व विदर्भातल्या लढाईत आज फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.

19 April 2024
19 April 2024 18:46 PM

Lok Sabha Elections Voting Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. देशात 21 राज्यातील 102 जागांवर मतदान झालं. आतापर्यंत 55 ते 60 ट्क्के मतदान झाल्याची माहिती आहे. पण नागालँडमध्ये एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. नागालँडमधल्या सहा जिल्ह्यात शून्य टक्के मतदान झालं. इथल्या लोकांची आपल्या राज्यात स्वतंत्र प्रशासनाची मागणी आहे. नागालँड पीपल्स ऑर्गनायजेशनने मतदानवर बहिष्काराची घोषणा केली होती. याला तिथल्या लोकांनी प्रतिसाद दिला.

 

19 April 2024 17:11 PM

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. यादरम्यान दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचारही सुरु झाला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले आहेत. वर्ध्यात पीएम मोदी यांनी मराठी भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. जय गुरु म्हणत पीएम मोदींनी जनतेला वंदन केलं.

19 April 2024 15:16 PM

Lok Sabha Elections Voting Live Updates: लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळ यांची माघार 

मी निवडणूक लढावी अशी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची इच्छा होती, असं वक्तव्य करत नाशिकमध्ये महाविकासआघाडीचा प्रचारही सुरु झाला असल्याची वस्तुस्थिती मांडत आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं छगन भुजबळ यांनी जाहीर केलं. 

19 April 2024 13:48 PM

विदर्भात एक वाजेपर्यंत झालेलं मतदान
नागपूर - 28.75 %
रामटेक - 28.73 %
भंडारा-गोंदिया - 34.56 %
चंद्रपूर - 30.96 %
गडचिरोली चिमूर - 41.01 %

19 April 2024 13:45 PM

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात 21 राज्यातील 102 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. मतदानात आतापर्यंत पश्चिम बंगाल आघाडीवर आहे.  सर्वाधिक म्हणजे  33.56% मतदान पश्चिम बंगालमध्ये झालंय. योगगुरु बाबा रामदेव यांनी उत्तराखंडमधल्या हरिद्वार इथं मतदान केलं. त्यांच्याबरोबर पतंजली आयुर्वेदचे संचालक आचार्य बालकृष्णही होते. तर तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये सदगुरु जग्गी वासूदेव यांनी मतदान केलं.

19 April 2024 12:29 PM

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात 102 जागांवर मतदान पार पडतंय. सकाळी 11 वाजेपर्यंत जम्मू-काश्मिरमध्ये  22.60 मतदान झालंय. तर महाराष्ट्रात 19.17 टक्के मतदान पार पडलंय. मध्य प्रदेशमध्ये 30.46, मणिपूरमध्ये 27.64, मेघालयात 31.65, पुद्दुचेरीत 27.63, राजस्थानमध्ये 22.51, मिझोरममध्ये 26.23, नागालँडमध्ये 22.50 टक्के मतदान झालंय. 

19 April 2024 11:40 AM

सकाळी ११ वाजेपर्यंतचे मतदान
भंडारा गोंदिया : १९.७२ %
चंद्रपूर : १८.९४ %
गडचिरोली-चिमुर : २४.८८ %
नागपूर : १७.५३ %
रामटेक : १६.१४ %

19 April 2024 11:39 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातील पाच जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. आता 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं याची टक्केवारी समोर आली आहे.

नागपुर लोकसभा मतदारसंघात अकरा वाजेपर्यंत 17.53 % मतदान
रामटेक लोकसभा मतदारसंघात 16.140 टक्के मतदान

19 April 2024 11:09 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: अभिनेता विजय सेतुपती मतदान केंद्रावर उपस्थित 

अभिनेता विजय सेतुपती यानं तामिळनाडूतील चेन्नई येथे मतदानकेंद्रावर जात मतदाना केल्याचं पाहायला मिळालं. 

19 April 2024 11:09 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: अभिनेता विजय सेतुपती मतदान केंद्रावर उपस्थित 

अभिनेता विजय सेतुपती यानं तामिळनाडूतील चेन्नई येथे मतदानकेंद्रावर जात मतदाना केल्याचं पाहायला मिळालं. 

19 April 2024 11:04 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: कॉग्रेस पक्षाचाच विजय होईल- विश्वास किरसाण 

 गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील कॉग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ नामदेव किरसाण यांनी गोंदिया जिल्यातील आमगाव येथे सपत्नीक मतदान केले. मतदारांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले तर या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचाच विजय होईल असा विश्वास किरसाण यांनी व्यक्त केला.

19 April 2024 10:35 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: नागरिकांनी निर्भयपणे मतदान करा- धर्मरावबाबा आत्राम 

राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील चेरपल्ली येथील शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. या नक्षलग्रस्त भागात नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. उन्हाचा तडाखा बघता सर्वांनी पहिल्या काही तासातच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले

19 April 2024 10:24 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: एमएनएम प्रमुख, अभिनेते कमल हासन यांनी बजावला मतदानाचा हक्क 

ज्येष्ठ अभिनेते आणि एमएनएम प्रमुख कमल हासन यांनी चेन्नईतील कोएंबेडू येथील मतदान केंद्रात त्यांचा हक्क बजावला. हासन यांच्या राजकीय पक्षानं यंदा निवडणुकीत सहभाग घेतला नसून, या पक्षानं द्रमुकला पाठिंबा दिला आहे. 

19 April 2024 10:15 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: गडचिरोलीत अद्याप मतदानाला सुरुवात नाही 

गडचिरोलीतील कुरखेडा मतदान केंद्रावर मतदान अद्यापही सुरू झालेलं नाही. मतदानास सुरुवात होऊनही 3 तास लोटले असले तरीही इथं मतदान सुरू झालेलं नाही. ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया रखडली असल्याची प्राथमिक माहिती इथं देण्यात येत आहे. 

19 April 2024 10:12 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: टक्केवारीनुसार मतदान 

पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बिहारच्या चार जागांसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.66 वोटिंग झालं. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 07.22 टक्के मतदान झालं. तर, नागपूर सकाळी नऊ पर्यंत सुमारे 08 टक्के आणि रामटेक सकाळी नऊ पर्यंत सुमारे 6 टक्के मतदान झालं. त्यामागोमाग गडचिरोलीमध्ये 8.43 आणि चंद्रपूरात 7.44 टक्के मतदान झालं. 

19 April 2024 10:07 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात केलं मतदान 

एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील गोंदिया येथे मतदान केलं. तर, नागपुरातील कोराडी ग्रामपंचायत मतदान केंद्रावर जात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलं. 

19 April 2024 09:54 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: मतदान केल्यानंतर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया 

'लोकशाहीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात असून, देशातील नागरिक संविधानानं दिलेला अधिकार आणि त्यांचं कर्तव्य बजावतील अशी मला हमी आहे. मी नागपूरच्या मतदारांना आवाहन करतो, की तापमान वाढत आहे त्यामुळं इथं लवकरात लवकर येऊन मतदान करा. यंदाच्या वर्षी इथं 75 टक्के मतदान होईल असा मला विश्वास आहे', अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली. मी रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होईन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

fallbacks

19 April 2024 09:22 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: अध्यात्मिक गुरु सदगुरू वासुदेव यांनी बजावला मतदानाचा हक्क

19 April 2024 09:01 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates:  स्टॅलिन यांनी केलं मतदान 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम के स्टॅलिन यांनी चेन्नईतील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. 

19 April 2024 08:25 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: अभिनेते रजनीकांत यांनी केलं मतदान 

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील मतदानकेंद्रावर जात तिथं मतदानाचा हक्क बजावला. 

19 April 2024 08:19 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: माढा मतदारसंघात मविआची चिंता वाढलीय

माढा मतदारसंघात मविआची चिंता वाढलीय. शेकापचे नेते अनिकेत देशमुख बंडाच्या तयारीत आहेत. मोहिते पाटलांना उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नाही, अशी नाराजी व्यक्त करत अपक्ष लढण्याची त्यांनी तयारी केलीय. या भूमिकेनंतर त्यांना शरद पवारांनी बारामतीत भेटीसाठी बोलावलंय. या भेटीनंतर शेकापच्या अनिकेत देशमुखांचं बंड थंड होणार का, याकडे लक्ष असेल. 

19 April 2024 08:01 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे. उमेदवार देखिल उत्साहाने सकाळी सकाळी मतदान केंद्रावर आले आहे. तर बीएसपी चे उमेदवार संजय कुंभलकर यांनी सुध्दा मतदान केलं असुन पहिल्यांदा राज्यातून बीएसपीची सीट निवडूण येणार असल्याच त्यांनी सांगीतले आहे. तर एकाच मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे व बीएसपी उमेदवार संजय कुंभलकर यांचं मतदान आल्याने त्यांनी गळाभेट देखिल केली आहे. 

19 April 2024 07:58 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: प्रतिभा धानोरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील लोकमान्य शाळेत आपला मतदानाचा अधिकार बजावला त्यांनी लोकशाहीचा हा उत्सव असून त्या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करत आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

19 April 2024 07:56 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: आज पासून बारामतीत प्रचाराची रणधुमाळी सुरू 

बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कण्हेरीच्या मारुती मंदिरात होणार प्रचाराचा शुभारंभ होणार असून त्यांना नंतर जाहीर सभा होणार आहे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ,सुप्रिया सुळे , आमदार रोहीत पवार कार्यकर्त्यांना मार्गशन करणार आहेत तसेच. 20 एप्रिल रोजी बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार  सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ  होणार आहे  सुनेत्रा पवार यांच्या प्रचारांचा शुभारंभ देखील कण्हेरी  येथील मारुतीच्या मंदिरातच होणार असून पवार कुटूंबियांचे  श्रद्धास्थान असलेला कण्हेरी चा मारुती कोणाला पावणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

19 April 2024 07:52 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: तामिळनाडू येथे अभिनेता अजित कुमार यानं मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.  

19 April 2024 07:49 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: मतदार सत्याचीच साथ देणार - कमल नाथ 

काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी आपल्याला छिंदवाडा येथील नागरिक, मतदारांवर पूर्ण विश्वास असून ते सत्याचीच साथ देणार असल्याची प्रतिक्रिया दिली. या जागेवर कलम नाथ यांचे चिरंजीव काँग्रेस नेते नकुल नाथ लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. 

19 April 2024 07:36 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: गडचिरोलीत मतदानाला सुरुवात 

गडचिरोलीतील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळपासूनच मतदारांनी या प्रक्रियेत उत्साहानं सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत इथं मतदान सुरु राहणार असून, संवेदनशील, अतिसंवेदनशील आणि तीव्र संवेदनशील असे भाग असल्यामुळं इथं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. 

19 April 2024 07:32 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: विक्रमी संख्येनं मतदान करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीतून आवाहन

19 April 2024 07:14 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: तामिळनाडू येथे पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस नेते येथे पी. चिदंबरम यांनी तामिळनाडूतील शिवगंगा मतदान केंद्रावर जात बजावला मतदानाचा हक्क.

19 April 2024 07:10 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत 

चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत असून, प्रचारसभांमध्ये या दोन्ही नेत्यांनी मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला होता. इथं निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असून, यंदा 2019 च्या तुलनेत इथं 65 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. 

19 April 2024 07:07 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: सरसंघचालकांनी बजावला मतदानाचा हक्क

सरसंघचालकांनी भाऊजी दप्तरी शाळेतील मतदानकेंद्रात जात बजावला मतदानाचा हक्क, मतदानाचा हक्क बजावून तुम्ही एका प्रकारे पाच वर्षांसाठी देशाचं भविष्य निर्धारित करता आणि त्यामुळं सर्वांनीच मतदान करावं. यासाठी मीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलं. 

19 April 2024 06:57 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: सरसंघचालक मतदान केंद्रावर पोहोचले 

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक प्रभारी आणि स्वयंसेवक मतदान केंद्रावर पोहोचले असून, मतदान प्रक्रिया सुरु होण्याआधीपासून मोहन भागवत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले. 

fallbacks

19 April 2024 06:54 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: पुदुच्चेरी इथंही निवडणुकीच्या धर्तीवर मतदानाची तयारी 

19 April 2024 06:52 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates:  पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे.

 

19 April 2024 06:50 AM

Lok Sabha Elections Voting Live Updates: निवडणूक यंत्रणा सज्ज 

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात आज  मतदान होत असून जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झालीय, रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रं आहेत. नागपूर जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. मतदान केंद्र सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यात सुमारे 30 हजार पोलीस आणि शासकीय  कर्मचारी तैनात करण्यात आलेत

 

Read More