Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Loksabha Election 2024 Live Updates : संजय निरुपम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?

Loksabha Election 2024 Live Updates :  भटकती आत्मा यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या सभेत शरद पवारांवर टीका केल्यानंतर वार पलटवार सुरु झालंय. 

Loksabha Election 2024 Live Updates : संजय निरुपम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?
LIVE Blog

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्यातील मतदान पार पडलंय. आता तिसऱ्या टप्प्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सभेंचा धडाडा लावला आहे. आजही 1 मे महाराष्ट्र दिनाची सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक दिग्गज नेत्यांची सभा होणार आहे. 

01 May 2024
01 May 2024 20:17 PM

संजय निरुपम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला भेटायला बोलावलं होतं. पुढे कसं काय करायचं याबद्दल चर्चा झाली. परवा कदाचित दुपारी तीन ते चार वाजता माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होईल.
शिवसेनेचे सर्व उमेदवार जिंकण्यासाठी प्रचार करणार. शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर जिथे पक्ष मला सांगेल तिथे जाऊन प्रचार करणार. वीस वर्षानंतर पुन्हा एकदा माझ्या घरात मी प्रवेश करत आहे असं संजय निरुपम म्हणाले. 

01 May 2024 16:36 PM

कोकणामध्ये शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असून भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. किरण सामंत यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून. त्यांनी उदय सामंतांच्या कार्यालयावरील संपर्कप्रमुख बॅनर हटवलेत. त्याठिकाणी किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..

01 May 2024 12:56 PM

Loksabha Election 2024 Live Updates : अखेर नाशिकचा उमेदवाराचा तिढा सुटला

ठाणे, कल्याण - डोंबिवलीनंतर महायुतीकडून नाशिकचा उमेदवाराची घोषणा केलीय. नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली असून इथून हेमंत गोंडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा - नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरला! ना भुजबळ ना शांतिगिरी महाराज, शिंदेंनी 'या' व्यक्तीला दिली उमेदवारी

 

01 May 2024 12:45 PM

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला - सूत्र 

राज्यातील 48 जागांवरील महायुतीचं जागावाटप तिढा जवळपास सुटला असून त्यांचा लोकसभा निवडणूक 2024 साठीचा फॉर्म्युला ठरला असं सूत्रांची माहिती आहे. ठाणे, डोंबिवली- कल्याणचा उमेदवाराची घोषणा झाल्यावर आता फक्त पालघर आणि नाशिकचा उमेदवाराची घोषणा बाकी आहे. पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेनुसार नाशिक ही शिवसेनेकडे तर पालघर भाजपकडे असणार आहे. आता या हिशोबाने भाजपला 28, शिंदेंच्या शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 4 तर रासपला 1 जागा देण्यात आल्या आहेत. या गणितानुसार महाराष्ट्रात महायुतीचा 28-15-4-1 असा फॉर्म्युला निश्चित झालाय असं सूत्रांची माहिती आहे. 

01 May 2024 12:03 PM

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकचा उमेदवार जवळपास निश्चित

कल्याण-डोंबिवली आणि ठाण्याचा महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर आता नाशिक आणि पालघरचा तिढाही जवळपास सुटल्या आहे, असं माहिती पत्रकाराशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ उपस्थितीत होते. बावनकुळे म्हणाले की, नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला, पालघर भाजपकडे असणार आहे. त्याशिवाय नाशिकच्या जागेबद्दल शिंदेंच निर्णय घेतील, असंही ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी निश्चित मानली जातंय. हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती उद्या अर्ज भरणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. 

 

01 May 2024 10:56 AM

Loksabha Election 2024 Live Updates : राधाकृष्ण विखे पाटलांचं शरद पवारांना खुल्या चर्चेचं आव्हान

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय. नगरमध्ये केलेल्या विकासाबाबत त्यांनी हे आव्हान दिलंय. शरद पवारांनी नगरमधील आपल्या सभेत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर पुढच्या पिढी जिल्ह्याचा कसलाही विकास केला नाही असं म्हटलं होतं. त्याला विखे पाटलांनी उत्तर दिलंय.

 

01 May 2024 10:19 AM

Loksabha Election 2024 Live Updates : कल्याण - डोंबिवली आणि ठाण्याचा उमेदवारांची घोषणा 

कल्याण - डोंबिवलीमधून मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ठाण्यातून नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. कल्याण आणि ठाण्याची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली आहे. 

सविस्तर बातमी वाचा - सस्पेन्स संपला! शिंदे गटाने जाहीर केला ठाण्याचा उमेदवार; कल्याणमधून CM पुत्राला तिसऱ्यांदा संधी

01 May 2024 09:01 AM

Loksabha Election 2024 Live Updates : काही वेळातच गोड बातमी मिळेल - भुसे

नाशिकमधील उमेदवाराचा महायुतीतील तिढी अद्याप सुटलेला नाही. अशातच थोड्याच वेळात गोड बातमी मिळेल, असं दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे. उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला असला तरी याचा कुठलाही फटका पक्षाला होणार नाही. तर संध्याकाळपर्यंत उमेदवार घरोघरी पोहोचेल, असा भुसे म्हणालेत. 

 

01 May 2024 08:49 AM

Loksabha Election 2024 Live Updates : संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवारासाठी भाजपचा प्रचार

संभाजीनगरमध्ये भाजप अखेर प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं दिसून येतंय. संभाजीनगरची जागा भाजपला सुटावी यासाठी भाजप आक्रमक होती. मात्र जागा शिवसेनेला सुटल्यानं भाजप प्रचारामध्ये दिसत नसल्याची टीका होत होती. मात्र आता अखेर भाजप महायुतीच्या उमेदवारासाठी मैदानात उतरलेलं दिसतायत.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शहरात पदयात्रा काढून, शहरातील वेगवेगळ्या भागात कॉर्नर बैठका घेत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्यायत.

01 May 2024 08:46 AM

Loksabha Election 2024 Live Updates : सोलापुरात योगी आदित्यनाथ काय बोलणार याकडे लक्ष

सोलापुरात आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत. वल्याळ मैदानावर दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे.  

 

01 May 2024 08:45 AM

Loksabha Election 2024 Live Updates : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासाठी महाविकास आघाडीची निर्धार सभा 

कोल्हापूर लोकसभेचे मविआचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची निर्धार सभा आज कोल्हापुरच्या गांधी मैदानावर होणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार उपस्थित राहणारेत. संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे.

01 May 2024 08:43 AM

Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवारांची तोफ आज शिराळ्यात धडाडणार 

शरद पवार आज कोल्हापूर, हातकणगंले दौ-यावर असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी शिराळ्यात त्यांची जाहीर सभा होणआर आहे. या सभेला जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील नेते उपस्थित राहणार आहेत. 

01 May 2024 08:25 AM

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमधील महायुतीचा उमेदवार आज ठरणार?

नाशिकमध्ये महायुतीतील घडामोडींना प्रचंड वेग आलाय...उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 48 तास उरले असताना नाशिकच्या उमेदवारावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यताय...भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करून हा तिढा सोडवणार आहेत...उमेदवारीसाठी हेमंत गोडसे, स्वामी शांतिगिरी आणि विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा आहे . या तिघांशी भेट घेत गिरीश महाजन यांनी आपला अहवाल बावनकुळे यांच्याकडे सादर केलाय...थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची बैठक भुजबळ फार्म हाऊसवर होत आहे. त्यानंतर अधिकृत उमेदवाराचे नाव मुंबईत कळवले जाईल भूमिका जाहीर होऊ शकेल...

 

01 May 2024 08:20 AM

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमध्ये हेमंत गोडसे की विजय करंजकर?

ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराज विजय करंजकरांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. महाजन सध्या ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. करंजकर यांनी ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये जाऊन महाजनांची भेट घेतली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये हेमंत गोडसे की विजय करंजकर कोणाला उमेदवारी मिळणार किंवा या दोघांना डच्चू देऊन महायुती दुसऱ्या कोणाला उमेदवारी देणार हे पाहावं लागणार आहे. 

 

 

01 May 2024 08:18 AM

Loksabha Election 2024 Live Updates : सांगलीत धडाडणार योगी आदित्यनाथांची तोफ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर  दौ-यावर येणार आहेत.. सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी योगींची आज सांगलीतल्या मिरज रोडवर सभा होणार आहे.. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे... या सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आलीये. तर दुसरीकडे कोल्हापुरात हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठीही योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत.. इचलकरंजी इथं संध्याकाळी 6 वाजता त्यांची ही सभा होणार आहे.

 

01 May 2024 08:16 AM

Loksabha Election 2024 Live Updates : सभेतून वार पलटवारांच्या फेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता उद्धव ठाकरेसुद्धा कोल्हापुरात सभा घेणार आहेत. आज कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची प्रत्येकी एक सभा होणार आहे... कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी रात्री 9 वाजता कोल्हापूरच्या गांधी मैदानात सभा होईल. तर इचलकरंजीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासाठी संध्याकाळी 6.30 वाजता सभा होणार आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेवर ठाकरे काय पलटवार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

01 May 2024 08:11 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे लक्ष

मुख्यमंत्री शिंदे यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद संध्याकाळी 5 वाजता होणार असून ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील 4 जागांबद्दल अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल काही घोषणा करणार का? हे पाहावं लागणार आहे. 

 

Read More